Latest Post

श्रीरामपुर-दि.२१/०५/२०२१ रोजी रात्री ०३/३० या चे दरम्यान बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वार्ड नं.२ येथील राहते घराचे जिन्याचे बंद घराचे दरवाज्याचे आतील कडी काढून ओप्पो कंपनीचे २ मोबाईल फोन घरफोडी चोरी करुन नेले बाबत जमील इब्राहिम शहा वय-४१ वर्षे,धंदा- व्यापार रा.बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वार्ड नं.२ श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर यांचे फिर्याद वरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल. झालेला होता. तसेच दिनांक २१/०५/२०२१ रोजी रात्री १०/०० ते दिनांक २२/०५/२०२१ रोजी सकाळी ०६/०० वा.चे दरम्यान संजयनगर वार्ड नं.२ श्रीरामपूर येथील गोडावून मधील खोलीची खिडकी कशाने तरी उघडून खिडकीतून टेबलावर ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरुन नेले बाबत शकील शहा यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. तसेच दिनांक २१/०५/२०२१ रोजी रात्री बाबरपूरा चौक, काझीबाबा रोड वार्ड नं.२ श्रीरामपूर येथे घराचे दरवाज्याचे कुलुप तोडून सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले बाबत फिर्यादी नामे इसाक शहा यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता.त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री संजय सानप यांना मिळालेला गुप्त माहिती प्रमाणे आरोपीनामे शहबाज सलिम शहा वय-२२ वर्ष रा.काझीबाबारोड वार्ड नं.२ श्रीरामपूर यास वार्ड नं.२ श्रीरामपूर यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्या संदर्भात सखोल तपास करता त्याने उपरोक्त तिनही घरफोड्या केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडून तीन मोबाईल व एक मंगळसुत्र असे एकूण ७५,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमूद तिन्ही घरफोड्याचे गुन्हे घडल्यानंतर अवघ्या २४ तासाचे आत आरोपीला पकडून त्याचकडून उपरोक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदर आरोपीविरुध्द खालील प्रमाणे दरोडा तयारीचे दोन गुने, दुखापतीचा एक गुन्हा, तसेच चोरीचा एक गुन्हा दाखल आहेत.

१) श्रीरामपूर शहर पोस्टे गुर.नं. १ २३०/२०१९ भादवि कलम ३८०,३४ 

२) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. १ २७२/२०१४ भादवि कलम ३२५,३२३,५०४,५०६

३) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. । २७७/२०१८ भादवि कलम ३९९,४०२

४) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं ।। ११५/२०२१ म.पो.का.क १२४

५) राहुरी पोस्टे गुरनं. १२३५/२०१९ भादवि कलम ३९९,४०२ आर्म अॅक्ट ४/२५ सदरची कारवाई मा.श्री मनोज पाटील पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे मंडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री संदीप मिटके साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय सानप, पोहेको जोसेफ साळवी,पोना बिरप्पा करमल पोकॉ/ किशोर जाधव पोकों/ राहुल नरवडे पोकों/ सुनिल दिघे पोका महेंद्र पवार यांनी केली आहे.


आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके ,  PI सानप, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार  व नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांचे सह छत्रपती शिवाजी चौक येथे अचानक नाकाबंदी लावून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याचे  वाहनावर कारवाई करून जप्त केले  तसेच 85 इसमांची रॅपिड टेस्ट केली .त्यापैकी 2 पॉझिटिव्ह आढळून  आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या   इसमांची रवानगी  थेट कोविड केअर सेंटर येथे करण्यात आली आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही वेळातच श्रीरामपूर शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे पहायला मिळाले.

अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध    असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय चखाले रा. निगडी , पुणे यांनी Cr. No. 504/ 2020 IPC 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मा. श्री मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल मा. श्री. अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. 

सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)नयन राजेंद्र तांदळे 

1) सूपा 504/20 IPC 399, 402

 2) सुपा 111/ 17 IPC 379, 34, 411

 3)  तोफखाना 6663/20 IPC 394, 365, 34... 

4) तोफखाना 1756/19 ipc 393, 34.

