बेलापुर (देविदास देसाई )-गौतम हिरण यांच्या अपहरण व खुन या गुन्ह्यात दोन आरोपी निष्पन्न झाले असुन सायंकाळ पर्यत त्यांना अटक करण्यात येईल असे ठोस अश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिल्यानंतर हिरण परिवाराने मृतदेह ताब्यात घेवुन त्याचेवर बेलापुर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह मिळाल्यानंतर व्यापारी वर्गात एक भितीचे वातावरण तयार झाले होते गौतम हिरण याचे अपहरण होवुन आठ दिवस झाले तरी पोलीसांना आरोपी सापडत नव्हते गौतम याच मृतदेह सापडल्या नंतर पोलीस सक्रिय झाले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोनदा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला बेलापुर ग्रामस्थांचा वाढता दबाव व विधान सभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलीस सक्रिय झाले संशयातुन पोलीसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले या दरम्यान औरंगाबाद येथुन शवाविच्छेदन करुन आल्यानंतर मृतदेह हिरण यांच्या श्रीरामपुर येथील निवासस्थानी आणण्यात आला तेथे हिरण परिवार व ग्रामस्थ यांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला खरे गुन्हेगार शोधुन त्यांना अटक करा आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली होती या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दोन आरोपी तपासात निष्पन्न झाले असल्याचे सांगितले ग्रामस्थ व हिरण परिवाराने आगोदर गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली अखेर सुनिल मुथा यांचेशी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी चर्चा केली या वेळी दोन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी हिरण कुटुंबीय व नातेवाईक बेलापुर ग्रामस्थ यांना सांगितले हिरण परिवार व बेलापुर ग्रामस्थ यांनी अखेर मृतदेह ताब्यात न घेण्याचे आंदोलन मागे घेतले व गौतम हिरण यांच्या मृतदेहावर बेलापुर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता.
Post a Comment