बेलापुर(वार्ताहर) समाजात सामाजिक काम करणाऱ्या सर्वांनाच अनुदानाचा लाभ दिला जातो मग चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या पत्रकारांना मानधन का नको ? असा सवाल महाराष्ट्र संपादक व पत्रकार सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी केला आहे .
पत्रकार मनोज आगे यांची संपादक पत्रकार सेवा संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी म्हणून निवड झाल्याबद्दल बेलापुर व परिसरातील पत्रकारांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर होते. तर प्रमुख आतिथी म्हणून नरेंद्र लचके,जेष्ठ पत्रकार मारुती राशिनकर तसेच बाजार समिती संचालक सुधीर नवले उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आगे पुढे म्हणाले की,खासदार -आमदार लोकांसाठी काम करतात पोलीस अधिकारी विविध खात्यातील सरकारी कर्मचारी जनतेसाठी काम करतात त्यांना पगार मिळतो, मानधन मिळते मग पत्रकारही सतत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळेची,आपल्या जिवाची पर्वा न करता लढत असतात. यंत्रणेतील दोष जनतेसमोर आणण्याची ताकद फक्त पत्रकारातच आहे. हे त्रिवार सत्य असतानाही सर्वांना सेवानिवृत्ती वेतन मिळते विविध क्षेत्रातील लोकांना अनुदान मिळते मग जनतेसाठी काम करणाऱ्या पत्रकार अनुदान मिळण्यापासून वंचित का ?असा सवाल करुन आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग पत्रकारांच्या हितासाठी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील ज्येष्ठ व ज्या पत्रकारांनी सतत पंधरा वर्षे पत्रकारिता केली अशा पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून सरकारी पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिस्विकृती कार्ड मिळविण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले मात्र किचकट नियमांमुळे शासनाचे पत्रकारितेचे कार्ड काही ठराविक पत्रकार वगळता कुणालाही मिळाले मिळू शकले नाही ग्रामीण भागातील पत्रकारांनाही यासाठी संघटनेच्या माध्यमातून राज्याध्यक्ष किसनभाऊ हासे याच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देवू असेही आगे म्हणाले .
यावेळी बेलापूर पंचक्रोशीतील पत्रकार व बाजार समिती , व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने आगे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी देविदास देसाई, प्रा. ज्ञानेश गवले ,नरेद्र लचके ,नवनाथ कुताळ बाजारा समितीचे संचालक सुधीर नवले ,दिपक क्षत्रिय, आदिंनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना अशोक गाडेकर यांनी सत्कारमूर्ती मनोज आगे यांच्या पत्रकारितेतील वाटचालीची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागांतून त्यांना संधी मिळाली याबद्दल कौतुक केले.त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील समस्यांची जाणीव असल्याने त्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी सुनील नवले, दिलीप दायमा ,सुहास शेलार , बाबा शेख, किशोर कदम, दीपक क्षत्रीय, गोविंद साळुंके, अशोक शेलार, शरद थोरात ,अभिजित रांका, अतिश देसर्डा उपस्थित होते.