पोलिसांनी केला १५ लाखांचा गुटखा जप्त! अहमदनगर एलसीबीची धडकेबाज कारवाई.

अहमदनगर (प्रतिनिधी )-अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नगर तालुक्यातल्या अरणगाव शिवारात हिरा गुटखा, तंबाखू आणि दोन टेम्पोसह पंधरा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.याप्रकरणी शेख नासिर अहमद चाँदमियाँ, (वय- 44 वर्षे, रा. गाडेकर गल्ली, भिंगार, टेम्पो नं. एमएच-16-सीसी-4920 वरील चालक, 2) शेख अय्याज नसीर, (वय-39 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख, (वय-34 वर्षे, रा. नागरदेवळे, ता. नगर), सय्यद असीफ महेमूद, (वय- 42 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण, (वय- 48 वर्षे, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा, ता. नेवासा), शेख नूर अब्दुल रऊफ, (रा. मोमीन गल्ली, भिंगार (फरार) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यांच्या पथकाला नगर तालुक्यातील अरणगाव शिवारामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.शनिवारी पहाटेच्या सुमाराला दौंड मार्गावर अरणगाव चौकात दोन गाड्या थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर यामध्ये गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या.पोलिसांनी हिरा कंपनीचा गुटखा, रॉयल कंपनीची तंबाखू असा महाराष्ट्रामध्ये विक्रीला प्रतिबंध असलेला माल हस्तगत केला.या कारवाईमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनंसुद्धा जप्त करण्यात आली.याप्रकरणी कमलेश हरिदास पाथरुट (वय- 30 वर्षे, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा) यांनी फिर्याद दिली.सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पो. ना. शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ राहूल सोळंके, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मग एफडीए करतंय काय?बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खास अन्न आणि औषध प्रशासनाची निर्मिती केली आहे. या प्रशासनाची राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यालये आहेत. मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या जबाबदारीचा या विभागाला विसर पडलाय. बेकायदा गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करण्याचं या विभागाचं काम पोलीस करताहेत. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध विभाग अर्थात एफडीए नक्की काय करतंय, असा सवाल अहमदनगरच्या नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget