बेलापुर (प्रतिनिधी )-सुजाण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर असुन देशाच्या उभारणीत जडण घडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे असे मत प्रभारी प्राचार्या डाँ.गुंफा कोकाटे यांनी व्यक्त केले बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापुर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्या वेळी बोलताना डाँ.कोकाटे पुढे म्हणाल्या की तिरत्तनी सारख्या छोट्या खेड्यातील सर्वपल्ली भारताचे राष्ट्रपती होतात तर त्यांचा आदर्श ठेवून आपण प्रत्येकाने महामानवांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे.त्यांनी लिहलेली ग्रंथसंपदा वाचून चार भिंतीच्या बाहेरची शाळा ख-या अर्थाने शिकली पाहिजे.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.तसेच एक वेगळा उपक्रम म्हणून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना राखी बांधून शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रा. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.विचारमंचावर कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर , डॉ.नवाळे, डॉ बाचकर ,प्रा.गायकवाड,प्रा.शेख उपस्थित होते.अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांनी भुषविले .कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख सतिश पावसे यांनी केले. डॉ.अशोक माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment