Latest Post

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यांमध्ये गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांनी गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचे दिसून आले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने श्रीरामपुर, नेवासा, राहुरी मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून 81 ठिकाणी छापे टाकून अवैध शस्त्रांचा शोध घेत कारवाई केली. 

       या कारवाईमध्ये 7 गावठी कट्टे ,8 जिवंत काडतुसे ,3 तलवारी असा एकूण 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.तीन तालुक्यात केलेल्या कारवाईमध्ये एकूण 14 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. 

       सदर कारवाईमध्ये १)आकाश उर्फ देवात जालिंदर लष्करे रा.नेवासा फाटा, नेवासा २)रुपेश पुनमचंद साळवे रा.मुक्तापुर, नेवासा ३)शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले, नेवासा ४)लक्ष्मण साधू अडांगळे रा. गंगानगर, नेवासा ५)शाहरुख निमेश पटेल रा.संजय नगर, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर ६)अनिल बाळू मिरजे रा.देवळाली, राहुरी ७)कैलास रामू धोत्रे रा.देवळाली, राहुरी ८)काशिनाथ बबन शिंदे रा.वैदुवाडी, सावेडी, नगर ९)शाहरुख ऊर्फ चाटया जावेद शेख रा.घोडेगाव, नेवासा १०)अनिल कचरू साळुंखे रा.गंगापूर, औरंगाबाद ११) मयूर दीपक तावर रा.वार्ड नंबर 3, श्रीरामपूर १२)नागेश पाराजी जाधव रा.देवळाली, राहुरी १३)सिद्धार्थ अशोक पठारे रा.गंगापूर, औरंगाबाद आणि एक अल्पवयीन आरोपी यांना जेरबंद करण्यात आले आहे. 

       या कारवाईसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 25 पोलीस उपनिरीक्षक व 350 पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले होते. पकडलेल्या काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत.

         पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय अहमदनगर येथील पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरीत्या सदरची कारवाई केली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेतील शिपाई महेश उध्दवगिरी गोसावी (वय ५० वर्ष ) यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली आहे.  येथील महेश उध्दवगिरी गोसावी यांनी राहत्या घरी सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली ते सकाळी अंघोळीला बाथरुममध्ये गेले होते तेथेच त्यांनी स्वतःच्या हाताने धारदार शस्राने गळा कापून आत्महत्या केली बराच वेळ होवुनही ते बाहेर येत नसल्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा उघडून पाहीला असता जखमी  अवस्थेत असल्याचे लक्षात आले त्यांना तातडीने साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले तेथे डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे बेलापुर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालादार अतुल लोटके हे तपास करत आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-सार्वजनिक शौचालयाकडे जाणारे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील अनेक महीलांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे .             ग्रामपंचायत बेलापुर यांना दिलेल्या निवेदनात सौ भारती लांबोळे यांनी पुढे म्हटले आहे की सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले असुन वांरवार मागणी करुन देखील या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संबधीतांनी अतिक्रमण करुन रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी समजावुन सांगुन देखील संबधीत रस्ता बंद करण्याची धमकी देत आहेत.त्यामुळे महीलांची कुचंबना होत आहे . या ठिकाणी अनेक वेळा महीलांना अरेरावी करण्यात आलेली आहे .या बाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रारी करुन देखील त्याची गंभीरतेने दखल न घेतल्यामुळे संबधीताची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास सोमवार दिनांक २ आँगस्ट रोजी साकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी अहमदनगर ,जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर, जिल्हा परिषद अहमदनगर  ,उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर ,तहसीलदार श्रीरामपुर , पंचायत समीती श्रीरामपुर  ,श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, बेलापुर औट पोस्ट आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर सौ भरती लांबोळे ,मंगल रोडे ,कल्पना तांबे, पुजा सातापुते ,सलमा शेख, वंदना मोरे ,सुनिता रणवरे, बिसमील्लाह सय्यद, रेशमा आतार, संगीता औटी, माधुरी बैताडे, अंजना साळवे ,नंदा बैताडे ,लक्ष्मीबाई पठारे, रेखा मोरे, सुनिता मोरे ,लहानबाई शेजुळ, सुनिता साटोटे, राणी जगताप ,लिलाबाई जगताप, हिराबाई मोरे, यमुनाबाई कुमावत ,सुशिला कुमावत आदिसह अनेक महिलांच्या सह्या आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-खोदकाम करताना सापडलेल्या गुप्त  धनाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी या मागणी करीता मनसेच्या वतीने  सुरु केलेले उपोषण भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या मध्यस्थीने व पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या अश्वासना नंतर मागे घेण्यात आले. बेलापुर येथे खटोड यांच्या निवासस्थानी खोदकाम करताना गुप्तधन सापडले होते त्यात मोठ्या प्रमाणात सोने असल्याची चर्चा होती खोदकाम करणाऱ्या मजुरांनी देखील  विविध वृत्तवाहीनीला मुलाखत देताना सांगीतले होते त्यानंतर केवळ चांदीच शासनाच्या हवाली करण्यात आली मजुरांनाही लालच देण्यात आली त्यामुळे या सर्व घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करुन सर्व गुप्त धन शासनाने ताब्यात घ्यावे व तो सर्व निधी बेलापूरच्या विकासाकरीता वापरण्यात यावा या मागणी करीता मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव तुषार बोबडे उपाध्यक्षसुरेश जगताप डाँक्टर संजय नवथर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक प्रविण कार्ले गोरक्षनाथ येळे भास्कर येळे करण कापसे हे उपोषणास बसले होते काल रात्री १० वाजता भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या उपस्थितीत  श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपले म्हणणे वरीष्ठांना कळवू आपण उपोषण सोडावे  अशी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देवून आपण उपोषण सोडत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी जाहीर केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- घरातून रागारागाने निघुन चाललेल्या दोन लहान मुलांना सामाजिक कार्यकर्ते  व पोलीसांच्या जागृकतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असुन बालकांना पाहून आई वडीलांचा जिव भांड्यात पडला घरात वडील रागावले म्हणून गायकवाड वस्तीवरील सुनिल कर्पे यांची लकी कर्पे वय ११ वर्ष व साहील कर्पे वय १३ वर्ष हे सायंकाळी पिशवीत सामान भरुन पायी बेलापूरला आले नगर रोडवर विशाल आंबेकर अमोल खैरे अजय अनाप सागर जावरे बबलू कामठे राहुल माळवदे सौरभ कापसे ओंकार साळूंके हे गप्पा मारत बसले असता ही दोन लहान मुले अंधारात चाललेली दिसली विशाल आंबेकर व राहुल माळवदे यांना शंका आली त्यांनी त्या मुलांची विचारपुस केली असता आम्ही मनमाडहून आलो असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही घटना घातली त्यांनी तातडीने दोन्ही मुलांना घेवून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले त्या मुलांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर पोलीस कान्स्टेबल पोपट भोईटे यांनी दोन्ही मुलांना विश्वासात घेतले असता आम्ही गायकवाड वस्तीवर राहणारे असुन वडीलांनी मारल्यामुळे रागारागाने मनमाडला जाणार आहोत असे सांगितले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मुलांच्या आई वडीलांना निरोप दिला तिकडे आई वडीलही मुलांना शोधत फिरत होते सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हवालदार अतुल लोटके रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे निखील तमनर यांनी आई वडीलांना पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या समोर हजर केले त्या लहान मुलांना आई वडीलांच्या स्वाधीन केले तसेच मुलांची काळजी घेण्याचीही सक्त ताकीद दिली गावातील सामाजिक कार्याकर्त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे रागाने चाललेली दोन लहान मुले पुन्हा आई वडीलांना परत मिळाली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी संप काळात पशु धनाचे नुकसान होवू नये म्हणून  आपली सेवा सुरुच ठेवावी ही  जि प सदस्य शरद नवले यांची  विनंती रुरल व्हेटर्निटी प्रँक्टीशनर्स असोसिएशनने मान्य केली असल्याची माहीती संघटनेचे उपाध्यक्ष नितीन शेलार यांनी दिली आहे. शासकीय प्रमाणपत्र मिळावे नोंदणी प्रमाणपत्र मिळावे शासकीय पशुवैद्याकीय भरती प्रक्रिया तातडीने राबवावी आदीसह विविध मागण्याकरीता पशू वैद्यकिय व्यवसायीकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता संप काळात पशु धनाचे नुकसान होवु नये म्हणून जि प सदस्य शरद नवले यांनी रुरल व्हेटर्निटी प्रँक्टीशनर असोसिएशनच्या सर्व अधिकाऱ्यांना  विनंती केली की आपण संपावर गेल्यास शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होवू शकते अनेक पशु पालकांचे भवितव्य आपल्या हातात आहे आपल्या मागण्या रास्त असल्या तरी आपण संपावर गेल्यास गोपालकाचे कधीही भरुन न येणारे नुकसान होवु शकते त्यामुळे आपण संप काळातही गोपालकांना सेवा द्यावी आपल्या मागण्या शासन स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु अशी विनंती  जि प सदस्य शरद नवले यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केली त्यांची  विनंती मान्य करुन सर्व पशु वैद्यकीय व्यवसायीकांनी आपली सेवा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक दुग्ध व्यवसायीकांनी जि प सदस्य शरद नवले व  पशु वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष सागर अभंग डाँक्टर संजय फरगडे नितीन शेलार यांना धन्यवाद दिले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावातील खटोड यांच्या घरी सापडलेले गुप्त धन शासकीय नियमानुसार पंचनामा करुन शासनाच्या ताब्यात दिलेले असतानाही काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असुन शासनाने योग्य ती दखल घेण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली आहे                                        ग्रामस्थ व मारवाडी समाजाच्या वतीने मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की हरिनारायण प्रेमसुख खटोड यांच्या घरी खोदकाम करताना एका घड्यात चांदीची पुरातन नाणी सापडली ती त्यांनी प्रामाणिकपणे लेखी अर्ज करुन  श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ताब्यात दिली असे असताना काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहे काही अति उत्साही लोक या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असुन यामुळे गावातील वातावरण खराब होवू शकते तरी या प्रकरणी आपण योग्य ती  दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी  उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर  तहसीलदार श्रीरामपुर पोलीस निरीक्षक श्रीरामपुर जिल्हाध्यक्ष माहेश्वरी समाज यांना देण्यात आलेली आहे या निवेदनावर सर्वश्री रामेश्वर सोमाणी शरद सोमाणी प्रशांत लढ्ढा  दिपक सिकची विशाल दरक गोपाल लढ्ढा प्रशांत बिहाणी सुभाष बिहाणी चैतन्य दायमा रविद्र खटोड दिलीप काळे अतुल राठी शैलेंद्र राठी सुरेशचंद्र राठी दिनेश लखोटीया संतोष ताथेड गोविंद सोमाणी प्रकाश राठी राजेंद्र सीकची संजय लढ्ढा पुरुषोत्तम मुंदडा राजेंद्र मुंदडा रामप्रसाद चांडक पवन चांडक किशोर चांडक हरिप्रसाद सिकची राजेंद्र सिकची चेतन सिकची चेतन दायमा जगन्नाथ राठी सुनिल लढ्ढा सुविजय सोमाणी सचिन बिहाणी आदिंच्या सह्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget