बेलापुर (प्रतिनिधी )-येथे विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शाँक लागुन एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे त्यास तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे या बाबत समजलेली माहीती अशी की बेलापुर येथील विजेच्या खांबावरील मेंन्टेनन्सचे काम खाजगी ठेकेदारा मार्फत करण्यात येत होते त्यांच्या मार्फत गणेश भाऊसाहेब साळुंके हा पोलवर चढुन देखभाल दुरुस्तीचे काम करत होता ज्या पोलवर काम करायचे होते त्या पोलवरील विज प्रवाह बंद करण्यात आला होता त्या पोल शेजारीच आणखी एक विजेचा सप्लाय सुरू होता बंद विज प्रवाह असलेल्या पोलवरील काम आटोपुन साळुंके हा विज प्रवाह सुरु असलेल्या शेजारच्या पोलवर चढला विजेच्या तारांना स्पर्श होताच त्यास जोरदार शाँक बसला व तो खाली फेकला गेला त्याच्या ओरडण्यामुळेमुळे आसपासचे नागरीक जमा झाले हवालादार अतुल लोटके उपसरपंच अभिषेक खंडागळे महावितरणचे चेतन जाधव मधुकर औचिते यशवंत नाईक गौरव सिकची विशाल आंबेकर संतोष शेलार गणेश टाकसाळ किरण बारहाते आदिंनी जखमी अवस्थेत असलेल्या साळुंके यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे दाखल केले असुन त्यास अति दक्षता विभागात ठेवण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Post a Comment