Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी )-अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नगर तालुक्यातल्या अरणगाव शिवारात हिरा गुटखा, तंबाखू आणि दोन टेम्पोसह पंधरा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.याप्रकरणी शेख नासिर अहमद चाँदमियाँ, (वय- 44 वर्षे, रा. गाडेकर गल्ली, भिंगार, टेम्पो नं. एमएच-16-सीसी-4920 वरील चालक, 2) शेख अय्याज नसीर, (वय-39 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख, (वय-34 वर्षे, रा. नागरदेवळे, ता. नगर), सय्यद असीफ महेमूद, (वय- 42 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण, (वय- 48 वर्षे, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा, ता. नेवासा), शेख नूर अब्दुल रऊफ, (रा. मोमीन गल्ली, भिंगार (फरार) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यांच्या पथकाला नगर तालुक्यातील अरणगाव शिवारामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.शनिवारी पहाटेच्या सुमाराला दौंड मार्गावर अरणगाव चौकात दोन गाड्या थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर यामध्ये गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या.पोलिसांनी हिरा कंपनीचा गुटखा, रॉयल कंपनीची तंबाखू असा महाराष्ट्रामध्ये विक्रीला प्रतिबंध असलेला माल हस्तगत केला.या कारवाईमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनंसुद्धा जप्त करण्यात आली.याप्रकरणी कमलेश हरिदास पाथरुट (वय- 30 वर्षे, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा) यांनी फिर्याद दिली.सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पो. ना. शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ राहूल सोळंके, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मग एफडीए करतंय काय?बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खास अन्न आणि औषध प्रशासनाची निर्मिती केली आहे. या प्रशासनाची राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यालये आहेत. मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या जबाबदारीचा या विभागाला विसर पडलाय. बेकायदा गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई करण्याचं या विभागाचं काम पोलीस करताहेत. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध विभाग अर्थात एफडीए नक्की काय करतंय, असा सवाल अहमदनगरच्या नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार;श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल.श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर श्रीरामपूर,शिर्डी व बाभळेश्वर येथे वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की, आरोपी तुळशीराम वायकर याचे ४-५ वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले. या नंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले.त्यातून ही तरुणी गर्भवती झाली.आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून तिचा गर्भपात देखील केला.तसेच या प्रकाराची माहिती तुळशीराम वायकर याच्या घरी सांगण्यासाठी ही तरुणी गेली असता तिला समजले कि,तुळशीराम याचे पहिलेच लग्न झाले असून तो विवाहित आहे.यावेळी तुळशीरामच्या आईने,पत्नीने या पिडीत भावी डॅाक्टर तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. या सर्व प्रकारावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तुळशीराम ऊर्फ राजू पोपट वायकर,सईबाई वायकर,हिराबाई वायकर यांच्या विरुद्ध भादवि कलम 376 (2) (एन)313,420,417 इतर व अनुसूचित जाती-जमाती कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चालू आहे.या प्रकारामुळे पोलीस खात्यात तालुका पोलीस व शहर पोलिसात खळबळ उडाली आहे.पुढील तपास DYSP हे करीत आहे. 



कोपरगाव । प्रतिनिधी ।शिक्षकाचे मानवी जीवनात अन्य साधारण महत्व आसुन ते शब्दात व्यक्त करण्या सारखे नाही असे सृष्टी संदीप कंक्राळे हिना सोशल मिडीयाचा माध्यमातून शिक्षक दिनी व्यक्त केले सृष्टी ही नाशिक येथील वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर गंगापूर रोड, नाशिक या शाळेत इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेत आहेत.

भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना या दिवशी शिक्षकाच्या मेहनतीचे, दूरदृष्टीचे आणि समर्पणाचे आभार मानण्याची संधी आहे.या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरु साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान या वरून लक्षात येते की शिक्षकाशिवाय विद्यार्थ्याचे आयुष्य अपूर्ण आहे आणि अशा जीवनाची कल्पनाही करता येत नाही असे या चिमुकली ने शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-आजच्या युगात शेतीकरीता बैला  ऐवजी यंत्रांचा वापर होवु लागल्यामुळे खरे बैल दिसेनासे झाले असुन आता केवळ सणाकरीता मातीचेच बैल बाजारात दिसु लागले असुन येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हौस म्हणून पाळलेल्या बैलाला पहाण्याकरीता बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती                                  बेलापुर येथील हाँटेल व्यवसायीक व सामाजिक कार्यकर्ते सर्फराज उर्फ भैय्या जमालभाई शेख यांनी पाळलेल्या गावरान गायीला गोऱ्हा झाला होता त्यांनी त्यांचे निट संगोपन केले थोडा मोठा झाल्यावर  त्या बैलाला खरेदी करण्याकरीता व्यापारी आले असता त्यांचे चिरंजीव रीहान व आयान याने बैलाला कसायाला

विकण्यास मनाई केली अखेर बालहाट्टापायी त्यांनी तो बैल पाळण्याचे ठरविले त्यांचा हाँटेल व्यवसाय असल्यामुळे त्यांनी त्यास हाँटेलापुढेच बांधुन चांगली व्यवस्था ठेवली अनेक ग्राहक जेवणासाठी आले की त्या बैलासोबत सेल्फी घेवु लागले त्यामुळे सर्फराज यांचाही उत्साह वाढला तो बैल आज सहा वर्षाचा झाला आहे त्याचे वजन ८९ किलो आहे त्याची उंची आडीच फुट आहे ह भ प इंदोरीकर महाराजांनी दोन वेळेस भेट देवुन त्या बैलाची व बैल पाळणाराची स्तुती केली आहे  त्या बैलाला सोलापूर येथील एका शेतकऱ्यांने सहा लाख रुपयांना मागीतले होते परंतु रेहान व आयान यांच्या हट्टापायी आता त्या बैलाचे संगोपन करण्याचा निर्णय शेख परिवाराने घेतला असुन त्यांनी त्याचे नावा गोट्या ठेवले आहे आज त्यांनी त्या बैलाला बेलापुरगावात आणले असता त्या बैलास पहाण्याकरीता अनेकांनी त्यांच्या घरी गर्दी केली अखेर त्यांनी त्या बैलाला बेलापुराच्या पेठेतून फिरविले अनेकांनी त्या गोट्याबरोबर फोटो काढणे पसंत केले बऱ्याच जणांनी गोट्याला आपल्या कँमेऱ्यातही कैद केले खरोखरच पोळ्याच्या सणानिमित्ताने केवळ कागदावरच राहीलेली शेतकऱ्यांकडील खिलारी बैल जोडी पुन्हा दिसेल का ? सजीव बैलाकरीता असणारा बैल पोळा आता मातीने बनविल्या जाणाऱ्या बैलावर साजरा करण्याची वेळ आली आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

श्रीरामपूर शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी उम्मती फाउंडेशन या संस्थेने आज शिक्षक दिनानिमित्त श्रीरामपूर शहरातील "शहा छप्परबंद "या शाळेस काही "कपाटस" व "कॉम्प्युटर टेबल्स" यांची भेट दिली तसेच शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना "गणवेशाचे "ही वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर शहराचे "मुफ्ती रिजवान साहेब" हे होते तर सामाजिक कार्यकर्ते नजीर भाई (मामु )ज्येष्ठ नागरिक काकर मामु उपस्तीत होते , वरील कार्यक्रमाला उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल भाई दारूवाला तसेच उपाध्यक्ष फिरोज सर तसेच कायदेविषयक सल्लागार आरिफ शेख तसेच शाकीब भाई, युसुफ लखानी, वसीम जागीरदार , शहानवाज सर,समीर दोस्ती, नितीन बनकर ,हे लोक विशेष करून हजर होते ,वरील कार्यक्रमा करीता शहा छप्परबंद शाळेचे चेअरमन जाकिर सर व सचिव अल्ताफ सर यांनी व त्यांच्या सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ सर यांनी केले तर आभार अल्ताफ काकर सर यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरीग) अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण संपादन करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापूर येथील शिव मल्हार वाघ्या- मुरळी व गोंधळी सेवाभावी संस्थाच्यावतीने  विशाल शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ येळे,नंदकुमार खेमनर सचिव, चंद्रकात थोरात सरचिटणीस, शिवाजीराव गायकवाड, चिटणीस ,बबनराव पुंड, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र लकडे, जिल्हा उपाध्यक्ष, भारत सोनवणे, जिल्हा सचिव,नारायण ब्राह्मणे, जिल्हा सरचिटणीस आशा भीमराज गायकवाड, जिल्हा कार्याध्याक्ष, दत्तात्रय निकम, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बनकर, तालुका सचिव,जगन्नाथ तागड, तालुका उपाध्यक्ष, सटवाजी गाढे, तालुका कार्याध्यक्ष महेश औटी, तालुका संघटक ताई गणेश कदम, तालुका महिला सचिव तनीषा शेख, तालुका संघटक हरिभाऊ तांबे, तालुका सरचिटणीस मनोज सोनवणे,राहाता तालुकाध्यक्ष मिनू नेहाळे, तालुका संघटक  लताबाई महारनोर, तालुका उपाध्यक्ष अशोक सोनवणे, नांदगाव तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ मोरे, राहुरी तालुकाध्यक्ष  बाळासाहेब बाचकर, तालुका उपाध्यक्ष कांताबाई पेरने, तालुका महिला संघटक समाधान लबडे, राहूरी तालुका चिटणीस एकनाथ गोंधळी, नेवासा तालुकाध्यक्ष सुशिलाबाई गायकवाड, बाबासाहेब भालेराव,दादासाहेब कुसेकर, सूरज जाधव, सुभाष पारखे,बंटी थोरात, तथा सर्व सदस्य,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिध) गणेश आगमना आगोदरच टोमॅटो मधून गणरायांनी दिले भक्तांना दर्शन.येत्या काही दिवसात गणेश उत्सवास प्रारंभ होऊन,गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या उत्सवास सुरवात होण्या आगोदर श्रीरामपूर शहरातील राजू मिर्जा या मुस्लिम बांधवाच्या घरात, टोमॅटोच्या रूपातून गणरायांनी भक्तांना दर्शन दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता. मिर्जा यांनी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी दिला. जेव्हा स्वयंपाका करिता घरातील महिलांनी टोमॅटो घेतला असता, टोमॅटोमध्ये गणरायांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आल्याने, महिलांनी मिर्जा यांना बोलावून सर्व हकीकत सांगितली, त्यानंतर मिर्जा यांच्या घरात आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले, त्यानंतर राजू मिर्जा यांनी गणारायांचे प्रतिबिंब असलेले टोमॅटो हा स्वयंपाकात वापरण्या ऐवजी, तो मंदिरात जाऊन देण्याचा निर्णय घेतला. व शहरातील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात टोमॅटो रुपी गणपती बाप्पा सुपूर्त केले. यावेळी मंदिरात आलेल्या भक्तांनी देखील, टोमॅटो रुपी गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात आलेल्या भक्तांनी सध्या टोमॅटोचे भाव पडल्याने, कदाचित शेतकरी राज्याच्या मदतीला गणपती बाप्पा धावून आल्याची धारणा व्यक्त केली जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget