बेलापुर (प्रतिनिधी )-रुग्णांची ताताडीने तपासणी करुन पाँजिटीव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवावे घरी कुणालाही ठेवु नका अशा सुचना महसुल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांना दिल्या महसुल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या तसेच संस्कृती मंगल कार्यालयात सुरु असलेल्या वरद गजानन कोवीड केअर सेंटरला गाडीलकर यांनी भेट दिली त्या वेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी संजय दिघे आरोग्याधिकारी डाँक्टर मोहन शिंदे हे होते लसीकरण किती झाले तसेच कोरोणा लसीकराण तपासणी या बाबत काही अडचणी आहेत का याची चौकशी गाडीलकर यांनी केली या वेळी डाँक्टर देविदास चोखर यांनी उपलब्ध लस देण्यात आलेले ढोस रँपीड टेस्ट गाव व कार्यक्षेत्रात असणारी रुग्ण संख्या केले जाणारे उपचार बरे होणारे रुग्ण या बाबत सविस्तर माहीती दिली या वेळी जि प सदस्य शरद नवले आरोग्य समुदाय आधिकारी डाँक्टर जैन डाँक्टर तेलोरे डाँक्टर मंजुश्री जाधव ममता धिवर प्रशांत गायकवाड संतोष शेलार गणेश अहीले ग्रेटा कदम पत्रकार देविदास देसाई पोलीस पाटील अशोक प्रधान महेश कुर्हे उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्या आगोदर महसुल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील गटविकास अधिकारी संजय दिघे तालुका आरोग्याधिकारी डाँक्टर मोहन शिंदे यांनी बेलापुर येथे सुरु असलेल्या दोन्ही कोवीड सेंटरला भेटी दिल्या या कोवीड सेंटरमधील अनेक रुग्ण बरे होवुन घरी सुखरुप गेले असल्याची माहीती दोन्ही कोवीड सेंटर मधुन दिल्यामुळे गाडीलकर यांनी समाधान व्यक्त केले.
Post a Comment