गौतम हिरण यांच्या खूनामागील कारण अजुनही गुलदस्त्यात खूनाचे कोडे केव्हा उलगडणार.
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण होवुन दहा दिवस झाले तसेच मृतदेह सापडून चार दिवस उलटले तरी खूनाच्या कारणा पर्यत पोलीस अजुनही पोहोचले नसल्याबद्दल सर्व सामान्य नागरीकाकडून संताप व्यक्त केला जात आहे येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खूना संदर्भात पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी अपहरण व खूना मागील नेमके कारण शोधण्यात पोलीसांना अपयश आलेले आहे हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांचा झटापटीत मृत्यू झालेला असावा शव विच्छेदन अहवालातही डोक्याला गभींर ईजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे असे असले तरी पकडलेल्या आरोपींनी हत्या का केली याचा उलगडा पोलीसांना अजुनही झालेला नाही गुन्हा अन्वेषन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालुन तपास करत आहे परंतु गुन्हा घडण्यामागील महत्वाचे कारण आजही गुलदस्त्यात आहे गौतम हिरण यांचा खरा मारेकरी व त्यांच्या अपहरणा मागील कारण पोलीस केव्हा शोधुन काढतात याकडे हिरण परिवारासह ग्रामस्थांचेही लक्ष लागले आहे.