विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकरयांची घटनास्थळी भेट तपासाबाबत सुचना.
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील व्यापारी गौतम हिरण याचे अपहरण झालेल्या ठिकाणास विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकर यांनी भेट देवुन घटनाक्रम जाणुन घेतला या वेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके या वेळी उपस्थित होते विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकर यांनी हिरण यांचे गोदाम अपहरण झालेले ठिकाण याची पहाणी केली या घटनेत असणारे साक्षीदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली ज्या ठिकाणाहुन अपहरण झाले त्या ठिकाणाचीही पहाणी केली त्यानंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना तपासाबाबत सुचना केल्या या वेळी सरपंच महेंद्र साळवी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे भरत साळुंके देविदास देसाई प्रशांत लढ्ढा अमोल गाढे विशाल आंबेकर आदि उपस्थित होते
Post a Comment