(प्रतिनिधी राहुरी मिनाष पटेकर) राहुरी कृषी मंडळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ अंतर्गत पाथरे येथे शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, कामगंध सापळे यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. या अभियानात पाथरे खुर्द,टाकळीमियाँ, मोरवाडी,राहुरी, शेणवडगाव,मालुंजे खुर्द, खुडसरगाव, केंदळ बु,मांजरी, कोंढवड, वळण, मुसळवाडी गावातील ३८ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना बांधावर बियाणे कामगंध सापळे वाटप,उगवण क्षमता चाचणी, रूंद सरीवरंबा पेरणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच खुडसरगाव येथे एक गाव एक वाण अंतर्गत युएस ७०६७ या कपाशीच्या वाणाची लागवड करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यामुळे एकात्मिक कीड व रोग नियंत्रण होत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले. यावेळी तालुका पर्यवेक्षक तुळशीराम पवार, राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी आकाश गोरे,बिरु केसकर,चंद्रकांत म्हसे, शिवप्रसाद कोहोकडे, बाळासाहेब सूळ तसेच शेतकरी हरिभाऊ जाधव,दिपक जाधव, संभाजी टेकाळे,रामकृष्ण टेकाळे, विजय जाधव,शंकर जाधव,चित्तू पवार, चांगदेव टेकाळे, ज्ञानेश्वर अकोलकर, सुरेंद्र जाधव व अविनाश सोळुंके उपस्थित होते.
Post a Comment