बेलापुर (प्रतिनिधी )- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे मे महीन्यात मोफत धान्याचे वाटप होणार असुन तसा आदेश कक्ष अधिकारी हेमंत वाडीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.या आदेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा या करीता महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये टाळेबंदी तसेच रात्रीच्या कालावधीसाठी संचारबंदी जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवर मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळविण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योंदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील ७ कोटी लाभार्थ्यांना एक महीन्याकरीता मोफत अन्नधान्य गहु तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत देय धान्य तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असुन एप्रिल महीन्याचे विकतचे धान्य तसेच मे महीन्याचे मोफत धान्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असुन मे महीन्याचे धान्य मोफत देण्यात येणार आहे कार्डधारकांनी त्याचे पैसे देवु नये तसेच दुकानदारांनी मे महीन्यात रेग्यूलर धान्य वाटप करताना पैसे घेवू नये असेही आदेशात म्हटले असुन मे महीन्याच्या धान्यासाठी कार्डधारकांना आता पैसे मोजावे लागणार नाही.
Post a Comment