याबाबत गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून दबक्या आवाजात सुरु होती. सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात झाल्या नंतर बेलापूर येथील राजेश खंटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केला त्यात त्यांनी म्हटले की माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार पंचनामा करुन ते ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्या नंतर जिल्हाधिकारी डाँक्टर राजेंद्र भोसले यांनी श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना संबंधित ठिकाणी जावुन ते गुप्तधन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या
त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गावात येवुन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुप्तधनाचा पंचनामा केला आहे. त्या पंचनामात त्यांना ११ किलो ६ ग्राम चांदी मिळुन आली त्यात चार आणे किमतीची ४६ नाणी होती आठ आणे किमतीची ५८ नाणी तर दोन अरबी नाणी व एक रुपये किमतीची ९१४ नाणी अशी एकुण १०२०नाणी आढळून आली असून सदर गुप्त धन तहसीलदार पाटील यांनी ताब्यात घेतले आहे,या वेळी पंच म्हणून पत्रकार देविदास देसाई पोलीस पाटील अशोक प्रधान विष्णूपंत डावरे सुवर्णकार अनिल मुंडलीक उपस्थित होते या वेळी तहसीलदार पाटील यांच्या समवेत मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे पोलीस उपनिरीक्षक समाधान हवालदार अतुल लोटके मिलींद दुधाळ तुळशिराम शिंदे अरुण अमोलीक पत्रकार दिलीप दायमा किशोर कदम अजया डाकले रविंद्र खटोड सुधीर नवले उपस्थित होते.खोदकाम करतान आम्हाला तेथे हंडा सापडला त्या हंड्यात चांदी बरोबर खाली सोन्याची नाणी होती आम्हा तिघांनाही तो उचलत नव्हता त्या वेळी आम्हाला पैसे देण्याचे अमिष दाखविले होते नंतर नकार दिला त्यामुळे आम्ही तक्रार केली सुनिल गायकवाड खोदकाम करणारे मजुर खोदकाम करताना चांदीची नाणी सापडताच नेमके काय करावे अशा मनःस्थितीत काही कालावधी गेला मग कायदेशिर सल्ला घेवुन आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार आज तहसीलदार यांच्या समक्ष पंचनामा करुन सर्व चांदीची नाणी शासकीय जमा करण्यात आली राजेश खटोड.
Post a Comment