बेलापुर (प्रतिनिधी )-आजच्या युगात शेतीकरीता बैला ऐवजी यंत्रांचा वापर होवु लागल्यामुळे खरे बैल दिसेनासे झाले असुन आता केवळ सणाकरीता मातीचेच बैल बाजारात दिसु लागले असुन येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हौस म्हणून पाळलेल्या बैलाला पहाण्याकरीता बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती बेलापुर येथील हाँटेल व्यवसायीक व सामाजिक कार्यकर्ते सर्फराज उर्फ भैय्या जमालभाई शेख यांनी पाळलेल्या गावरान गायीला गोऱ्हा झाला होता त्यांनी त्यांचे निट संगोपन केले थोडा मोठा झाल्यावर त्या बैलाला खरेदी करण्याकरीता व्यापारी आले असता त्यांचे चिरंजीव रीहान व आयान याने बैलाला कसायाला
विकण्यास मनाई केली अखेर बालहाट्टापायी त्यांनी तो बैल पाळण्याचे ठरविले त्यांचा हाँटेल व्यवसाय असल्यामुळे त्यांनी त्यास हाँटेलापुढेच बांधुन चांगली व्यवस्था ठेवली अनेक ग्राहक जेवणासाठी आले की त्या बैलासोबत सेल्फी घेवु लागले त्यामुळे सर्फराज यांचाही उत्साह वाढला तो बैल आज सहा वर्षाचा झाला आहे त्याचे वजन ८९ किलो आहे त्याची उंची आडीच फुट आहे ह भ प इंदोरीकर महाराजांनी दोन वेळेस भेट देवुन त्या बैलाची व बैल पाळणाराची स्तुती केली आहे त्या बैलाला सोलापूर येथील एका शेतकऱ्यांने सहा लाख रुपयांना मागीतले होते परंतु रेहान व आयान यांच्या हट्टापायी आता त्या बैलाचे संगोपन करण्याचा निर्णय शेख परिवाराने घेतला असुन त्यांनी त्याचे नावा गोट्या ठेवले आहे आज त्यांनी त्या बैलाला बेलापुरगावात आणले असता त्या बैलास पहाण्याकरीता अनेकांनी त्यांच्या घरी गर्दी केली अखेर त्यांनी त्या बैलाला बेलापुराच्या पेठेतून फिरविले अनेकांनी त्या गोट्याबरोबर फोटो काढणे पसंत केले बऱ्याच जणांनी गोट्याला आपल्या कँमेऱ्यातही कैद केले खरोखरच पोळ्याच्या सणानिमित्ताने केवळ कागदावरच राहीलेली शेतकऱ्यांकडील खिलारी बैल जोडी पुन्हा दिसेल का ? सजीव बैलाकरीता असणारा बैल पोळा आता मातीने बनविल्या जाणाऱ्या बैलावर साजरा करण्याची वेळ आली आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
Post a Comment