श्रीरामपूर शहरातील रेणुकानगर,एमआयडीसी भागात एका तडीपार गुन्हेगारासह ०२ जणांना शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असुन आरोपींच्या ताब्यातील होंडा डिओ गाडीच्या डिक्कीमध्ये एक पिस्टल व ०१ जिवंत राऊंड पोलीसांना मिळाला आहे. यामध्ये तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे -३९ वर्षे याच्या सह,सनी विजय भोसले,वय-२३ व अमित प्रभाकर कुमावत,वय-३० यांचा सामावेश आहे. पो. शि.सुनिल दिघे यांच्या फिर्यादीवरुन काल श्रीरामपूर पो.ठाण्यात गुरनं.२८६/२०२१ भा.हत्यार कायदा कलम ३,४ ,७/१५ व मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो.उप.निरीक्षक सुरवडे हे पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक डॅा.दिपाली काळे,डीवायएसपी.श्री.मिटके ,श्रीरामपूर शहर पो.ठाण्याचे पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली आहे.
Post a Comment