बेलापुर (प्रतिनिधी )- शेळीला उचलुन नेताना शेळीसह विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन अधिकाऱ्यांनी रात्री दिड वाजता विहीरीतुन सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.बेलापुर खूर्द येथील शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन शेळीला उचलून नेण्याच्या नादात विहीरीचा अंदाज न आल्याने शेळीसह बिबट्या विहीरीत पडला ही बाब भगत व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली आसपासचे लोक जमा झाले रात्रीच्या अंधारात विहीरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढण्यात आले त्या नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे विकास पवार गोरख सुरासे सुर्यकांत लांडे हे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रात्रीच बिबट्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला रात्री एक वाजता त्यांनी विहीरीत बाज सोडली त्या बाजेवर बिबट्या बसला नंतर काही वेळाने पिंजरा सोडून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करुन अज्ञात स्थळी हलविले.
Post a Comment