श्रीरामपूर (प्रतिनिध) गणेश आगमना आगोदरच टोमॅटो मधून गणरायांनी दिले भक्तांना दर्शन.येत्या काही दिवसात गणेश उत्सवास प्रारंभ होऊन,गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या उत्सवास सुरवात होण्या आगोदर श्रीरामपूर शहरातील राजू मिर्जा या मुस्लिम बांधवाच्या घरात, टोमॅटोच्या रूपातून गणरायांनी भक्तांना दर्शन दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता. मिर्जा यांनी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी दिला. जेव्हा स्वयंपाका करिता घरातील महिलांनी टोमॅटो घेतला असता, टोमॅटोमध्ये गणरायांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून आल्याने, महिलांनी मिर्जा यांना बोलावून सर्व हकीकत सांगितली, त्यानंतर मिर्जा यांच्या घरात आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले, त्यानंतर राजू मिर्जा यांनी गणारायांचे प्रतिबिंब असलेले टोमॅटो हा स्वयंपाकात वापरण्या ऐवजी, तो मंदिरात जाऊन देण्याचा निर्णय घेतला. व शहरातील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात टोमॅटो रुपी गणपती बाप्पा सुपूर्त केले. यावेळी मंदिरात आलेल्या भक्तांनी देखील, टोमॅटो रुपी गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात आलेल्या भक्तांनी सध्या टोमॅटोचे भाव पडल्याने, कदाचित शेतकरी राज्याच्या मदतीला गणपती बाप्पा धावून आल्याची धारणा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment