श्रीरामपूर प्रतिनिधी: गेल्या अनेक दिवसापासून माजी सैनिक व स्थानिक सामाजिक संघटना मध्ये तात्विक वाद झाला होता तो मिटवण्यासाठी अनेक वेळा त्रिदल ने प्रयास केला. यासाठी श्रीरामपूर तालुका आमदार लहुजी कानडे यांना देखील निवेदन सादर करून तक्रार केली होती व श्रीरामपूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली होती परंतु काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा जैसे थे झाले आणि प्रकरण जास्त. जातीवादाची वळण घेऊ लागले या सर्व घटनेची माहिती त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांना कळविण्यात आले. त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून समाजास पणे वाद मिटून घ्या नाहीतर आम्ही आमच्या स्टाईल ने वाद मिटवू अशी सूचना दिली. त्यानंतर कोर कमिटी अध्यक्ष मेजर अशोक चौधरी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता मेजर आठरे एस के , नगर उत्तर चे अध्यक्ष मेजर शरद चव्हाण , नगर उत्तर चे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार , श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप , सैनिक सेवा संघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अनिल लगड , उपाध्यक्ष मेजर संग्राम यादव , महिला अध्यक्ष छायाताई मोठे , अकोला तालुका अध्यक्ष मेजर सचिन नवले , मेजर बाळासाहेब बनकर , मेजर भागीरथ काका , मेजर राजू तोरणे , मेजर अजय तोरणे , तसेच सर्व महिला भगिनी , वीरमाता, वीरपत्नी ,वीर नारी, व तालुक्यातील तमाम माजी सैनिक , यांच्या सहकार्याने व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर , त्रिदल सैनिक सेवा संघ तालुकाध्यक्ष अनिल लगड , यांच्या दोघांकडून लेखी व मोबाईलवर बाईट देऊन सामान्यपणे वाद मिटवला . त्यासाठी जिल्ह्यातून विविध जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे प्रसिद्धी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. यापुढे भविष्यात माजी सैनिकाचा अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी अशी सूचना दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
Post a Comment