बेलापुर (देविदास देसाई )- येथील व्यापारी गौतम हिरण यांची हत्या करण्यात आली असुन त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात रुळाच्या कडेला आढळून आल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे
बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण याचे सोमवार १ मार्च रोजी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते त्या नंतर बेलापुर ग्रामस्थांनी बैठक घेवुन गाव बंद ठेवुन गौतम हिरण यांची माहीती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते त्याच बरोबर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी गाव बंद ठेवुन सोमवार पासुन बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता याचा दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उठविले होते त्यामुळे गौतम हिरण यांचा युध्द पातळीवर शोधा सुरु झाला होता अखेर आज रविवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रेल्वे रुळाच्या कडेला आढळून आला ही माहीती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली गौतम हिरण यांची हंत्या करुन चार ते पाच दिवस झाले असावेत त्यांनंतर प्रेताची दुर्गंधी सुटल्यामुळे मारेकर्यांनी रात्रीच्या वेळेस ते प्रेत निर्जन स्थळी टाकलेले प्रथम दर्शनी जाणवते गौताम हिरण यांच्या मारेकर्याचा तातडीने तपास करावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केलेली आहे.
Post a Comment