Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण होवुन दहा दिवस झाले तसेच मृतदेह सापडून चार दिवस उलटले तरी खूनाच्या कारणा पर्यत पोलीस अजुनही पोहोचले नसल्याबद्दल सर्व सामान्य नागरीकाकडून संताप व्यक्त केला जात आहे                                    येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खूना संदर्भात पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी अपहरण व खूना मागील नेमके कारण शोधण्यात पोलीसांना अपयश आलेले आहे हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांचा झटापटीत मृत्यू झालेला असावा शव विच्छेदन अहवालातही डोक्याला गभींर ईजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे असे असले तरी पकडलेल्या आरोपींनी हत्या का केली याचा उलगडा पोलीसांना अजुनही झालेला नाही गुन्हा अन्वेषन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालुन तपास करत आहे परंतु गुन्हा घडण्यामागील महत्वाचे कारण आजही गुलदस्त्यात आहे गौतम हिरण यांचा खरा मारेकरी व त्यांच्या अपहरणा मागील कारण पोलीस केव्हा शोधुन काढतात याकडे हिरण परिवारासह ग्रामस्थांचेही लक्ष लागले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील व्यापारी गौतम हिरण याचे अपहरण झालेल्या ठिकाणास विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकर यांनी भेट देवुन घटनाक्रम जाणुन घेतला या वेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके या वेळी  उपस्थित होते                                 विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्रचे प्रतापराव दिघावकर यांनी हिरण यांचे गोदाम अपहरण झालेले ठिकाण याची पहाणी केली या घटनेत असणारे साक्षीदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली ज्या ठिकाणाहुन अपहरण झाले त्या ठिकाणाचीही पहाणी केली त्यानंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना तपासाबाबत सुचना केल्या या वेळी सरपंच महेंद्र साळवी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे भरत साळुंके देविदास देसाई  प्रशांत लढ्ढा अमोल गाढे विशाल आंबेकर आदि उपस्थित होते


बेलापुर  (प्रतिनिधी  )- येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येनंतर आज  बेलापुर गावातील व्यवहार सुरळीत सुरु झाले या घटनेच्या निषेधार्थ बेलापुरगाव हे प्रथमच सलग तीन दिवस बंद होते.बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेतली त्या बैठकीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला शनिवार ग्रामस्थांनी बंद पाळला रविवार आठवडे बाजार होता त्यामुळे सर्व व्यापारी किरकोळ विक्रेते भाजीपाला विक्रेते आदिंनी दुकाने सुरु करण्यास सुरूवात केली नाही तोच गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्याची वार्ता येवुन धडकली लगेच व्यापारी व सर्व व्यवसायीकांनी आपले व्यवहार बंद केले त्यांनंतर सोमवारी अंत्यविधी होईपर्यत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवारी सायंकाळी गौतम हिरण यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे शनिवार रविवार व सोमवार अशी तीन दिवस बेलापुरची बाजारपेठ बंद होती आज व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु केली असली तरी सर्व व्यापारी प्रचंड दहशती खाली काम करताना दिसत आहे बेलापुर गावाकडे  वाकड्या नजरेने पहाण्याची कुणाची हिम्मत नव्हती आशा बेलापुरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याचा खून होने ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे गुंडगीरी करणारे गुंड आपल्या गावापर्यत पोहोचलेले आहे नव्हे कांहीचा त्यांना आश्रयही आहे काही लोक त्या टोळ्यातही वावरत आहेत काहीही काम धंदा न करणारा व्यक्ती पंचवीस तीस हजाराचा मोबाईल  महागडी गाडी वापरत असेल ते आले कोठून याचाही विचार ग्रामस्थांनी करण्याची गरज आहे गावातील जागृक नागरीकांनी पुढाकार घेवुन गावात येणारे नवखे अनोळखी यांना जाब विचारला पाहीजे सर्वात महत्वाचे म्हणजे गावात देखाव्यासाठी असलेली सि सि टी व्ही ची कुचकामी यंत्रणा आतातरी सुधारली पाहीजे प्रत्येक व्यापारी व्यवसायीकांनी आपल्या दुकानाच्या  आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी सि सि टी व्ही बसविणे अंत्यत गरजेचे आहे अन ते ही चालु स्थितीत असणे गरजेचे आहे गुन्हेगारांना कँमेर्याचा फार मोठा धाक असतोच शिवाय पोलीस यंत्रणेलाही तपास करण्यास सोपे जाते शिवाय एक कँमेरा आपल्या दुकाना भोवतालचा परिसरही कव्हर करणारा असल्यास आपण सुरक्षित राहु हे नियम आता काटेकोर पाळण्याची गरज आहे.


बेलापुर  (देविदास देसाई  )-गौतम हिरण यांच्या अपहरण व खुन या गुन्ह्यात दोन आरोपी निष्पन्न झाले असुन सायंकाळ पर्यत त्यांना अटक करण्यात येईल असे ठोस अश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिल्यानंतर हिरण परिवाराने मृतदेह ताब्यात घेवुन त्याचेवर बेलापुर येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह मिळाल्यानंतर व्यापारी वर्गात एक भितीचे वातावरण तयार झाले होते गौतम हिरण याचे अपहरण होवुन आठ दिवस झाले तरी पोलीसांना आरोपी सापडत नव्हते गौतम याच मृतदेह सापडल्या नंतर पोलीस सक्रिय झाले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील  दोनदा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला बेलापुर ग्रामस्थांचा वाढता दबाव व विधान सभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यामुळे पोलीस सक्रिय झाले संशयातुन पोलीसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले या दरम्यान औरंगाबाद येथुन शवाविच्छेदन करुन आल्यानंतर मृतदेह हिरण यांच्या श्रीरामपुर येथील निवासस्थानी आणण्यात आला तेथे हिरण परिवार व ग्रामस्थ यांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला खरे गुन्हेगार शोधुन त्यांना अटक करा आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली होती या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दोन आरोपी तपासात निष्पन्न झाले असल्याचे सांगितले ग्रामस्थ व हिरण परिवाराने आगोदर गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली अखेर सुनिल मुथा यांचेशी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी चर्चा केली या वेळी  दोन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी हिरण कुटुंबीय व नातेवाईक बेलापुर ग्रामस्थ यांना सांगितले हिरण परिवार व बेलापुर ग्रामस्थ यांनी अखेर मृतदेह ताब्यात न घेण्याचे आंदोलन मागे घेतले व गौतम हिरण यांच्या मृतदेहावर बेलापुर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापूर खुर्द येथील संजय लोखंडे यांचेवर प्नराणघातक हल्ला करणार्या  बिबटयास जेरबंद करण्यात वान विभागाला  अखेर यश आले असुन या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे              

   गेल्या 2, 3 महिन्यापासून  बिबटयाने परिसरात असणारे 

निरज प्रमोद पुजारी,आशिष पुजारी , शांताबाई जाधव,  यांच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. दोनच दिवासापूर्वी संजय लोखंडे हे मोटार सायकल वरुन घरी जात असताना याच बिबट्याने त्यांचेवर झेप घेवुन त्यांचे डोके जाबड्यात धरुन त्यांना खाली पाडले होते व शेजारील शेतात ओढत नेले सुदैवाने त्याची पकड सुटली बिबट्याने पुन्हा झेप घेतली असता संजय यांच्या हातात दगड आला तोच दगड त्यांनी झेप घेतलेल्या बिबट्याच्या जबड्यावर सारी ताकद एकवटुन मारला त्यामुळे बिबट्या गुरगुरत जागेवरच बसला संजय लोखंडे हळूहळू उभे राहत मागे सरकर सरकत गाडी जवळ आले त्या वेळी बिबट्याने पुन्हा दुसर्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या वेळी हातातील  दगड त्याने बिबट्याच्या दिशेने भिरकावला व आरडा ओरड सुरु केली त्यामुळे बिबट्या मागे सरकला तोच लोखंडे यांनी जिवाच्या आकांताने पळ काढला एक किलोमिटर पळत ते एका वस्तीवर पोहोचले दैव बलवत्तर म्हणून ते वाचले या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  

    वन विभागाला  या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती  शिरसगाव येथून पिंजरा  आणण्यासाठी  बालू पुजारी ,धनंजय पुजारी,सूर्यकांत लांडे साहेब, गोररक्षनाथ सुराशे साहेब यांच्या सहकार्याने  अजितराव देशमुख यांच्या  गट नं २५८ मधील शेतात पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे बिबटया अलगत पिंजऱ्यात अडकला व त्याने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केली. या आवाजाने परिसरात लोकांनी पिंजऱ्या कडे धाव घेऊन बघितले असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसतात बघ्यांची एकच गर्दी उसळली होती 

याकामी बेलापूर खुर्द चे उपसरपंच ऍड. दीपकराव  बाराहाते, ग्रामपंचायत सदस्यां प्रणालीताई भगत, राहुल भगत, ग्रा. स.दिलीप भगत , विनय भगत, प्रल्हाद पुजारी,निरज पुजारी,सत्यजीत देशमुख, धनंजय पुजारी, बालू पुजारी,अमोल पुजारी, मनोज पुजारी,बाळू पुजारी, रामेश पुजारी, सुरेश भगत, सुरेश पुजारी, मनोज पुजारी, मा. उपसरपंच शरद पुजारी, शशीकांत पुजारी, गणेश पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


बेलापुर  (देविदास देसाई )-  येथील व्यापारी गौतम हिरण यांची हत्या करण्यात आली असुन त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात रुळाच्या कडेला आढळून आल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे     

बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण याचे सोमवार १ मार्च रोजी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते त्या नंतर बेलापुर ग्रामस्थांनी बैठक घेवुन गाव बंद ठेवुन गौतम हिरण यांची माहीती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते त्याच बरोबर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी गाव बंद ठेवुन सोमवार पासुन बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता याचा दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उठविले होते त्यामुळे गौतम हिरण यांचा युध्द पातळीवर शोधा सुरु झाला होता  अखेर आज रविवार दिनांक  ७ मार्च रोजी सकाळी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रेल्वे रुळाच्या कडेला आढळून आला ही माहीती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली गौतम हिरण यांची हंत्या करुन चार ते पाच दिवस झाले असावेत त्यांनंतर प्रेताची दुर्गंधी सुटल्यामुळे मारेकर्यांनी रात्रीच्या वेळेस ते प्रेत निर्जन स्थळी टाकलेले प्रथम दर्शनी जाणवते  गौताम हिरण यांच्या मारेकर्याचा तातडीने तपास करावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केलेली आहे.


बेलापुर (प्रतिनिधी  )-  गौतम हिरण यांच्या अपहरणा बाबतचा तपास सुरु असुन ग्रामस्था इतकी आम्हालाही काळजी आहे तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली असुन पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हा पोलीस  प्रमुख मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगीतले                   बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होवुन आज पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना त्याच धर्तीवर शनिवार दिनांक ६ मार्च रोजी गाव बंदची हाक दिली आहे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत हा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे सायंकाळी आपल्या फौज फाट्यासह बेलापुर गावात दाखल झाले त्या नंतर त्यांनी हिरण यांचे गोडावुनला भेट दिली तसेच परिसरातील सि सि टी व्ही  फुटेजाची देखील पहाणी केली या घटनेत असणार्या साक्षीदारांशी देखील त्यांनी चर्चा केली त्या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार देविदास देसाई राम पौळ प्रशांत लढ्ढा प्रशांत शहाणे पंकज हिरण साहेबराव वाबळे योगेश नाईक राहुल लखोटीया प्रसाद खरात सचिन वाघ विशाल आंबेकरा अमोल गाढे संजय नागले  आदिंनी तपासा बाबत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संवाद साधला त्या वेळी या घटनेचा लवाकरात लवकर तपास लावावा जस जसा तपासास उशीर होत आहे तशी आम्हा ग्रामस्थ व हिरण कुटुंबीयांची चिंता वाढत आहे त्यामुळे आपण जातीने लक्ष घालुन गौतम हिरण याचा शोध घ्यावा व आरोपीना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप उपस्थितीत होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget