मंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद.
अहमदनगर ( प्रतिनिधी ) मंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरी करनारा आरोपी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद दि १०/०७/२०२१ रोजी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली की , दि ० ९ / ०७ / २०२१ रोजी रात्री च्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराच्या संरक्षण जाळीवरुण आत प्रवेश करुन शनिमंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरुन घेवुन गेला आहे . वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गुन्हा रजि नं .४८५ / २०२१ भा.दं.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री.राकेश मानगांवकर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की , गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वेस्टेशन परिसरात चोरीतील दागीने विक्री करण्याकरिता आलेला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने रेल्वेस्टेशन परिसरात गुन्हे शोधपथकासह सापळा लावुन संशयित इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रामदास विष्णु सावंत रा जांबुत ता संगमनेर जि अहमदनगर असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्याची अंगझडती घेता.त्याचेकडे मंदिरातुन चोरी केलेले चांदीचे दागीने मिळुन आले आहेत . तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक पवार हे करत आहेत . सदरची कारवाई ही मा . पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील मा.अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . विशाल शरद ढुमे , यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर , गुन्हेशोध पथकाचे पोना योगश भिंगारदिवे , पोना गणेश धोत्रे , पोना नितीन शिंदे , पोना शाहीद शेख , पोना सागर पालवे , पोकाँ सुजय हिवाळे , पोकाँ भारत इंगळे , पोकॉ सुमित गवळी , नितीन गाडगे. कैलास शिरसाट. तानाजी पवार प्रमोद लहारे. पठाण. यांनी सदरची कारवाई केली आहे.








