नितीन मोतीराम भालेराव हा तरूण रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता. दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास प्रात: विधीच्या निमित्ताने राहुरी कृषी विद्यापीठाच्या इ विभागाच्या प्रक्षेत्रात गेला होता. खुप उशीरा पर्यंत नितीन घरी परतला नाही. म्हणुन त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याला पाहाण्यासाठी गेला. त्यावेळी एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही बातमी गावात समजताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ही घटना राहुरी पोलीसांना कळवताच पोलीस कर्मचारी संजय जाधव हे दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनास पाठविले. नितीन याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही. परंतु नितीन याने अनेक मायक्रो फायनांस कंपनीचे कर्ज घेतले होते. लॉक डाऊनमध्ये हाताला वेळेवर काम मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाही. परिणामी फायनांस कंपन्यांनी हप्ते भरण्याचा तगादा लावला होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्तांमध्ये चालु आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय जाधव हे करीत आहेत.
Post a Comment