Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील कोवीड केअर सेंटर मध्ये १०स्कोअर असलेला रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला असुन त्या रुग्णाने डाँक्टर  व कोवीड सेंटरच्या स्वंयसेवकाचे आभार मानले आहे                                               बेलापुर येथील संस्कृती मंगल कार्यालय येथे कै मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या व साई खेमानंद ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातुन वरद विनायक कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते ५० बेड असलेल्या या कोवीड केअर सेंटरमध्ये असलम शेख हे ५ मे रोजी दाखल झाले होते हा रुग्ण दाखल झाला त्या वेळेस त्याचा एच आर सी टी स्कोअर १० होता तसेच त्याचा कोरोना रिपोर्टही पाँजिटीव्ह आला होता अशा रुग्णास डाँक्टर  रामेश्वर राशिनकर व डाँक्टर  शैलेश पवार यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करुन त्याचेवर उपचार सुरु केले केवळ औषधा व गोळ्यावर असा रुग्ण बरा करणे हे दोन्ही डाँक्टरापुढे एक अव्हानच होते परंतु  डाँक्टर पवार व डाँक्टर  राशिनकर यांनी ते अव्हान लिलया पेलले रुग्णाचा आत्मविश्वास व डाँक्टरांचे प्रयत्न यामुळे हा रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला आहे या कोवीड केअर सेंटरमधील डाँक्टर याच्या आयुर्वेदीक व अँलोपँथीक औषधाने तसेच स्वयंसेवकांच्या उत्सहामुळे मला पुढील उपचारासाठी कुठेही जाण्याची गरजच भासली नाही   त्यांच्या अनमोल सहाकार्यामुळे  मी  फार मोठ्या मानसिक व आर्थिक संकटातुन वाचलो हे वरद विनायक कोवीड सेंटर माझ्यासाठी वरदानच ठरले असल्याची प्रतिक्रिया असलम शेख यांनी दिली आहे या कोवीड केअर सेंटरमध्ये आत्तापर्यत १२५ ते १५० रुग्ण दाखल होवुन बरेच रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याचेही डाँक्टर राशिनकर व डाँक्टर  पवार यांनी सांगितले.

श्रीरामपूर नगर परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी,नागरिक यांची सोमवार दिनांक 10 मे रोजी शंभर जणांची कोरोना तपासणी शिबिर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण नगरसेवक श्री राजेश अलघ,कामगार नेते श्री दीपक चरणदादा चव्हाण यांच्या ऊपस्थिती मध्ये  संपन्न झाले या प्रसंगी  नगरसेविका सौ प्रणिती दीपक चव्हाण यांनी लेखी पत्रा द्वारे दिलेल्या निवेदनात 

श्रीरामपूर नगर परिषदेच्या सर्वच कर्मचारी यांच्यात जीवघेणा कोरोना आजाराचा वाढता पादुर्भाव आणि मृत्यदर बघता श्रीरामपूर नगर परिषदने त्वरित सर्वच कायम आणि  रोजंदारी कामगार यांचे प्राधान्याने लसीकरण,आरोग्य विमा, आणि कोरोना तपासणी करावी जेणे करून या संसर्गजन्य आजाराने कर्मचारी पिडीत होणार नाही ,काही कायम कर्मचारी यांचे लसीकरणाचा पहिला,दुसरा डोस लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण झालेले नाही ज्या प्रमाणे 10 टक्के औषध साठा शासकीय कर्मचारी यांच्या करीता राखीव आहे त्याच धर्तीवर कोरोना लस ही 20 टक्के राखीव ठेवण्यात यावी व तसेच घनकचरा 251 कामगार,औषधे फवारणी12, अतिक्रमण 14,पाणी पुरवठा 61, बांधकाम 51,वसुली 7कामगार आणि इ विभागातील 68 एकुणो 464 रोजंदारी कामगार यांचेही गत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी पासुन आरोग्य विमा उतरवण्यात आलेला नाही. जबाबदारी असतानाही संबधीत ठेकेदार लाॅकडाऊन असतानाही यांनी आरोग्य विमा ,गणवेश,थकीत वेतन,ओळख पत्र कामगारांना दिलेले नाही आणि नगर परिषद प्रशासन तर्फे नेहमी प्रमाणे त्या बाबतीत गांभिर्याने  काळजी घेतली गेलेली नाही, 

त्या सोबतच रूग्ण वाहीका,स्वर्ग रथ,शववाहीका,अग्णीशामक,अंत्यविधी दहन कर्मचारी, पाण्याचे टॅंकर वरील चालक, मदतणीस कर्मचारी यांनाही आरोग्य विमा ,PPE कीट,ऊपलब्ध करून देण्यात यावे, आणि या सर्व कामगारांचे साप्ताहिक कोरोना चाचणी करण्यात यावी जेणे करुन पुढील हाणी टाळता येवु शकेल तसेच नगर परिषद कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांना देखील अहमदनगर महानगरपालिका यांनी घेतलेल्या निर्णय नुसार आरोग्य विमा आणि लसीकरण ऊपलब्ध करावे. 

