Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी )-येथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले या वरुन एका जणा विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                        बेलापुर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा राजवाडा बेलापुर  याने राहत्या घरी बोलावुन प्रेम संबधाचे नाटक करुन शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले तसेच त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवुन डिसेंबर २०२० पासुन आजतागायत आरोपीचे राहते घरी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले या बाबतची फिर्यादीवरुन पोलीसांनी रोहीत भिंगारदीवे याचा विरुध्द भादवि कलम ३७६ ३५४ पोक्सो बाल लैंगिक अत्याचार कायदा या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एस आय कृष्णा धायवट हे करत आहे.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) - जिल्ह्यात चोर्‍या, दरोडे, हत्या, गावठी दारू, मावा, गुटखा विक्री ,चंदन तस्करी, अवैध वाळू उत्खनन इत्यादी अनैतिक व्यवसायात वाढ झाल्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली असून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा अन्यथा ठाण्याच्या प्रभारींना जबाबदार धरले जाईल असा  इशारा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खूलेआम अवैध व्यवसाय सुरुच आहेत अवैध व्यवसाय बंद करण्या बाबत नागरीकांच्या तक्रारी येवून देखील काहीच ठोस कारवाई झाली नाही पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंदे बंद करण्या बाबत सर्व पोलीस निरीक्षक यांना सुचित केले होते तरी देखील  जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरुच राहीले काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसुली सुरु झाली जिल्ह्यात वाळू माफीयांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे पोलीसांच्या आशिर्वादामुळे वाळू तस्कर महसुलच्या पथकांना देखील  दादा देइनासे झाले नागरीकांनी आंदोलन करुन देखील वाळू उपसा सुरुच आहे या अवैध धंद्यातूनच गुंडगीरी फोफावत चालली आहे अवैध धंद्याच्या वादातूनच मारामार्या खून होत आहेत हे वेळीच रोखणे गरजेचे आहे पारनेर मधील पॅरोलवरील आरोपीची हत्या, नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हल्ला, मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची कार्यरत टोळी अशा अनेक घटनांमधून पोलीस प्रशासनाबद्दलची भीती संपल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा मी पाठविलेल्या पथकाकडून कारवाई झाल्यास संबंधीत ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिला आहे.अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सर्व व्यवहार ठप्प होते. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्व उद्योग-धंदे सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांनी उचल खाल्ली आहे. नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. याला महसूलसह पोलिसांचे पाठबळ मिळत आहे, असे आरोप होत आहे. वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी हप्ते मागितले आहे. या हप्तेखोरीतून अनेक पोलीस कर्मचार्यांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली आहे. यामुळे पोलीस दलाची बदनामी होत आहे. अवैध दारू विक्री, मावा, गुटखा विक्री, चंदनतस्करी जिल्ह्यात सुरू झाली आहे. गावठी कट्ट्यांचा वापर करून गुन्हेगारीत वाढ होत आहे. या सर्व घटनांचा आढावा घेत अधीक्षक पाटील यांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. छापेमारी करून अवैध धंद्यावर कारवाई कराव्यात, अन्यथा माझे पथकाने एखाद्या पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली आणि त्यात अवैध धंदे उघडकीस आल्यास संबंधीत प्रभारी अधिकार्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस अधिक्षक यांनी कडक कारवाईचा पावित्रा घेतल्याशिवाय अवैध धद्यांना चाप बसणार नाही.

अहमदनगर प्रतिनिधी - नगर कल्याण रोड पासुन रेल्वे स्टेशन ब्रिजपर्यंत सीना नदीपात्रातील झाडाझुडपातअनेक प्रकारचे अवैद्य अनैतिक धंदे सुरू असताना पोलिस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषता गावठी दारूचा धंदा याठिकाणी तेजीत असून शहरात बेवारसपणे रस्त्याने हिंडणारे भिकारी जुगाारी यांचे या परिसरात मोठे वास्तव्य आहे यापूर्वीही परिसरात मृतदेह सापडले आहेत. या परिसरात काल दारू विक्रीच्या विक्रीच्या वादातुन एक घटना घडली आहे. या परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंगची आवश्यक आहे.नगर कल्याण रोड वरील सीना नदी पात्रातील परिसरात दारूच्या नशेत शाब्दिक बाचाबाची होऊन सायंकाळी सहाच्या दरम्यान दिलीप देवराम विदरकर रा. ठाणगे मळा याचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून करण्याचा मिनीनाथ उर्फ सोनू बळीराम बिज्जा रा. लोंढे बस्ती नालेगाव याने खुन केला स्थानिक गुन्हे शाखेने एक तासाच्या आत आरोपीस अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राहुल दिलीप विदरकर यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बुधवार दि. 16 जुनला दिलेल्या फिर्यादी राहूल दिलीप विरदकर यांनी म्हटले आहे की माझे वडील नामे दिलीप देवराम विरदकर रा. ठाणगे मळा, काल सायंकाळी 6.30 दरम्यान दरम्यान नगर - कल्याण रोड, अमरधामच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाच्या खाली शेडमध्ये सोनू बळीराम बिज्जा, यास दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने व त्याच्याविरुध्द पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी जाणार या कारणावरुन आरोपी याने माझ्या वडीलांना लाकडी दांडक्याने व डोक्यामध्ये दगड घालून जिव ठार मारले आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार सपोनि सोमनथ दिवटे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, सागर सुलाने यांना गुप्त खबर्‍याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, गुन्हयातील आरोपी मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा रा.लोंढेवस्ती नालेगांव, अहमदनगर हा गणेश नगर. नेप्ती नाका परिसर आला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नाम मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिंज्जा वय 27 वर्षे रा.लोंढेवस्ती नालेगांव,अहमदनगर यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्याच्या अनुशगाने विचारपूस केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीयास पुढील कार्यवाहीसाटी कोतवाली पोस्टेला हजर केल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर |प्रतिनिधी|-श्रीरामपूर शहरात एका विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लग्नाचे नाटक करुन तिच्यावर वेळोवेळी त्याच्या घरी लैंगीक अत्याचार केला. तसेच फ्लॅट घेवून देतो असे म्हणून 2 लाख 80 हजार रुपये पीडित महिलेकडून घेऊन तिची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एक़ा जणाविरुध्द फसवणुकीसह अ‍ॅट्रोसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील 45 वर्ष वयाच्या महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर बंटी आछडा मला म्हणाला की, माझे सोबत चोरून लग्न कर मी तुला राहण्यासाठी एक नवीन फ्लॅट घेऊन देतो, असे म्हणून आरोपी मला अशोकनगर परिसरातील एका मंदिरात घेऊन गेला. तेथे त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावून तू माझ्यासोबत लग्न केले आहे असे कोणालाही काही सांगायचे नाही, असे सांगितले. बंटी आछडा घरी एकटा असल्यावर मला घरी बोलावून घ्यायचा व माझेबरोबर बळजबरीने अत्याचार करायचा.तसेच अशोकनगर येथील त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर यासह इतर ठिकाणी नेऊन अत्याचार करायचा. मला नवीन फ्लॅट घेऊन देतो असे सांगून 2 लाख 80 हजार माझ्याकडून घेऊन मला फ्लॅट खरेदी करून दिला नाही. त्यासंबंधी विचारले असता फ्लॅटऐवजी नेवासा रोडलगत एक मोकळी जागा दाखवून ही जागा खरेदी करण्याचे सांगितले. तेव्हा मी चौकशी केली असता ती जागा दुसर्‍या लोकांची असल्याचे समजले. आरोपी बंटी आछडा याने पैसे घेतले, फ्लॅट दिला नाही व पैसेही परत दिले नाही.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी बंटी मोहन आछडा याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 376(2) (न) 420 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम 3 (1) (डब्ल्यू) 3 (2) (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहेत.


अहमदनगर|(प्रतिनिधी )तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वाघ याला अटक करून आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.कोतवाली पोलीस ठाण्याचा तात्कालिक पोलीस निरीक्षक विकास वाघ वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्याच्या विरोधात एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वाघ विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पसार असेला वाघ याला अटक करण्यात आली आहे.पहिल्या गुन्ह्यात हायकोर्टातून जामीन घेतल्यानंतर वाघ याच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करुन शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने नाशिक येथून वाघ याला अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

बेलापूर (प्रतिनिधी ) - शेतकरी व दुध उत्पादकांसाठी शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन जि.प.सदस्य शरद नवले यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जि.प. सेस फंडातून मंजूर मिल्किंग मशीन व मुक्त गोठा लाभार्थी शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, भास्कर बंगाळ, अँड.राजेंद्र सोमाणी, डॉ.व्ही.आर.धिमटे, अनिल गाढे, दादासाहेब कुताळ, मच्छिंद्र खोसे, विलास भालेराव, दादासाहेब शेळके, महेश कु-हे, विशाल आंबेकर, कर्मचारी श्री.शिंदे, प्रसाद लड्डा, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.नवले म्हणाले की, जनतेने आपल्याला दोन वेळा जि.प.सदस्य पदाची संधी दिली. त्यामुळेचआपण  कोट्यावधीचा निधी आणून विकास कामे करु शकलो . कृषी समितीच्या सभापतीपदावर काम करताना लोकांना शासकीय योजनांचा सर्वाधिक लाभ करुन दिला. आताही विकास कामासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे नवले यांनी सांगितले .

बेलापूर:(प्रतिनिधी  )- कोरोना काळात बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने चालविण्यात आलेले कोविड सेंटर हे सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे.या सेंटरमुळे शासन यंञणेवरील ताण हलका होवुन सर्वसामान्य कोवीडग्रस्तांनाही दिलासा मिळाला असल्याचे मत तहसीलदार प्रशांत पाटिल यांनी व्यक्त केले.                               बेलापूर येथील प्राथमिक शाळेतील मोफत कोवीड सेंटरचा तहसीलदार प्रशांत पाटील यांचे हस्ते धन्वंतरी पूजन  व वृक्षारोपण करुन समारोप करण्यात आला त्या वेळी बोलताना. तहसीलदार पाटील  म्हणाले की,कोरोना संकटाने सर्वांनाच चिंतेत टाकले होते.अशा संकट समयी बेलापूरकरांनी मोफत कोवीड सेंटर सुरु केले.या सेंटर मध्ये एकूण २५० रुग्णांवर मोफत औषधोपचार तसेच  त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या कोविड सेंटर करीता समाजसेवी संस्था,दानशूर व्यक्तींनी देणग्या देवून तसेच अन्नदान करुन दिलेले योगदानही आदर्शवत व प्रेरणादायी असुन कोरोनाची तिसरी लाट येवू नये अशीच आशा बाळगु या परंतु तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यासाठी बेलापुरकर सक्षम आहेत याची खात्री पटली  या कोवीड सेंटरमुळे शासनाचे काम देखील सोपे झाले नागरीकांची तपासणी करणे त्यांना क्वारंटाईन करणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही कामे जि प शरद नवले सरंपच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व त्यांच्या टिमने यशस्वीपणे पार पाडली पोलीस पाटील अशोक प्रधान यांनीही फार मेहनत घेतली आपल्या सर्वांच्या कष्टाचे चिज म्हणजे रुग्ण बरा होवुन घरी गेला  असल्याचे पाटील म्हणाले.                            या वेळी जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले  उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी देणगीदार,अन्नदान देणारे दाते त सेच रुग्ण सेवा करणारे  स्वयंसेवक,ग्रामस्थ,पञकार आदिंचे आभार मानले.या प्रसंगी,रणजित श्रीगोड,अजय डाकले,देविदास देसाई,नवनाथ कुताळ, विष्णुपंत डावरे,शांतीलाल हिरण,प्रशांत लढ्ढा,जालिंदर कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,प्रविण लुक्कड,पंकज हिरण,यादव काळे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,पोलीस पाटील अशोक प्रधान,डॉ.मच्छिंद्र निर्मळ, डॉ.सुधीर काळे,डॉ.रविंद्र गंगवॅल, बाळासाहेब दाणी,मोहसिन सय्यद,अशोक राशिनकर,अकबर सय्यद,हर्षद दुधाळ,सुहास शेलार,शफीक आतार,किरण गागरे,गणेश बंगाळ,शफीक बागवान,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,प्रशांत मुंडलिक,राहुल माळवदे,रोहित शिंदे,कामगार तलाठी कैलास खाडे,ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, सचिन वाघ,गोपी दाणी,अशोक मेहेत्रे,सुधीर करवा,अरुण अमोलिक, नितीन नवले,दिलीप अमोलिक,किशोर खरोटे,सतीश शेलार,हर्षद दुधाळ,सोमनाथ जावरे,शुभम नवले,अजय शेलार,रावसाहेब अमोलिक, विशाल शेलार,भास्कर वारे,महेश कु-हे,सद्दाम आतार,नंदू शेलार,सुनील साळुंके,बाळासाहेब शेलार,भारत बुर्गुल,केशव काळे,अजित शेलार,प्रतिक काळे,सुखदेव गायकवाड, निखिल शेलार,अनिकेत भडके,सोनू खैरे,फिरोज सय्यद, सुभाष शेलार,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget