Latest Post

राहुरी प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिका सभागृहात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील  विविध विषयांवरील आढावा बैठकीत आ. लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. आ. कानडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवताना लोकप्रतिनिधींबरोबर ‘प्रोटोकॉल’ पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर संतप्त झालेल्या दुधाळ यांनी माझी 25 वर्षे सेवा झाली. आम्हाला जबाबदारी समजते. असे सांगून धावून बोलू नका, असे उलट उत्तर देऊन आ. कानडे यांची उलट तपासणी घेतली. त्यामुळे या आढावा बैठकीत  तणावपूर्ण शांतता निर्माण होऊन मूळ विषयांना बगल मिळून उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांची चांगलीच करमणूक झाली.दरम्यान, सार्वमतच्या देवळालीत दरोडाप्रकरणी वृत्तावर आ. कानडे यांनी दुधाळ यांना जाब विचारून त्यांना चांगलेच धारेवर धरले. दरोड्याच्या घटनेत काय प्रगती झाली? याची विचारणा केली. मात्र, यावर दुधाळ यांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाली. खडाजंगीनंतर आढावा बैठकीत ‘लेटलतीफ’ ठरलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना आ. कानडे यांनी बैठकीतून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर दुधाळ यांनी मधूनच आढावा बैठकीचे कामकाज अर्धवट सोडून काढता पाय घेतला. आमदारांबरोबर ‘प्रोटोकॉल’ न पाळता त्यांच्याबरोबर अरेरावी करणार्‍या दुधाळ यांच्यावर आमदारांकडून काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.श्रीरामपूर मतदारसंघातील देवळाली प्रवरासह प्रवराकाठच्या 32 गावांतील जिव्हाळ्याच्या विषयावर आ. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच आ. कानडे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकार्‍यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. पोलीस निरीक्षक दुधाळ हे तावातावाने आढावा बैठकीतून निघून गेल्यानंतर पुन्हा विस्कळीत झालेल्या कामकाजाला सुरूवात झाली.

अहमदनगर ( प्रतिनिधी )  मंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरी  करनारा आरोपी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद दि १०/०७/२०२१ रोजी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली की , दि ० ९ / ०७ / २०२१ रोजी रात्री च्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराच्या संरक्षण जाळीवरुण आत प्रवेश करुन शनिमंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरुन घेवुन गेला आहे . वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गुन्हा रजि नं .४८५ / २०२१ भा.दं.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री.राकेश मानगांवकर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की , गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वेस्टेशन परिसरात चोरीतील दागीने विक्री करण्याकरिता आलेला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने रेल्वेस्टेशन परिसरात गुन्हे शोधपथकासह सापळा लावुन संशयित इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रामदास विष्णु सावंत रा जांबुत ता संगमनेर जि अहमदनगर असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्याची अंगझडती घेता.त्याचेकडे मंदिरातुन चोरी केलेले चांदीचे दागीने मिळुन आले आहेत . तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक पवार हे करत आहेत . सदरची कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील  मा.अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . विशाल शरद ढुमे , यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर , गुन्हेशोध पथकाचे पोना योगश भिंगारदिवे , पोना गणेश धोत्रे , पोना नितीन शिंदे , पोना शाहीद शेख , पोना सागर पालवे , पोकाँ सुजय हिवाळे , पोकाँ भारत इंगळे , पोकॉ सुमित गवळी , नितीन गाडगे. कैलास शिरसाट. तानाजी पवार प्रमोद लहारे. पठाण. यांनी सदरची कारवाई केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि श्री.संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत आरोपी सर्फराज बाबा शेख हा नवी दिल्ली परीसर जुनैबनगर मज्जिदजवळ वार्ड नं.२ श्रीरामपूर येथे कमरेला गावठी कटटा लावुन फिरत आहे.अशी गोपनीय बातमी मिळालेवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडले. सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा ३०,०००/- रूपयाचा मुददेमाल मिळुन आला आहे.या करीता नमुद आरोपीविरुदध पोकॉ/१२१० किशोर सुभाष जाधव नेम- श्रीरामपूर शहर पोस्टे यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि नं. ॥ ४६३/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपीस मा.न्यायालयासमोर हजर केले असता त्याला मा.न्यायालयाने दिनांक १६/०७/२०२१ पावेतोपोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.आरोपी सर्फराज बाबा शेख वय-१९ वर्ष रा.बीफ मार्केटजवळ वार्ड नं.२ श्रीरामपूर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुदध यापुर्वी खालीप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.१) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि.नं. 1 १११८/२०२० भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे.२) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि.नं. ॥ ४६३/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५ प्रमाणे सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीमती दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री.संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री.संजय सानप, पोसई कृष्णा घायवट,पोहेकॉ/१२०३ जोसेफ साळवी, पोना/१४५२ करमल, पोकॉ/१२१० किशोर जाधव,पोकॉ/६५१ राहुल नरवडे, पोकॉ/१७३ सुनिल दिघे,पोकॉ/२२७० पंकज गोसावी,पोकॉ/२५३१ महेद्र पवार, यांचे पथकाने केलेली आहे.


