अश्लील फोटो इंस्टाग्रामवर प्रसारीत करुन मुलीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक.
पोलिसांकडून मिळालेली माहित अशी की १७ मे २०२१ रोजी एका मुलीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, रोहीत जालिंदर पाटोळे रा.फर्याबाग, अहमदनगर याचे व माझे एकमेकावर प्रेम होते. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहीत पाटोळे याने त्याचे मोबाईल मध्ये आमचे दोघांचे काही खाजगी फोटो काढलेले होते. त्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फिर्यादी मुलीस लग्नाची मागणी घालु लागला. त्यास फिर्यादी मुलीने नकार दिला असता आरोपीने यांने फिर्यादी मुलीस व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवू लागला. तसेच फिर्यादी मुलीचे नावाने इंस्टाग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावर त्यांचे मोबाईलमध्ये काढलेले खाजगी फोटो व व्हीडीओ प्रसारीत करु लागल्याने फिर्यादी मुलीने भिंगार पोलीस स्टेशनला गु.रजि.नं. १७८/२०२१ भादविक ३५४(ड), ५०६ (२), ५०७ सह माहीती तंत्रज्ञान कायदा २०२० चे कलम ६६ (अ), ६६ होता. (ई) व ६७ प्रमाणे आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.