संक्रापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर मतदार संघात आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने ५० वर्ष रेंगाळलेली कामे सुरु करण्यात आली असुन कै जयंतराव ससाणे साहेबांचे तालुक्याच्या विकासाचे राहीलेले अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार लहु कानडे यांनी दिली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत संक्रापुर ते लांडेवाडी या एक कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमीपुजन आमदार लहु कानडे यांच्या हस्ते तसेच करण दादा ससाणे सचिन गुजर ईंद्रनाथ पा थोरात ज्ञानेश्वर मुरकुटे सुधीर नवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी करण ससाणे हे होते या वेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की नेवासा फाटा ते बाभळेश्वर या १२५ कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात करण्यात आली असुन मतदार संघातील ६५ रस्त्याच्या कामासाठी दहा लाख रुपये निधी दिलेला आहे तालुक्यात दहा कोटी रुपयाच्या कामांचे उद़्घाटन करण्यात आले आहेत २० महीन्यात भरपुर कामे सुरु झाली असुन प्रत्येक गावात जावून तेथील कामे करणार आहे आपण जो विश्वास दाखविला त्याची परतफेड विकास कामांच्या रुपाने करणार आहे मध्यंतरी आपण कोरोना सारख्या संकटाचा सामना केला दुसऱ्या लाटेत आपले अनेक मित्र नातेवाईक आपल्याला सोडून गेले आता तिसऱ्या लाटेत आपले नुकसान होवु नये या साठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे असेही ते म्हणाले या वेळी करण ससाणे सचिन गुजर संजय जगताप पत्रकार देविदास देसाई आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी वैभव गिरमे दवणगावचे सरपंच मेजर खपके गंगापुरचे सरपंच सतिश खडके ज्ञानेश्वर कोळसे दादा महाडीक शिवाजी होन संक्रापुर सोसायटीचे चेअरमन नबाजी जगताप पंडीतराव थोरात युनुस शेख अकील शेख कादरभाई शेख द्वारकनाथ चव्हाण काँन्ट्रक्टर नीखील जगताप उपअभियंता घोलप सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकलाड शाखाधिकारी संसारे दावल शेख लक्ष्मण आहेर डाँक्टर सुरेश जगताप ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव सौ शांताबाई जाधव रोहीदास खपके ग्रामसेवक प्रभाकर चव्हाण आप्पासाहेब बोरावके तुकाराम चव्हाण कचेश्वर जगताप अर्जुन होन कल्याणराव जगताप दादासाहेब जगताप सुनिल बोरावके राजु थोरात राजेंद्र जगताप संजय होन चंद्रभान जगताप किशोर जगताप कचेश्वर जगताप पापा शेख शकीला शेख हिराबाई जगताप ज्ञानदेव भांड सुधीर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच संजय जगताप यांनी केले तर महेबुब शेख यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामराव होन यांनी केले.
Post a Comment