बेलापूर(प्रतिनिधी)-बेलापुर तंटामूक्ती समीतीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम भराटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यामुळे महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघ,बेलापूर येथील संपर्क कार्यालयात नवनियुक्त तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे व मावळते अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.बेलापूर शहर तंटामुक्तीचे मावळतेअध्यक्ष यांचाही सत्कारयावेळी बेलापूर शहर प्रमुख एजाज सय्यद यांचे हस्ते करण्यात आले तर नवनियुक्त अध्यक्ष यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे यांचे हस्ते करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघ,बेलापूरचे शहर संघटक मुसा सय्यद,बेलापूर शहर खजिनदार ,सलीम शेख,श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष,कासम शेख,बेलापूर शहर सचिव ,शफिक शेख,बेलापूर शहर उपप्रमुख, मोहम्मद अली सय्यद,सदस्य मोहम्मद गौरी,सदस्य रसूल सय्यद भामाठाण, हर्षद दुधाळ सर्व पत्रकार बांधव,तसेच आदी मान्यवर ग्रामस्त उपस्थित होते.
Post a Comment