त्या सोबतच सातत्याने आम्ही केलेल्या पाठपुराव्या मुळे श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांनी एकुण कायम व रोजंदारी 945 कामगारांना पैकी 247 कायम कामगार यांचा 4 लक्ष 56 हजार रूपये खर्च करून प्रत्येकी दोन लक्ष रूपये चा आरोग्य विमा ऊतरवण्यात आला या बद्दल अभिनंदन त्या सोबतच शासकीय कोरोना तपासणी शिबिरास नगर परिषदचे वैद्यकीय अधिकारी डॉ पर्हे, परिचारिका यांचे सहकार्य लाभले त्यामुळे राष्ट्रवादी सफाई कामगार सेलच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष श्री दीपक चरणदादा चव्हाण यांनी त्यांचे  आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर शहरातील रेणुकानगर,एमआयडीसी भागात एका तडीपार गुन्हेगारासह ०२ जणांना शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असुन आरोपींच्या ताब्यातील होंडा डिओ गाडीच्या डिक्कीमध्ये एक पिस्टल व ०१ जिवंत राऊंड  पोलीसांना मिळाला आहे. यामध्ये तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे -३९ वर्षे याच्या सह,सनी विजय भोसले,वय-२३ व अमित प्रभाकर कुमावत,वय-३० यांचा सामावेश आहे. पो. शि.सुनिल दिघे यांच्या फिर्यादीवरुन काल श्रीरामपूर पो.ठाण्यात गुरनं.२८६/२०२१ भा.हत्यार कायदा कलम ३,४ ,७/१५ व मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो.उप.निरीक्षक सुरवडे हे पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक डॅा.दिपाली  काळे,डीवायएसपी.श्री.मिटके ,श्रीरामपूर शहर पो.ठाण्याचे पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली आहे.



अहमदनगर  प्रतिनिधी-रुग्णांच्या नातेवाईकांना शोधून त्यांना रेमेडिसीवीयर हे इंजेक्शन जास्त भावाने विकणाऱ्या डोक्यातील टोळीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. साखळी पद्धतीने होत असलेल्या रेमेडिसीवीयर इंजेक्शनचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईत विविध गावातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.त्यांच्याकडून सहा इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे एक व्यक्ती रेमेडिसीवीयर हे इंजेक्शन जास्त भावाने विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि औषध प्रशासन विभाग आणि एकत्रित येऊन सापळा रचला. यामध्ये वडाळा बहिरोबा येथे रामहरी बाळासाहेब घोडेचोर राहणार देसवडे आणि आनंद पुंजाराम खोटे राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रेमेडिसीवीयर इंजेक्शन जप्त करण्यात आले.दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या रेमेडिसीवीयर इंजेक्शन कोठून आणले याची चौकशी केली असता शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी केलेल्या तपासात देवटाकळी येथील एक कांगोणी रोड खरवंडी तालुका नेवासा येथील एक जण अशा दोघांना ताब्यात घेतले.या सर्वांनी वडाळा बहिरोबा येथील राकेश हेमंत मंडल यांच्याकडून हे रेमेडिसीवीयर इंजेक्शन घेतल्याचे स्पष्ट झाले.त्याच्या शोध घेतला असता त्याची गाडी सियाझ नेवासा फाटा येथे आढळून आली.आणि तो फरार झाला.त्याच्या गाडीतील डॅश बोर्ड मधून एक रेमेडिसीवीयर जप्त करण्यात आले.पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.अटक केलेल्या आरोपी मध्ये रामहरी बाळासाहेब घोडेचोर राहणार देसवडे तालुका नेवासा, आनंद कुंजाराम थोटे राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव,पंकज गोरक्षनाथ खरड देव टाकळी ,सागर तुकाराम हंडे कान्गुनी रोड खरवंडी तालुका नेवासा यांचा समावेश आहे.आरोपी राकेश हेमंत मंडल हा फरार आहे.या सर्व आरोपी विरुद्ध औषध निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादी नुसार शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सर्व आरोपी एकमेकाच्या संपर्कात होते आणि गरजू नातेवाईकांचा शोध घ्यायचा आणि त्या व्यक्तीला जास्त पैशाने रेमेडिसीवीयर इंजेक्शनचा पुरवठा करायचा अशा पद्धतीची ही टोळी काम करत होती.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )- रमजान ईद सनाच्या पार्श्वभुमिवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे शुक्रवाद दि.07/05/2021 रोजी शहरातील मुस्लींम बांधवाची बैठक घेण्यात आली.कोरोना माहामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी देखील सर्व मुस्लीम बांधवानी ईदच्या दिवशी घरी राहुनच ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे झालेली बैठक मध्ये संदिप मिटके DySP श्रीरामपुर यांनी  मुस्लीम बांधवांना ईदच्या सुभेच्छा देत यावर्षी ही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने सर्व समाज बंधवांच्या हिताच्य दृष्टीने घरात बसुनच ईदची नमाज अदा करावी अशी विनंतीसह अवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले.सदर झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाचे नगरसेवक,मुज्जफर शेख,मुक्तार शहा,कलिम कुरेशी,जेष्ठ कार्यकर्ते अहमदभाई जहांगिरदार,जामा मस्जिदचे ट्रस्टी शकुर ताजमोहंमद,सादीद मिर्जा,एजाज दारुवाला,रज्जाक पठाण,ॲड समिन बागवान,शहर काझी सय्यद अली,नजीर मुलानी,रियाज खान व इतर प्रतिष्ठीत नागरीक मिटींगवर उपस्थित होते.दरम्यान उपस्थितांनी रमजान ईद सनाचे अनुषंगाने उपवास करीता लागणारे फ्रुट चे हातगाडी सायंकाळी सुरु ठेवावी,किंव फ्रुट विक्री करणारे फिरते सुरु ठेवण्याबाबत सुचना केला.त्यांनी केलेल्या सुचना समजुन घेवुन मिटींगदरम्यान कोरोनाचा मोठया प्रमाणात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करुन ईदचा सन सर्व मुस्लींम बांधवांनी साजरा करावा.शासनाचे नियमांचे सर्वांनी पालन करावे आपल्याकडुन शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे अवाहन केले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-रुग्णांची ताताडीने तपासणी करुन पाँजिटीव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवावे घरी कुणालाही ठेवु नका अशा सुचना महसुल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांना दिल्या                              महसुल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या  तसेच संस्कृती मंगल कार्यालयात सुरु असलेल्या वरद गजानन कोवीड केअर सेंटरला गाडीलकर यांनी भेट दिली त्या वेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी संजय दिघे आरोग्याधिकारी डाँक्टर मोहन शिंदे  हे होते  लसीकरण किती झाले तसेच कोरोणा लसीकराण तपासणी या बाबत काही अडचणी आहेत का याची चौकशी गाडीलकर यांनी केली या वेळी डाँक्टर देविदास चोखर यांनी उपलब्ध लस देण्यात आलेले ढोस रँपीड टेस्ट गाव व कार्यक्षेत्रात असणारी रुग्ण संख्या केले जाणारे उपचार बरे होणारे रुग्ण या बाबत सविस्तर माहीती दिली या वेळी जि प सदस्य शरद नवले आरोग्य समुदाय आधिकारी डाँक्टर जैन डाँक्टर तेलोरे डाँक्टर मंजुश्री जाधव ममता धिवर प्रशांत गायकवाड संतोष शेलार गणेश अहीले ग्रेटा कदम पत्रकार देविदास देसाई पोलीस पाटील अशोक प्रधान महेश कुर्हे  उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्या आगोदर महसुल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील गटविकास अधिकारी संजय दिघे तालुका आरोग्याधिकारी डाँक्टर मोहन शिंदे यांनी बेलापुर येथे सुरु असलेल्या दोन्ही कोवीड सेंटरला भेटी दिल्या या कोवीड सेंटरमधील अनेक रुग्ण बरे होवुन घरी सुखरुप गेले असल्याची माहीती दोन्ही कोवीड सेंटर मधुन दिल्यामुळे गाडीलकर यांनी समाधान व्यक्त केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-करोना तपासणी केलेल्या किटची विल्हेवाट न लावता अज्ञात व्यक्तीने ते साहित्य प्रवरा नदीच्या काठावर टाकून दिल्याप्रकरणाची काल जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेत तहसीलदारांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील प्रवरा नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात करोना तपासणीत वापर केलेले किट त्यात सलाईन, हातमोजे, रँपीड टेस्टसाठी वापरण्यात येणारे साहीत्य, मास्क, सिरींज आदि वापरलेले साहीत्य उघड्यावर टाकून दिल्याचे आढळून आले आहे.

एका प्लॅस्टिकच्या पिशवीतील हे साहित्य परिसरात अस्ताव्यस्त विखुरलेले होते. वास्तविक हे साहीत्य नष्ट करणे आवश्यक असताना अज्ञात व्यक्तीने बेजबाबदारपणे ते प्रवरा नदी काठावर टाकून दिले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यापर्यंत पोहोचली.त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांंना घटनास्थळी जावून चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी डॉ. देविदास चोखर, कामगार तलाठी कैलास खाडे, जि. प. सदस्य शरद नवले, प्रा. अशोक बडधे, देविदास देसाई, सुनील बारहाते, अनिल गाढे, अशोक शेलार, बेलापूर खुर्दचे ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, पोलीस हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, संतोष शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी याठिकाणी आणखी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत असेच साहित्य आढळून आले. या साहित्याचा पंचनामा करुन वैद्यकीय अधिकार्‍यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. देविदास चोखर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget