या घटनेतील मयत विद्या दिलीप कडू ही २७ वर्षीय विवाहित तरूणी व तिची ४ वर्षीय मुलगी सिद्धी दिलीप कडू ह्या दोघी मायलेकी १ सप्टेंबर पासून लाख रोड, कडू वस्ती येथील त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत देवळाली पोलिस चौकीत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. बेपत्ता झाल्यापासून नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान टाकळीमियॉ हद्दीतील पंचवटी भागातील एका विहिरीत सिद्धी कडू या चिमुरडीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. स्थानिक रहिवासी व विद्या कडू हिच्या माहेरच्या लोकांनी विद्या हिचा शोध घेण्यास सुरुवात केली. विहितील पाण्याची पातळी जास्त व विहिरीत तळाच्या गाळात विद्याचा मृतदेह रुतल्याने विद्या हीचा मृतदेह पाण्यावर तरंगू शकला नाही. पोहचणाऱ्या तरुणांनी रात्री १० वाजता गळाच्या सहाय्याने शोध घेतला असता विद्या हिचा मृतदेह गळाला लागला. दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी साई प्रतिष्ठाणच्या रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले होते.
मायलेकीचा मृतदेह आढळला विहीरीत
राहुरी(प्रतिनिधी)-राहुरी तालूक्यातील टाकळीमियॉ येथून एक सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या माय लेकीचा मृतदेह दोन सप्टेंबर रोजी टाकळीमियॉ येथील एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी देवळाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाठ, भिताडे, वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नगराध्यक्ष सत्यजीत कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे, मंगेश ढुस, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, ग्रामस्थ व नातेवाईक आदींनी घटनास्थळी मदत कार्य केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.
Post a Comment