Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- येथील मोफत कोविड केअर सेंटरचे कार्य केवळ दाते सामाजिक कार्यकर्ते डाँक्टर पत्रकार पोलीस यांच्या सहकाऱ्यानेच यशस्वीरीत्या पार पडले असल्याचे मत उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले. बेलापुर गावात मोफत कोविड सेंटर सुरु करुन अनेक रुग्णावर योग्य उपचार केल्यामुळे सर्व रुग्ण सुखरुप घरी गेले  त्या बद्दल कोविड सेंटरमध्ये विशेष योगदान देणारे पोलीस पाटील अशोक प्रधान रुग्ण कल्याण सामीतीचे विशाल आंबेकर गोपी दाणी बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा

पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख देविदास देसाई ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख उपस्थित होते या वेळी बोलताना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे सस्थापक अध्यक्ष  बरकतअली शेख म्हणाले की सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देण हे पत्रकार संघाचे व पत्रकारांचे कर्तव्य आहे या पत्रकार संघास २९ वर्षाचा सामाजिक वारसा लाभलेला आहे समाजातील चांगल्या गोषौटीची संघ नेहमीच दखल घेत असतो कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जिवाची काळजी करणारांना संघाच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचेही शेख यांनी सांगितले या वेळी पत्रकार देविदास देसाई अमीर जहागीरदार रियाज पठाण आरोग्यदुत सुभाष गायकवाड पोलीस पाटील अशोक प्रधान आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास मुस्ताक शेख दिलीप दायमा फकीर मोहमंद शेख रियाज पठाण गुलाब वायरमन कासम शेख एजाज सय्यद शफीक शेख मुसा सय्यद अमीर बेग मिर्झा अजिज शेख योगेश नागले उपस्थित होते कार्यक्रमचे सूत्रसंचलन राजमोहंमद शेख यांनी केले तर प्रास्ताविक कासम शेख यांनी केले असलम बिनसाद यांनी आभार मानले.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- दोन हजार रुपयाची लाच घेताना श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे संजय काळे यांना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात पकडले त्यामुळे पोलीसा वार्तुळात खळबळ उडाली आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपुर शहर पोलीसा स्टेशन येथे दाखल असलेल्या भा द वि कलम ३९२ च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिटसाठी आलोसे संजय काळे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली होती ही रक्कम श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमधील बिट चौकी न ३ चे कार्यालय येथे स्विकारली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या समवेत पोलीसा नाईक प्रकाश महाजन एकनाथ बाविस्कर पळशीकर यांनी हा सापळा यशस्वी पार पाडला असुन या कारवाई मुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला त्याबद्दल हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना असलम बिनसाद यांनी आपले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सोबत लोकडाऊन काळात काम करत असतानाचे आपले काही अनुभव याळवेली सांगितले शासकीय कामकाजा व्यतिरिक्त  जनतेची गऱ्हाणी अडचणी सोडविण्याचे काम  प्रशांत पाटील यांनी केले अन त्या कामाची जेव्हा बातमी झाली त्यावेळेस पाटील साहेबांचे माझ्या सोबत फोनवर जे बोलणं झालं ते आयकून मला हे आपल्या शहराचे तहसीलदार असल्याचे अभीमान वाटले प्रशांत पाटील म्हणाले मी कार्यालयात आलेल्या आजीची विचारपुस केली तिची किरकोळ समस्या होती ती सोडविली हे फार काही वेगळे काम केले असे मला वाटत नाही माझ्या परिवाराचे माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की आपल्याकडे कुणीही समस्या घेवुन आला तर त्याचे समाधान करणे हे माझे पहीले कर्तव्य आहे. आणि त्यामुळे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या

वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार आम्ही करत आहोत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  असलम बिनसाद,उपाध्यक्ष जावेद इनामदार,जुबेर भाई बिनसाद, ऍडव्हकेट अजित डोके, कलीम बिनसाद, प्रशांत गौड, सुजित कडू, सुरेश वालतुरे, ललिता ताथेंड, सलीम बिनसाद,कृष्णा धुवाविया,बाबा दुशिंग,नूर महंमद पटेल, रुपेश बोराडे, गौरव काळे, अहमदनूर कुरेशी, शकील पठाण,अबूबकर बिनसाद, शोएब पटेल,पत्रकार कासिम शेख, शफिक शेख,एजाज सैय्यद त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी उपिस्थत होते. 


रामगड (प्रतिनिधी)-  रामगड येथे सर्व रोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी शिबिराचे उद्घाटन करताना न्यु लाइफ केअर हॉस्पिटल श्रीरामपूर .डाॅ. विवेक राउत. डाॅ. उज्वल कुमार धुमाळ. डाॅ. शोएब शेख. सिस्टर रिचेल. अस्लम शेख. (मॅनेजिंग डायरेक्टर. सोहेल दारूवाला. डाॅ. अल्तमश शेख. वसिम शेख. तसेच जि.प.सद्स शरद नवले.  उपसरपंच. अभिषेक खंडागळे. ग्रामपंचायत सदस्य.मुस्ताक शेख. मुबारक पठाण. भैय्याभाई. लैला दादी. समदभाई. विशाल अंबेकर. अमिन सैय्यद. गफूर शेख. रफीक दादा. अभिषेक खंडागळे उपसरपंच आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपन कोरोनाच्या  महामारी ला सामोरे गेलो. दुर्लक्ष होउ नये. तसेच आरोग्य कामास आपन प्राधान्य देऊ. सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. व.जि. प.सदस्य.शरद नवले.साहेब. यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या हॉस्पिटल चे हे प्रथमच शिबिर आहे. ग्रामीण भागात आरोग्य. सहकारी संस्था काम करत आहे.बेलापुरात आपन कोविड सेंटर चालु केले होते. 233 रूग्णांना या मार्फत सेवा दिली. तसेच अदिवासी बांधवाना लस देणार. सर्वांचे आरोग्य कार्ड तयार करनार. त्यांचे सर्वे चालु आहे. 25 ते 30 हजार लोक संखेच्या गावात आरोग्य व्यवस्ता सुरळीत आहे. मागील काळातही येथे स्किन रोगावर नियंत्रण शिबीर घेऊन  स्किनचे औषधे मोफत दिली.कमीत कमी दरामधे औषधे आपन मिळुन दिली. यापुढेही असेच शिबिराचे आयोजन करनार आहे. असेही शरद नवले  म्हणाले. शेवटी सर्वांचे आभार अस्लम शेख यांनी मानले  त्या प्रसंगी महाराष्ट्र लघु व्रत पत्र व पत्रकार संघाचे बेलापुर शहरप्रमुख एजाज सैय्यद. उपप्रमुख मोहंमद अली सैय्यद. बेलापुर सचिव शफिक शेख पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष. कासम शेख पत्रकार समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहरमच्या पार्श्वभूमीवर आज कोठला परिसरामध्य तोफखाना पोलिसाच्या पथकाने पाहणी करून आढावा घेतला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योनी गडकरी यांनी कोरोना नियम सर्वानाच लागू आहे त्यामुळे या ठिकाणी दर्शन व्यवस्था ही बंद करण्यात आलेली आहे. जर कोणी नियनांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.नगर शहरामध्ये मोहरम सण हा मोठा उत्सवामध्ये दर वर्षी साजरा केला जातो, गेल्या दोन वर्षापासून कोरोना चा विषय देशभरात नाही तर जगभरामध्ये सुरू आहे, या महामारीचे संकट अजूनही कमी झालेले नाही त्यातच नगर जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना संख्या ही वाढत चाललेली आहे. आज कोठला परिसरामध्ये ज्या ठिकाणी सवारी स्थापन केली जाते त्या ठिकाणची पाहणी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे या ठिकाणी कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाहणी केली तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा सुद्धा केली.यानंतर बोलताना तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योती गडकरी यांनी कोरोनाची महामारी अजून संपलेली नाही. राज्य शासनाने जे  नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन सर्वांनीच केले पाहिजे, याबद्दल दुमत नाही. आजही धार्मिक स्थळे सर्वत्र बंद आहे. त्या पद्धतीनुसार या ठिकाणी सुद्धा नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे,तरी कोणीही दर्शनासाठी येणार असेल तर त्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही. व त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्यांनी  नियनांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला, वास्तविक पाहता सण साजरे करताना नागरिकांनी सुद्धा त्याचे पालन केले पाहिजे या ठिकाणी आम्ही पोलिस बंदोबस्त लवकरच तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .या सणाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर सुद्धा बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. लवकरच बैठक होऊन पुढील विषय हाताळला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


नेवासा (तालुका प्रतिनिधी)नेवासा फाटा विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्याची कार्यकारणी  जाहीर करण्यात आली.महासचिव विश्वासराव आरोटे  यांच्या हस्ते  नेवासा तालुका अध्यक्ष पदी मोहन गायकवाड, तालुका उपाध्यक्ष पदी गणेश दारकुंडे, विकास बोर्डे, कार्याध्यक्ष अशोक तुवर,  इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका प्रमुख मंगेश निकम , उपाध्यक्ष काकासाहेब नरवणे ,  पोर्टल मीडिया प्रमुख ऋषभ तलवार, मार्गदर्शक मकरंद देशपांडे, राम शिंदे, तालुका संघटक सोमनाथ कचरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख सतिष उदावंत, पवन गरुड , ग्रामीण विभाग प्रमुख बाळासाहेब पंडित , नेवासा शहर सचिन कडू, महेश दवढे,  दत्तात्रय शिंदे, कायदेविषयक सल्लागार मयूर वाखुरे, प्रतीक तलवार, निवडीचे पत्र देण्यात आले या वेळी नेवासा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी निवडी बद्दल  मा नामदार शंकरराव गडाख साहेब, प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे,  प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे  जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे    जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनकर, तसेच राजकीय प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकारांनी यांनी अभिनंदन केले आहे पत्रकारांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहणारं व  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणार  मोहन गायकवाड --- नेवासा तालुका अध्यक्ष.


कोल्हार :-(प्रतिनिधी)  आज सकाळी कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदिवरील जुन्या पुलावर निबे वस्ती च्या समोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदरची घटना कळताच कोल्हार पोलीस स्टेशनचे श्री.लबडे साहेब व श्री कुसळकर साहेब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृत व्यक्ती जवळील सामानाची पीशवी तपासली असता त्यात मिळुन आलेल्या डायरीवरून त्यांनी मृत व्यक्तीकोन आहे याचा शोध लावला.सदर मृत व्यक्तीचे नाव हे किसन यादवराव साबळे असुन ते मु/पो- पानेवाडी, ता- घनसांगवी, जिल्हा- जालना येथील होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget