बेलापुर (प्रतिनिधी )-लसीकरण दरम्यान गोंधळ गडबड वशिलेबाजी होवु नये म्हणून बेलापुर ग्रामस्थांनी सुरु केलेला टोकण पध्दतीचा अवलंब जिल्ह्यात केला जात असतानाच बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातच या नियमाला हरताळ फासला गेला लसीकरणा दरम्यान गोंधळ होवु नये म्हणून सर्व ग्रामस्थांच्या विचाराने सकाळी सहा ते सात पर्यंत टोकण देवुन नागरीकांना जेवण करुन ठराविक वेळ दिली जायची त्यामुळे लसीकरणात नियोजनबध्दता आली होती लस केव्हा किती उपलब्ध होईल याची माहीती ग्रामस्थांना व्हाँटस्अप द्वारे दिली जात असे कालही लस नसल्याचा संदेश सर्वत्र प्रसारीत करण्यात आला अन सकाळी लस मिळणार असल्याचा मेसेज वैद्यकीय अधिकाऱ्यांना आल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात ठेवुन काहींनी लस देण्याकरीता बाहेरगावचे नातेवाईक मित्रपरिवार यांना बोलावून घेतले लस नसताना आरोग्य केंद्रात गर्दी कशी झाली हे पहाण्याकरीता काही नागरीक त्या ठिकाणी गेले असता लस आली असल्याचे सांगण्यात आले ही बाब जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सुनिल मुथा विशाल आंबेकर अजय डाकले यांना समजली ते त्या ठिकाणी गेले असता आरोग्य केंद्राबाहेर भली मोठी रांग लागलेली होती त्यात बहुतेक नागरीक बाहेरगावचे होते या बाबत जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सुनिल मुथा यांनी संबधीत डाँक्टर व आरोग्य सेवकांना जाब विचारला या वेळी सुनील मुथा यांनी आरोप केला की या प्राथमिक आरोग्य केंद्रात काही लोक नागरीकांकडून पैसे घेवुन त्याना लस देत आहेत टोकण पध्दतीमुळे देवाणघेवाण करण्यास अडचण येत असल्यामुळे काहींनी नियोजनबध्द कार्यक्रम करुन टोकण पध्दत उधळून टाकण्याचा डाव आखला असुन या ठिकाणी कुणालाही पैसे घेवुन लस दिली जात असेल तर माझ्याशी किंवा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी अभिषेक खंडागळे यांचेशी संपर्क साधावा असे अवाहन सुनिल मुथा यांनी केले आहे प्राथमिक आरोग्य केद्रात आज आलेली लस दुसऱ्या टप्प्यातील नागरीकांना देण्यात आली या वेळी उक्कलगावचेही ग्रामस्थ संतप्त झाले होते.
Post a Comment