बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापूरकरांचा एक हात मदतीचा या संकल्पने प्रमाणे जि. प. सदस्य शरद नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवकांनी विविध जिवनावश्यक वस्तू गोळा करुन पूरग्रस्त भागात स्वतः गरजुंना वाटप करुन बेलापूरकरांची मदत पुरग्रस्तापर्यंत पोहोचवली.कोल्हापूर सांगली येथे पुराने थैमान घातले अनेक कुटुंब उध्वस्त झाली प्रपंच उघड्यावर पडले दररोजच्या बातम्यांनी अनेकांची मने हेलावून टाकली बेलापूरकरातील माणूसकी जागी झाली पूरग्रस्तांना आपली छोटीसी का होईना मदत पोहोचली पाहीजे त्या करीता जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तरुण कार्यकर्त्यांना मदत गोळा करण्याचे अवाहन केले अन गावातील तरुण कार्यकर्ते साहेबराव वाबळे विशाल आंबेकर राजु काळे निलेश कर्पे आदित्य जाधव अविनाश अमोलीक मोहसीन सय्यद विक्रम नाईक शफीक बागवान आदिंनी गावातुन धान्य तांदुळ बिस्कीट पुडे किराणा सामान कपडे भांडे सर्व एका ठिकाणी जमा करुन त्याचे किट तयार केले त्यात पाणी पाऊच पाणी बोटल याचाही समावेश होता हे सर्व सामान दिनेश बैरागी यांच्या टेम्पोत भरुन दिनेश बैरागी हे विशाल आंबेकर रवि कडू सचिन वाघ युवराज रावताळे सुनिल साळूंके सुरज बडे धनेश ढोले लखन बडे महेश वैद्य गंगाराम झीटे यांना घेवुन रात्री बारा वाजता गावातुन निघाले सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील वाळवा यां गावी पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटूंब उघड्यावर पडली होती तेथील सरपंच शुभांगी माळी उपसरपंच पोपट अहीर विकास चव्हाण प्रदिप कोळेकर दिग्वीजय डवंग अमित सुर्यवंशी संग्राम तुपे वैभव शिंदे यांच्या उपस्थितीत मदत किटचे वाटप करण्यात आले त्या नंतर ही टिमकील्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावी पोहोचली तेथील सरपंच शालन पाटील उपसरपंच विठ्ठल गाताडे कार्यकर्ते चेतन चौगुले संदीप गुदले मियालाल पटेल वैशाली मोरे अक्षय कुसान दादु मोरे उमेश शिंदे मनोज बुगटे सदाशिव सांगले यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचे साहीत्य देण्यात आले गावातील कार्यकर्त्यांनी खासदार राजु शेट्टी यांच्याशी संपर्क साधला इतक्या लांबुन माणुसकीचा झरा या गरजवंता पर्यत पोहोचविला त्या बद्दल बेलापूरकरांना खासदार शेट्टी यांनी धन्यवाद दिले पूर परिस्थीतीचा जास्त फटका ईंगळी या गावास पोहोचला होता अनेक कुटूंबाचे होत्याचे नव्हते झाले होते ही परिस्थितीत पहाताच मदत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांच्याही डोळ्यात अश्रु उभे राहीले.

Post a Comment