 5) तोफखाना 1715/19 ipc 392, 34 

 6) तोफखाना 1607/19 ipc 392 , 323, 34                                         7) तोफखाना 1546/19 ipc 394, 323, 34                                8) तोफखाना 1765/19 ipc 392 ,34.   

     2) विठ्ठल साळवे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 402 

2) सुपा 111/17 IPC 379, 34.  3)तोफखाना 6663/20 IPC 394, 365 34

  3) अक्षय ठोंबरे 

1) सुपा ipc 399, 402 

  4) शाहुल पवार 

1) सुपा 505/20 IPC 399, 402. 

2) सुपा 153/ 17 ipc 341, 394,396, 34

 3) 87/ 17 IPC 394,397, 34 4) 23/15 ipc 379, 354, 323.... 

5) अमोल पोटे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 34 

2) 86/17 ipc 394, 397, 34

 3) 118/ 15 सुपा ipc 379, 34

पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, मा. सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके हे करीत असून त्यांना PI नितीन गोकावे, PN अमोल धामणे, PN साहेबराव ओव्हाळ, PC यशवंत ठोंबरे यांचे पथक सहाय्य करीत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- कृषि उत्पन्न बाजार समीती बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकविलेला भाजीपाला कुठे विकावा तो जास्त काळ ठेवावा तर खराब होणार त्यामुळे या भाजीपाल्याचे काय करावे अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे                                               कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता बाजार समीतीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कर्ज काढुन भेंडी गवार टोमँटो गोबी फ्लाँबर पिकवीले आता बाजारच बंद असल्यामुळे हा माल कुठे विकावा की फेकावा या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे सध्या भेंडी तोडणीचे काम जोरात सुरु असुन एक दिवस जरी भेंडी तोडण्यास उशीर झाला तरी ती भेंडी पक्व होते त्यामुळे ती फेकुनच द्यावी लागते शिवाय भाजीपाला पिकवीताना शेतकऱ्यानी महागडी खते उधार आणुन ती पिकाला टाकली आहे भाजीपाला विकुन शेतकरी खताने पैसे भरणार होते आता भाजीपाला तोडणीचा वेळ आला तर बाजार समीत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कारण हा भाजीपाला जास्त दिवस ठेवु  शकत नाही तो लवकर खराब होतो त्यामुळे भाजीपाला विक्री साठी बाजार समीती सुरु ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बेलापूरः (प्रतिनिधी  )-।गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बेलापुर  बु!! प्रशासन व कोरोना समितीने बुधवारदिनांक १९ मे ते रविवार दिनांक २३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला असुन या नियमाचे उल्लंघन करणारावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे     सध्या बेलापूर आणि परिसरात दिवसागणिक कोरोनाचा प्रसार वाढत आहे.विविध उपाययोजना करुनही परिस्थितीत सुधारणा होत नाही.या पार्श्वभूमीवर सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,सर्व राजकीय पक्षांचे नेते व प्रमुख,पत्रकार,पोलिस पाटिल,व्यापारी असोसिएशन,किराणा मर्चट असोसिएशन,महसूल व पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी आदिंनी विचार विनिमय करुन गावाच्या सुरक्षिततेसाठी  बुधवार १९ मे ते रविवार २३ मे पर्यंत पाच दिवसांचा कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या कालावधित नियमबाह्य वर्तन करणारावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे .या कालावधित वैद्यकीय सुविधा वगळता अन्य सर्व दुकाने भाजीपाला,फळे,किराणा,मांस,मासे,पीठ गिरणी,शेती विषयक दुकाने,बेकरी आदि सर्व व्यवहार बंद राहणार आहेत याची सर्व व्यापारी व्यवसायीक नागरीक यांनी नोंद घ्यावी .त्याचप्रमाणे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर प्रतिबंध असेल.या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.तरी नागरिक,व्यापारी,भाजीपाला व फळ विक्रेते आदिंनी ग्रामपंचायत,महसूल,पोलिस प्रशासन तसेच कोरोना समितीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख,व्यापारी व किराणा मर्चण्ट असोसिएशनचे पदाधिकारी,पत्रकार,ग्रामसेवक राजेश तगरे,का.तलाठी श्री.कैलास खाडे,पोलिस पाटिल अशोक प्रधान,बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल .लोटके  तसेच कोरोना समितीने केले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- येथील निराधार दिव्यांगाला वेळेवर औषधोपचार मिळाल्यामुळे तसेच   सकारात्मक मानसिकता व प्रबळ ईच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली असुन आता त्या पुर्णपणे बर्या झालेल्या आहे. बेलापुर येथील नंदाताई क्षिरसागर या दोन्ही पायाने विकलांग आहे तसेच त्यांना कुणाचाही आधार नाही तरीही गावातील घरोघरी जावुन मिळेल ती कामे करुन त्या आपला उदार निर्वाह करतात त्यांना थोडा त्रास झाल्यावर त्यांनी माजी सरपंच भरत साळुंके यांना सांगितले त्यांनी तातडीने त्यांची आरोग्य तपासणी करुन घेतली त्यात त्याचा अहवाल पाँजिटीव्ह आला  नंदाताई क्षिरसागर दिव्यांग असल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करुन त्यांचेवर उपचार करण्याचा निर्णय वरद विनायक कोवीड केअर सेंटरचे डाँक्टर शैलेश पवार व डाँक्टर राशिनकर डाँक्टर  देविदास चोखर यांनी घेतला त्यांनी क्षिरसागर यांचेवर घरीच उपचार सुरु केले शिवसेनेचे अशोक पवार सचिन कडेकर किशोर राऊत ज्ञानेश्वर कुलथे यांनी  जेवाणाची व्यवस्था केली चौदा दिवसानंतर त्या ठणठणीत बर्या झाल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी )-शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणांना पढेगाव ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत पोलीसांच्या स्वाधीन केले असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी भूमीका उदय लिप्टे या शिवसैनिकाने घेतली आहे.पढेगाव येथील उदय लिप्टे भूषण राऊत सौरभ बनकर वृषभ काळे पुष्पराज खैरनार या युवकावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाने  शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे तरुणाचे आयुष्य उध्वस्त होवु नये म्हणून गावातील नागरीकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेवुन दिलगीरी व्यक्त केली व गुन्हा मागे घेण्याची विनंती केली पंरतु अँम्बुलन्सची मागणीच केली नाही केवळ गोधंळ घालण्याच्या उद्देशाने ते कार्यकर्ते येथे आले असल्याचे खासदार लोखंडे यांनी ग्रामस्थांना सांगितले त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा गावात जाऊन गावकर्यांची बैठक घेतली या बैठकीत गावातील युवकावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीसांना सहकार्य करुन सर्वांना पोलीसांच्या ताब्यात देण्याचे ठरले त्या वेळी उदय लिप्टे म्हणाले की मी दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मित्राच्या वडीलांना दवाखान्यात जाण्यासाठी  वेळेवर साधन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण शिवसैनिक या नात्याने खासदार लोखंडे यांच्याकडे अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेलो होतो त्या वेळी तेथे फक्त रखवालदारच होता त्या ठिकाणी दोन गाड्या झाकुन ठेवलेल्या होत्या मला वाटले त्या गाड्याचा उपयोग होवू शकतो म्हणून त्या वरील कापड काढून फोटो काढले त्याचा राग मनात धरुन लोकप्रतिनिधीनी त्यांच्या अंगरक्षकाला पढेगाव येथे पाठविले तेथेच मेजर उंडे यानी आपल्याला दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली त्या नंतर खासदार लोखंडे यांच्या दबावाखाली मी व माझ्या सहकारी मित्रावर खोटा गुन्हा दाखल केला मी लोकप्रतिनिधीचा आदर करतो परंतु काम घेवुन येणार्या कार्यकर्त्यावरच असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सामान्य नागरीकांनी यांच्या दारात जायचेच नाही का असा सवालही लिप्टे यांने केला असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी प्रतिज्ञाच उदय लिप्टे यांने ग्रामस्थासमोर केली आहे त्यांनतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले एकंदरच हा विषय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला या पूर्वीही अनेक लोकप्रतिनीधींशी नागरीकांचे वाद विवाद झालेले आहेत हमरा तुमरी देखील झालेली आहे परंतु ते विषय तेथेच संपले होते परंतु हा विषय पोलीस ठाण्यापर्यत गेल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget