Latest Post

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-कोरोनाच्या नावाखाली शहरात विनाकारण फिरणाराला जरब बसविण्याचे सोडून पोलीसांनी सुजाण नागरीकांसह अबाल वृध्दांनाही बेदम मारहाण केली  त्यात अनेकांना गंभीर मार लागला आहे     या बाबत हाती आलेली माहीती अशी की रात्री अचानक पोलीस फौज फाटा घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी चौकात आले आणि येणाऱ्या जाणाऱ्या

नागरिकांना कसलीही कल्पना न देता गुन्हेगारासारखे बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यात काही वयोवृध्द नागरीकही होते एकेक नागरीकाला पोलीस रिंगण करुन मारत होते पोलिसांनी आपल्याकडे आलेले दौंड येथील एस आर पी एफ यांना आदेश केला आणि जो सापडेल त्याची अडचण काय आहे  तो बाहेर का पडला हे जानुन न घेताच   नागरिकांवर  लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली यामध्ये एका युवकाचा हातात फँक्चर आले असुन सध्या डॉक्टर कापसे यांच्याकडे तो उपचार घेत आहे तर काही आपल्या मिळालेल्या प्रसादाचा हळद लावून घरीच उपचार करीत आहे अशा या पोलिसांच्या लढ्याची सुरुवात कोरोना बरोबर आहेत की शहरातील नागरिकांबरोबर हे समजने मुश्कील झालंय मंत्रालया पासुन ते वरीष्ठापर्यत सर्वांनी नागरीकावर लाठीचार्ज करु नये मारहाण करु नये असे आदेश असताना शहरात पोलीसांनी ही कारवाई कुणाच्या आदेशावरुन केली याची चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे या बाबत लवकरच वरिष्ठाकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.

श्रीरामपुर शहरातील नागरिकांनी दवाखाने करावे की दवाखान्यात आपल्या प्रियजनांना औषधोपचार करावा त्याच बरोबर रेमडीसीवीर व ऑक्सिजन सिलेंडरचा  मोठा तुटवडा या साठी काहींची भटकंती सुरु आहे अशा नागरिकांना आता रात्री घडलेल्या प्रकारात  स्वतः ऍडमिट होन्याची वेळ ही पोलिसांच्या चुकीच्या कारवाई मुळे आली आहे.


कोरोना काळात मटका गुटखा दारुगुत्ते खुले आम सुरु आहेत पोलीसांचा त्याकडे हेतूपुरस्पर कानाडोळा आहे परंतु दवाखान्यात असलेल्या आपल्या नातेवाईकाला वाचविण्यासाठी औषधे रेमिडीसीवर करीता जिवाचा आटापिटा करणाऱ्या नागरीकांना पोलीसांनी बेदम चोप दिला   पोलिसांनी वरिष्ठांनी असा निर्णय अचानक का घेतला समजतच नाही.

शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते त्यानुसार तोफखाना पो.स्टे. Cr.no.41/2019 भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर पोलिसांनी अपहरणकर्त्यांची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका करून आरोपी क्र. 1) अजहर मंजुर शेख, 3) निहाल /बाबा मुशरफ शेख यांना अटक केले होते.सदर गुन्ह्याचा तपास Addl. SP. सागर पाटील व DySP संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली A.P.I. पिंगळे यांनी  तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले.सदर प्रकरणात ॲड.पवार  ए.बी. यांनी सरकारी पक्षाची बाजी मांडली. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री अशोक कुमार भिलारे साहेब यांनी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली पैरवी अधिकारी म्हणून . स फौ लक्ष्मण पो हे काँ  थोरात पि डी जे कोर्ट पैरवि अधिकारी नगर शहर  यांनी काम पाहिले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- राज्यात कोरोणा महामारी वाढत चालली असून त्यामुळे रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कोवीड हाँस्पिटलला भेटी देवुन कोरोना रुग्णांची माहीती घेतली त्या वेळी बर्याच ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासू लागल्याने श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी खासगी एजन्सी व ज्याच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहेत त्यांना ऑक्सिजन सिलेंडर शासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे संपूर्ण राज्यात हॉस्पिटल मध्ये कोरोणाचे रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरचा तुर्वटा  झालेला आहे सद्या खासगी व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत व ऑक्सिजन सिलेंडर चे एजन्सी धारक व काही खासगी लोकांकडे ऑक्सिजन सिलेंडर पडून आहेत आज व्यवसाया पेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने स्वताह प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी खासगी  व एजंसी धारकाकडे जाऊन ऑक्सिजन सिलेंडर चे रेकॉर्ड चेक करून माहिती घेतली व ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहनही केले आहे.श्रीरामपूर येथे अनेक एजन्सी आहेत व असे अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर चां वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो परंतु आज लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी व्यावसायिक व एजन्सी धारकांनी ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहन केले आहेत 
 

श्रीरामपूर पोलिसांना  गुप्त बातमीदार मार्फत  देवकर वस्ती येथे एक इसम गांजा विक्री करण्या करिता आला असले बाबतची  खात्रीशीर माहिती मिळाल्याने तेथे जाऊन छापा टाकला असता 4,60,000/  रुपये किमतीचा 46 किलो गांजा व 4,00,000/  रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकपअसा एकूण 8,60,000/- (8 लाख साठ हजार रुपयांचा) मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी गणेश भास्कर सरोदे वय 38 वर्ष राहणार देवकर वस्ती वार्ड नंबर 7  श्रीरामपूर . याचेविरुध्द  श्रीरामपूर शहर पोलीस  स्टेशन जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे . सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p. संदीप मिटके पोलीस निरीक्षक सानप,सपोनि संभाजी पाटील,पोहे का जोसेफ साळवी,  पोना  करमल,  पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव,सुनील दिघे आदींनी केली.

श्रीरामपूर -प्रतिनिधी - ज्याअर्थी मा मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, आपती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन , मंत्रालय, मुंबई यांचे संदर्भ क्रमांक ०१ मधील व मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे संदर्भ क्रमांक ०२ मधील आदेशान्वये राज्यात कोव्हीड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोविङ-१९ विषाणुचा फैलाय रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करणेबाबत आदेशीत केले आहे. त्यामर्थी दिनांक ५.४.२०२१ च्या मध्यरात्रीपासुन पुढील आदेश होईपर्यत अहमदनगर जिल्हयातील मद्य  विकी अनुज्ञप्तीसाठी मद्य विक्रीबाबत खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत. १. सप्ताहाच्या सोमवार ते शुक्रवार या दिवशी एफएल-३ अनुज्ञप्तीमध्ये ( परवानाकक्ष ) सकाळी ०७.०० ते ११.०० वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी मद्यविक्री करता येईल. तसेच संदर्भीय न.२ नुसार दिलेल्या आदेशात नमुद केलेल्या सुचना तंतोतंत लागू राहतील. २. नमुना एफएल-२ ब एफएल-डब्ल्यू-२ था अनुज्ञप्तीतून घरपोच या प्रकाराने मद्यविक्री करता येईल. नमूना सीएल-३ अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल, ३. अहमदनगर जिल्हयातील सर्व एफएल-१ ( विदेशी मद्याचे ठोक विक्रेते ) व सीएल-२ ( देशी मद्य ठोक विक्रेता ) या अनुज्ञप्तीचे व्यवहार उक्त नमूद गद्य विक्री अनुज्ञप्तीना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी ७..०० ते ११.०० या वेळेत सुरु ठेवता येतील.सिलबंद भाटलीतून घरपोच मद्य देण्याकरीता यापुर्वांच्या मा.शासन व मा.आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी. केंद्र सरकार व राज्य शासनाने दिलेले सुचना निर्देशाचे तंतोतल सर्वानी पालन करणे आवश्यक राहिल. तसेच कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत संदर्भ क्रमांक ०२ अन्वये देण्यात आलेले निर्देश व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे कराचयाची असून त्यात कसूर झाल्यास संबधीत अनुशाप्तीधारकाविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ / महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबधीतावर कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा सूचना असतानाही शहरामध्ये शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाईन शॉप मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून याकडे  पोलिसांची मात्र डोळे मिटून गाढ झोप चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. 


कोल्हार-कोल्हार भगवतीपूरमध्ये विनाकारण मोकाट फिरणार्‍यांवर आता कारवाईचा बडगा अन रस्त्यातच अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यास प्रारंभ झाला आहे. पॉझीटिव्ह निघणार्‍या रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोणी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील यांनी दिली.करोनाचा कहर दिवसागणिक नवा उच्चांक गाठत आहे. या महामारीने अनेकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे. शासनाकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही नागरिक सुधारायला तयार नाहीत. मृत्यूचे भयच त्यांना राहिलेले नसल्याने जनता कर्फ्यूमध्ये रस्त्यावर होणार्‍या गर्दीवरून दिसत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर ग्रामपंचायत, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी पोलीस आणि तलाठी यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून रस्त्यावर मोकाट भटकणार्‍यांवर अंकुश लावला जात आहे. कोल्हार-बेलापूर रस्त्यावर लोणी पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची जागेवरच अँटिजेंन रॅपिड चाचणी करण्यात येत होती. ज्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह येतील आशा नागरिकांना थेट अ‍ॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.त्यामुळे रस्त्यावर भटकंती करणार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे. यावेळी नगर-मनमाड रस्ता, बेलापूर चौक येथे नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत होती. सदर कारवाईत लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी, कोल्हार प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप, ग्रामसेवक शशिकांत चौरे, तलाठी सुरेखा अबुज, सहाय्यक फौजदार लबडे, पो. हे. कॉ. राजेंद्र औटी, पो. हे. कॉ. आव्हाड, पो. ना. शिवाजी नर्‍हे व कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे मे महीन्यात मोफत धान्याचे वाटप होणार असुन तसा आदेश कक्ष अधिकारी हेमंत वाडीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.या आदेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा या करीता महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये टाळेबंदी तसेच रात्रीच्या कालावधीसाठी संचारबंदी जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवर मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळविण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योंदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील ७ कोटी लाभार्थ्यांना एक महीन्याकरीता मोफत अन्नधान्य गहु तांदूळ  वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत देय धान्य तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असुन एप्रिल महीन्याचे विकतचे धान्य तसेच मे महीन्याचे मोफत धान्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असुन मे महीन्याचे धान्य मोफत देण्यात येणार आहे कार्डधारकांनी त्याचे पैसे देवु नये तसेच दुकानदारांनी मे महीन्यात रेग्यूलर धान्य वाटप करताना पैसे घेवू नये असेही आदेशात म्हटले असुन मे महीन्याच्या धान्यासाठी कार्डधारकांना आता पैसे मोजावे लागणार नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget