गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य महामार्गावर तसेच राहुरी तालूका हद्दीत मोठ मोठी खड्डे पडली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगीरी कारभारामुळे राज्य महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठ मोठी खड्डे होत आहेत. त्या खड्ड्यामुळे अपघात होऊन आज पर्यंत हजारो जण मयत झाले तर तेवढ्याच संख्येने अपंग झाले आहेत. मात्र राहुरी येथील गेंड्याच्या कातडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बॅलेनटाईन चर्च समोर असाच एक मोठा जिवघेणा खड्डा पडलाय. त्या खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. याची दखल घेत दिनांक ५ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालूका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले. सुमारे तीन तास त्यांनी खड्ड्यात उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्या पासून सावधान करत मार्ग दाखवीला.
सदर खड्ड्यामुळे मोठी जिवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासन कोणाचा अपघात होऊन मरणाची वाट पहात आहे का? असा सवाल गणेश पवार यांनी केलाय. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे.
Post a Comment