श्रीरामपूर – १४ जुलै २०२१ रोजी शहरातील नॉर्दन बँच, दहाव्याचा ओटा परिसरात, दोन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी, येणार असल्याची गुप्त माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली असता.पोलीस निरीक्षक कटके यांनी, मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकार, व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या पथकाने हरातील नॉर्दन बँच, दहाव्याचा ओटा परिसरात सापळा रचून, त्यानंतर काही वेळातच दोन इसम हे दहाव्याचा ओट्या जवळ आली, या दोन्ही इसमांच्या संशयास्पद हालचालीं लक्षात आल्याने, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने,मोठ्या शिथापीने आरोपी प्रेम पांडूरंग चव्हाण, वय वर्ष ३७, राहणार बाजारतळ, दुबे गल्ली, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर, व आकाश राजू शेलार, वय वर्ष २१, राहणार चितळी, तालुका राहाता या दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांच्या जवळून,२ गावठी बनावटी कट्टे व सात जिवंत काडतूसे असे एकूण ६३,५००/-रु. किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून. २ गावठी कट्टे व ७ जिवंत काडतूसे बेकायदेशिरित्या बाळगून विक्रीसाठी आणल्या प्रकरणी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. 

बेलापुर  (वार्ताहर )-श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथील व्यापारी राजेश  खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या  हंड्यात सापडलेल्या गुप्त धनात केवळ चांदीची  ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १०२० नाणी असे अंदाजे  सापडलेलेले सुमारे ८ लाख रुपये किमतीचे गुप्तधन सापडले असुन  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहे.  

याबाबत  गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून दबक्या आवाजात सुरु  होती. सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा  गावात झाल्या नंतर    बेलापूर येथील राजेश खंटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे  रितसर अर्ज केला त्यात त्यांनी म्हटले   की माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार पंचनामा करुन ते ताब्यात घेण्याची  विनंती केली होती. त्या नंतर जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र  भोसले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना संबंधित ठिकाणी जावुन ते गुप्तधन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या 

त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गावात येवुन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुप्तधनाचा पंचनामा केला आहे. त्या पंचनामात त्यांना ११ किलो ६  ग्राम चांदी मिळुन आली त्यात चार आणे किमतीची ४६ नाणी होती आठ आणे किमतीची ५८ नाणी तर दोन अरबी नाणी व एक रुपये किमतीची ९१४ नाणी अशी एकुण १०२०नाणी आढळून आली असून सदर गुप्त धन तहसीलदार पाटील यांनी  ताब्यात घेतले आहे,या वेळी पंच म्हणून पत्रकार देविदास देसाई पोलीस पाटील अशोक प्रधान विष्णूपंत डावरे सुवर्णकार अनिल मुंडलीक उपस्थित  होते या वेळी तहसीलदार पाटील यांच्या समवेत मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे पोलीस उपनिरीक्षक समाधान हवालदार अतुल लोटके मिलींद दुधाळ तुळशिराम शिंदे  अरुण अमोलीक पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम अजया डाकले रविंद्र खटोड सुधीर नवले उपस्थित होते.खोदकाम करतान आम्हाला तेथे हंडा सापडला  त्या हंड्यात चांदी बरोबर खाली सोन्याची नाणी होती आम्हा तिघांनाही तो उचलत नव्हता त्या वेळी आम्हाला पैसे देण्याचे अमिष दाखविले होते नंतर नकार दिला त्यामुळे आम्ही तक्रार केली          सुनिल गायकवाड  खोदकाम करणारे मजुर                                   खोदकाम करताना चांदीची नाणी सापडताच नेमके काय करावे अशा मनःस्थितीत काही कालावधी  गेला मग कायदेशिर सल्ला घेवुन आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार आज तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करुन सर्व चांदीची नाणी शासकीय जमा करण्यात आली  राजेश खटोड.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार आहे.या बाबत हाती आलेली माहीती अशी की बेलापुरगाव ही जुनी व मोठी बाजारपेठ होती त्या काळी धन हे सोन्याच्या स्वरुपात जमा करुन जमिनीत पुरुन ठेवले जात असत  गावात असे अनेक जुने वाडे आहे  अशाच एका जागेचे खोदकाम काही मजुर करत होते त्यांना अचानक खोदताना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला त्यात बरेच सोने चांदी भरलेले होते तो हांडा घरमालकाने ताब्यात घेतला या बाबत खोदाकाम करणारांना काही अमिष दाखविण्यात आले होते परंतु ते पुर्ण न झाल्यामुळे गुप्तधनाचे बिंग फुटले अन या गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर  बोभाटा झाला संबधीतांनी या ठिकाणी चांदी सापडली असल्याचा जिल्हाधिकारी यांना कळविले असुन काही चांदी घेवुन संबधीत नगरला गेले आहेत परतु   जिल्हाधिकारी हे पुरातत्व विभागाला आदेश करतील त्या नंतर महसुल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करुन ते धन महसुलच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगीतले आहे बेलापूरात गुप्तधन सापडल्याची चर्चा जिल्हाभर पसरली आहे त्यात फक्त चांदी असल्याचाच दावा करण्यात येत आहे ही घटना घडून तेरा चौदा दिवस झाले आहे मग इतक्या दिवस सर्वा जण गप्प का होते याची साखोल चौकशी झाल्यानंतर बरेच काही मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे या गुप्त धनाची चर्चा झाल्यानंतर पोलीसही सावध झाले असुन त्यांनीही चौकशी सुरु केली आहे.

संक्रापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर मतदार संघात आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने ५० वर्ष रेंगाळलेली कामे सुरु करण्यात आली असुन कै जयंतराव ससाणे साहेबांचे तालुक्याच्या विकासाचे राहीलेले अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार लहु कानडे यांनी दिली                                        मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत संक्रापुर ते लांडेवाडी या एक कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमीपुजन आमदार लहु कानडे यांच्या हस्ते तसेच करण दादा ससाणे सचिन गुजर ईंद्रनाथ पा थोरात ज्ञानेश्वर मुरकुटे सुधीर नवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी करण ससाणे हे होते   या वेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की नेवासा फाटा ते बाभळेश्वर या १२५ कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात करण्यात आली असुन मतदार संघातील ६५ रस्त्याच्या कामासाठी दहा लाख रुपये निधी दिलेला आहे तालुक्यात दहा कोटी रुपयाच्या कामांचे उद़्घाटन करण्यात आले आहेत २० महीन्यात भरपुर कामे सुरु झाली असुन प्रत्येक गावात जावून तेथील कामे करणार आहे आपण जो विश्वास दाखविला त्याची परतफेड विकास कामांच्या रुपाने करणार आहे   मध्यंतरी आपण कोरोना सारख्या संकटाचा सामना केला दुसऱ्या लाटेत आपले अनेक मित्र नातेवाईक आपल्याला सोडून गेले आता तिसऱ्या लाटेत आपले नुकसान होवु नये या साठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे असेही ते म्हणाले या वेळी करण ससाणे सचिन गुजर संजय जगताप पत्रकार देविदास देसाई आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी वैभव गिरमे दवणगावचे सरपंच मेजर खपके गंगापुरचे सरपंच सतिश खडके ज्ञानेश्वर कोळसे दादा महाडीक शिवाजी होन संक्रापुर सोसायटीचे चेअरमन नबाजी जगताप पंडीतराव थोरात युनुस शेख अकील शेख कादरभाई शेख द्वारकनाथ चव्हाण काँन्ट्रक्टर नीखील जगताप उपअभियंता घोलप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकलाड शाखाधिकारी संसारे दावल शेख लक्ष्मण आहेर डाँक्टर सुरेश जगताप ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव सौ शांताबाई जाधव रोहीदास खपके ग्रामसेवक प्रभाकर चव्हाण आप्पासाहेब बोरावके तुकाराम चव्हाण कचेश्वर जगताप अर्जुन होन कल्याणराव जगताप दादासाहेब जगताप सुनिल बोरावके राजु थोरात राजेंद्र जगताप संजय होन चंद्रभान जगताप किशोर जगताप कचेश्वर जगताप पापा शेख शकीला शेख हिराबाई जगताप ज्ञानदेव भांड सुधीर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच संजय जगताप यांनी केले तर महेबुब शेख यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामराव होन यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget