श्रीरामपूर नगर परिषदेच्या सर्वच कर्मचारी यांच्यात जीवघेणा कोरोना आजाराचा वाढता पादुर्भाव आणि मृत्यदर बघता श्रीरामपूर नगर परिषदने त्वरित सर्वच कायम आणि रोजंदारी कामगार यांचे प्राधान्याने लसीकरण,आरोग्य विमा, आणि कोरोना तपासणी करावी जेणे करून या संसर्गजन्य आजाराने कर्मचारी पिडीत होणार नाही ,काही कायम कर्मचारी यांचे लसीकरणाचा पहिला,दुसरा डोस लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण झालेले नाही ज्या प्रमाणे 10 टक्के औषध साठा शासकीय कर्मचारी यांच्या करीता राखीव आहे त्याच धर्तीवर कोरोना लस ही 20 टक्के राखीव ठेवण्यात यावी व तसेच घनकचरा 251 कामगार,औषधे फवारणी12, अतिक्रमण 14,पाणी पुरवठा 61, बांधकाम 51,वसुली 7कामगार आणि इ विभागातील 68 एकुणो 464 रोजंदारी कामगार यांचेही गत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी पासुन आरोग्य विमा उतरवण्यात आलेला नाही. जबाबदारी असतानाही संबधीत ठेकेदार लाॅकडाऊन असतानाही यांनी आरोग्य विमा ,गणवेश,थकीत वेतन,ओळख पत्र कामगारांना दिलेले नाही आणि नगर परिषद प्रशासन तर्फे नेहमी प्रमाणे त्या बाबतीत गांभिर्याने काळजी घेतली गेलेली नाही,
त्या सोबतच रूग्ण वाहीका,स्वर्ग रथ,शववाहीका,अग्णीशामक,अंत्यविधी दहन कर्मचारी, पाण्याचे टॅंकर वरील चालक, मदतणीस कर्मचारी यांनाही आरोग्य विमा ,PPE कीट,ऊपलब्ध करून देण्यात यावे, आणि या सर्व कामगारांचे साप्ताहिक कोरोना चाचणी करण्यात यावी जेणे करुन पुढील हाणी टाळता येवु शकेल तसेच नगर परिषद कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांना देखील अहमदनगर महानगरपालिका यांनी घेतलेल्या निर्णय नुसार आरोग्य विमा आणि लसीकरण ऊपलब्ध करावे.
त्या सोबतच सातत्याने आम्ही केलेल्या पाठपुराव्या मुळे श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांनी एकुण कायम व रोजंदारी 945 कामगारांना पैकी 247 कायम कामगार यांचा 4 लक्ष 56 हजार रूपये खर्च करून प्रत्येकी दोन लक्ष रूपये चा आरोग्य विमा ऊतरवण्यात आला या बद्दल अभिनंदन त्या सोबतच शासकीय कोरोना तपासणी शिबिरास नगर परिषदचे वैद्यकीय अधिकारी डॉ पर्हे, परिचारिका यांचे सहकार्य लाभले त्यामुळे राष्ट्रवादी सफाई कामगार सेलच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष श्री दीपक चरणदादा चव्हाण यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
Post a Comment