Latest Post

राहुरी(प्रतिनिधी)-राहुरी तालूक्यातील टाकळीमियॉ येथून एक सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या माय लेकीचा मृतदेह दोन सप्टेंबर रोजी टाकळीमियॉ येथील एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

          या घटनेतील मयत विद्या दिलीप कडू ही २७ वर्षीय विवाहित तरूणी व तिची ४ वर्षीय मुलगी सिद्धी दिलीप कडू ह्या दोघी मायलेकी १ सप्टेंबर पासून लाख रोड, कडू वस्ती येथील त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत देवळाली पोलिस चौकीत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. बेपत्ता झाल्यापासून नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान टाकळीमियॉ हद्दीतील पंचवटी भागातील एका विहिरीत सिद्धी कडू या चिमुरडीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून ला. स्थानिक रहिवासी व विद्या कडू हिच्या माहेरच्या लोकांनी विद्या हिचा शोध घेण्यास सुरुवात केली. विहितील पाण्याची पातळी जास्त व विहिरीत तळाच्या गाळात विद्याचा मृतदेह रुतल्याने विद्या हीचा मृतदेह पाण्यावर तरंगू शकला नाही. पोहचणाऱ्या तरुणांनी रात्री १० वाजता गळाच्या सहाय्याने शोध घेतला असता विद्या हिचा मृतदेह गळाला लागला. दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी साई प्रतिष्ठाणच्या रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले होते. 

         घटनास्थळी देवळाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाठ, भिताडे, वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नगराध्यक्ष सत्यजीत कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे, मंगेश ढुस, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे,  ग्रामस्थ व नातेवाईक आदींनी घटनास्थळी मदत कार्य केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.


राहुरी(प्रतिनिधी)-राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील नितीन मोतीराम भालेराव या ३८ वर्षीय तरुणाने दिनांक २ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

           नितीन मोतीराम भालेराव हा तरूण रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता. दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास प्रात: विधीच्या निमित्ताने राहुरी कृषी विद्यापीठाच्या इ विभागाच्या प्रक्षेत्रात गेला होता. खुप उशीरा पर्यंत नितीन घरी परतला नाही. म्हणुन त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याला पाहाण्यासाठी गेला. त्यावेळी एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही बातमी गावात समजताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ही घटना राहुरी पोलीसांना कळवताच पोलीस कर्मचारी संजय जाधव हे दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनास पाठविले. नितीन याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही. परंतु नितीन याने अनेक मायक्रो फायनांस कंपनीचे कर्ज घेतले होते. लॉक डाऊनमध्ये हाताला वेळेवर काम मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाही. परिणामी फायनांस कंपन्यांनी हप्ते भरण्याचा तगादा लावला होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्तांमध्ये चालु आहे.

          या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय जाधव हे करीत आहेत.

नाऊर( वार्ताहर)श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर येथील गरीब कुंटूबातील तरुण शेतकरी विलास अशोक देसाई याचे महावितरणच्या विद्युत पोलवरील तारेला  चिकटून दुर्दैवी निधन झाल्यामुळे देसाई कुटुंबाचा आधारवडच नाहीसा झाला हे ओळखून कुटुंबीयांच्या मदतीसाठी सोशल मिडीयातून अवाहन करताच मोठ्या प्रमणात मदतीचा ओघ सुरु झाला आहे. कै विलास यांच्या पश्चात  वृद्ध आई व पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार होता. त्याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला. तसेच घरामध्ये तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा व एकमेव कमविता होता.त्याच्या वडिलांचे वर्षश्राद्ध समीप आले असताना, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. या मदतीच्या अवाहनाला प्रतिसाद   देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने ठाणे येथील उद्योजक मंगेश नवले यांनी मयत विलासच्या घरी भेट देत त्याच्या घराचे अर्धवट असलेले बांधकाम पाहून घराचे वरील छतासाठी अँगल पाईप पत्रे यासाठी तब्बल तीस हजार रुपये मदत दिले.तसेच ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव यांच्या माध्यमातूनसुमारे 40 ते 45 हजार रुपये मदत नागरिकांच्या माध्यमातून जमा झाली आहे पत्रकार देविदास देसाई,नाशिक येथील राहुल क्षीरसागर,कृष्णा देसाई व पत्रकार संदीप जगताप यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजाराची मदत जमा करण्यात आली असून ही मदत मयत विलासच्या मुलीच्या नावे ठेव पावतीच्या रुपात बँकेत ठेवण्यात येणार आहे.ग्रामविकास अधिकारी टि .के .जाधव व  पत्रकार संदीप जगताप यांनी सोशल मीडियातून व्हाट्सअपद्वारे ग्रामस्थांना कै. विलास देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे त्याच्या कुटुंबात कमविता व्यक्तीच गमविल्याने मुलींच्या शिक्षणासह भविष्यातील सर्वच प्रश्न अवघड असल्याने मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी टी.के. जाधव व  पत्रकार संदिप जगताप या दोघांच्या खात्यावरती मिळून सुमारे नव्वद हजाराच्या आस-पास रक्कम जमा झाली. जमा झालेली रक्कम दोन मुलीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.सोशल मीडियातून सामाजिक जबाबदारी ओळखून अनेकांनी मदत केली ग्रामस्थांच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींना धन्यवाद देण्यात येत आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधि)- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरा त एम आय डी सी मध्ये श्री इंपेक्स फर्निचर गोडाऊन च्या शेजारी मोकळ्या जागेत वास्तव्यास असलेले व मेंढपाळ म्हणून मजुरीचे काम करणारे श्रावण अहिरे मूळ रहिवासी हिरानगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मुलाच्या गळ्यावर उजव्या बाजूला गळा दाबल्याच्या खुणा दिसत असल्याने सदर चिमुकल्याचा घात झाल्याची शक्यता प्रथम दर्शनी वर्तविली जात आहे सदर घटना ही आज रोजी भल्या पहाटे घडली असून शेजारील मेंढपाळ तसेच आई-वडिलांनी त्यास श्रीरामपूर येथे उपचारासाठी नेले होते परंतु डॉक्टरांनी त्यांस मृत घोषित केले सदर घटनेची माहिती  पोलिसांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षका डॉक्टर दिपाली काळे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप घटनास्थळी दाखल झाले तर सदर घटना नेमकी कशी घडली याविषयी चौकशीसाठी मुलाच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे सदर चिमुकल्या मुलाच्या पश्चात त्याला एक मोठी बहीण व दोन भाऊ व आई-वडील असा परिवार आहे सदर चिमुकल्याच्या घातपाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सदर परिवार एमआयडीसी परिसरात गेल्या तीन महिन्यापासून वास्तव्यास आहे तर ज्या मालकाच्या मेंढ्या सदर कुटुंब सांभाळत होते तेदेखील शेजारी वास्तव्यास आहे दत्तनगर येथील पोलिस चौकीचे कॉन्स्टेबल  कारखेले राशिनकर व शेलार राजेंद्र लोंढे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह श्रीरामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे सदर घटना नेमकी काय आहे हे  अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी करत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने  जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले असुन सात जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे बेलापुर येथील लक्ष्मी नारायण नगरच्या बाजुला आडोशाला काही इसम तिन पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहीती गुन्हा अन्वेषण विभागाला समजली मिळालेल्या माहीतीच्या अधारे सहाय्यक पोलीसा निरीक्षक सोमनाथ दिवटे हवालदार मनोज गोसावी हवालदार सुनिल चव्हाण हवालदार दत्ता ईंगळे अंमलदार रणजीत जाधव सागर ससाणे बबन बेरड यांच्या पथकाने छापा टाकला असता सात इसम तिन पत्त्याचा तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले पोलीसांनी जुगाराचे साहीत्य सात हजार रुपये रोख जप्त केले असुन सात जणाविरुध्द जुगार अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.


बेलापूर(प्रतिनिधी)-बेलापुर तंटामूक्ती समीतीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम भराटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यामुळे महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघ,बेलापूर येथील संपर्क कार्यालयात  नवनियुक्त तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे व मावळते अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.बेलापूर शहर तंटामुक्तीचे मावळतेअध्यक्ष यांचाही सत्कारयावेळी बेलापूर शहर प्रमुख एजाज सय्यद यांचे हस्ते करण्यात आले तर नवनियुक्त अध्यक्ष यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे यांचे हस्ते करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघ,बेलापूरचे शहर संघटक मुसा सय्यद,बेलापूर शहर खजिनदार ,सलीम शेख,श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष,कासम शेख,बेलापूर शहर सचिव ,शफिक शेख,बेलापूर शहर उपप्रमुख, मोहम्मद अली सय्यद,सदस्य मोहम्मद गौरी,सदस्य रसूल सय्यद भामाठाण, हर्षद दुधाळ सर्व पत्रकार बांधव,तसेच आदी मान्यवर ग्रामस्त उपस्थित होते.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- आज दि.  01/09/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.)1) संजय कारभारी गांगुर्डे रा माळेवाडी टाकळीभान तालुका श्रीरामपूर

2)गणपत डुकरे रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर ( फरार)

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2500/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 3. शांताबाई गणपत जाधव रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर

31,500/-  रु. कि.चे 450 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 4. आशाबाई शिवाजी पवार रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर

35,000/-  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,15,000/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे   टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, A.s.I.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  निखिल मसराम, मारुती माळी म.पो.कॉ. प्रज्ञा डोंगरे, पल्लवी तुपे व आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget