ऐ.पी.अँटोमोटीव्हा या स्पीड गव्हर्नर व्यवसाय प्रमाणपत्र धारकावर कारवाई न केल्यास जरीया फाऊंडेशनचा उपोषणाचा इशारा.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी )- एकाच क्यू आर कोडच्या अधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ऐ पी अँटोमोटीव्ह या स्पीड गव्हर्नरने वाहनधारका बरोबरच शासनाचीही फसवणूक केली असुन संबधीतावर कारवाई न केल्यास प्रादेशिक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जरीया फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला आहे. जरीया फाऊंडेशनच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की ए पी अँटोमोटीक यांना स्पीड गव्हर्नर म्हणून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचा दुरुपयोग करुन त्यांनी शासनाची फसवणूक तर केलीच शिवाय भरमसाठ पैसे घेवून वाहनधारकाची देखील फसवणूक केलेली आहे प्रमाणपत्र देताना एकाच क्यू आर कोडचा वापर करुन अनेकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यात शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे असताना काही अधिकारी त्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत गंभीर दोष आढळले असताना त्याचा परवाना निलंबीत केला होता परवाना निलंबीत असतानाही संबधीताने अनाधिकाराने दोन वाहनधारकांना प्रमाणपत्र दिले आहे या सर्व बाबींची चौकशी होवुन संबधीतावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तो कारवाई केल्यास धमक्या देत आहे अशा व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी नाही तर आम्हाला उचित न्याय मागण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति परिवहन मंत्री प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन आयुक्त यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.