नाऊर( वार्ताहर)श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुंटूबातील तरुण शेतकरी विलास अशोक देसाई याचे महावितरणच्या विद्युत पोलवरील तारेला चिकटून दुर्दैवी निधन झाल्यामुळे देसाई कुटुंबाचा आधारवडच नाहीसा झाला हे ओळखून कुटुंबीयांच्या मदतीसाठी सोशल मिडीयातून अवाहन करताच मोठ्या प्रमणात मदतीचा ओघ सुरु झाला आहे. कै विलास यांच्या पश्चात वृद्ध आई व पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार होता. त्याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला. तसेच घरामध्ये तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा व एकमेव कमविता होता.त्याच्या वडिलांचे वर्षश्राद्ध समीप आले असताना, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. या मदतीच्या अवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने ठाणे येथील उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घरी भेट देत त्याच्या घराचे अर्धवट असलेले बांधकाम पाहून घराचे वरील छतासाठी अँगल पाईप पत्रे यासाठी तब्बल तीस हजार रुपये मदत दिले.तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या माध्यमातूनसुमारे 40 ते 45 हजार रुपये मदत नागरिकांच्या माध्यमातून जमा झाली आहे पत्रकार देविदास देसाई,नाशिक येथील राहुल क्षीरसागर,कृष्णा देसाई व पत्रकार संदीप जगताप यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजाराची मदत जमा करण्यात आली असून ही मदत मयत विलासच्या मुलीच्या नावे ठेव पावतीच्या रुपात बँकेत ठेवण्यात येणार आहे.ग्रामविकास अधिकारी टि .के .जाधव व पत्रकार संदीप जगताप यांनी सोशल मीडियातून व्हाट्सअपद्वारे ग्रामस्थांना कै. विलास देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे त्याच्या कुटुंबात कमविता व्यक्तीच गमविल्याने मुलींच्या शिक्षणासह भविष्यातील सर्वच प्रश्न अवघड असल्याने मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी टी.के. जाधव व पत्रकार संदिप जगताप या दोघांच्या खात्यावरती मिळून सुमारे नव्वद हजाराच्या आस-पास रक्कम जमा झाली. जमा झालेली रक्कम दोन मुलीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.सोशल मीडियातून सामाजिक जबाबदारी ओळखून अनेकांनी मदत केली ग्रामस्थांच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींना धन्यवाद देण्यात येत आहे.
Post a Comment