Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावात चाललेली दादागीरी भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी गावकरी मंडळाला विजयी करा गावकरी मंडळाची सत्ता आल्यास गावाची दशा बदलुन योग्य दिशा देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करु अशी ग्वाही गावकरी मंडळाचे प्रमुख व जि प सदस्य शरद नवले यांनी दिली. बेलापुर ग्रामपंचायतीच्या १७ जागे करीता होणार्या  गावकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद मदिर येथे माजी जि प अध्यक्ष मिस्टर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला  या वेळी  बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की गावकरी मंडळ सत्तेत आल्यावर पहीले प्राधान्य गावाला शुध्द पाणी देण्याचे नियोजन करु गावातील सर्व रस्ते डांबरीकरण करु तसेच वाड्या वस्त्यावरील रस्तेही दुरुस्त करु प्रवरा नदीत पडणारा कचरा बाजार तळावर पडणारा कचरा या कचर्याचा एक कोटी रुपयाचा घन कचरा प्रकल्प राबवु त्या करीता शेती महामंडळाची जमीन ताब्यात घेवु गावातील १७०० लाभार्थ्याची नावे ड वर्ग मध्ये असुन या सर्वांना आपल्याला घरकुल योजनेचा लाभ द्यावयाचा आहे  त्याच बरोबर गावात सर्व सामान्यासाठी संस्कृतीक भवनाची निर्मिती करुन तेथे विवाहची सोय करण्यात येईल तसेच तरुणासाठी जिम व महीलासाठी जाँगीग ट्रकची व्यवस्था केली जाईल असेही जि प सदस्य शरद नवले यांनी सांगीतले या वेळी बोलताना भाजपाचे सुनिल मुथा म्हणाले की दहा वर्ष ग्रामपंचायतीचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करणार्या नतद्रष्ट ठेकेदारांनी गावाला बदनाम केले विकास कामे कसे करावी याचा आदर्श समाजापुढे ठेवणारे कै ,जयंतराव ससाणे व कै .मुरलीधर खटोड यांना बदनाम करु नका भ्रष्टाचारामुळे गावाचा बट्ट्याबोळ झाला असुन गावाचा कायापालट करावयाचा असेल तर गावाकरी मंडळाला विजयी करा ज्यांनी शनि देवाला फसविले आपल्या निष्ठावंत कार्याकर्त्याला फसविले ते लोक मोठ मोठे अमिषे दाखवुन खोटी अश्वासने देवुन आपली मते मिळवतील व पाच वर्ष सत्ता भोगतील अन सत्तेतुन पैसा संपत्ती अन संपत्तीतुन पुन्हा सत्ता हे समीकरण आता हाणून पाडा असेही मुथा म्हणाले

श्रीरामपूर- पूर्वीपेक्षाही आजची पत्रकारिता प्रगल्भ झालेली आहे पत्रकारांना नवनवीन माध्यमे व त्यामध्ये झालेले बदल आत्मसात करून अनुभव व मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर भावी काळात वाटचाल करावी लागेल जो बदल स्वीकारणार नाही त्याची पत्रकारिता विशिष्ट अशा एका ढाच्यातच राहील त्यामुळे त्याचा परिणाम प्रसार माध्यमावर होऊन त्यांची आर्थिक झळ प्रसार माध्यमे चालवणाऱ्यांना सोसावी लागेल असा इशारा सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नागेश सावंत यांनी दिला कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते सिटिजन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या वृत्तपत्रे संघटनेने बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन हा पत्रकार दिनाचे आगाशे सभागृहात या ठिकाणी आयोजित केली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पदमाकर शिंपी हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे कोरोणाच्या संकटावेळी पत्रकारांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडले कुटुंबाची काळजी न करता सामान्यांना माहिती  पुरविण्याकरिता कसोसिने प्रयत्न केले अशा पत्रकारांचा गुणगौरव होणे हे नवोदित पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा खरा क्षण ठरेल असे ते म्हणाले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, अरुण पाटील, सुधीर वायखिंडे, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार सलीम पठाण, सुनील लोखंडे, जयेश सावंत, रोहित भोसले, प्रवीण जमदाडे, राहुल रणपिसे, बाबा वाघ, श्रीमती वैशाली थोरात, अमोल सावंत, रोहित डुकरे, यांच्यासह  प्रसारमाध्यमे व विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रीरामपुर-दतनगर येथे भिमा कोरेगांव विजयस्तंभ प्रतिकात्मक उभारून शुरविरांना अभिवादन केले, शासनाने कोराना प्रादुर्भाव मुळे भिमा कोरेगांव येथे जाने मनाई केली, शासकीय नियम पाळत दतनगर परिसरातील व पचंक़ोशितील प्रमुख मान्यवर, जि.प.सदस बाबासाहेब दिघे, पचायत समिती सभापती नाना साहेब शिंदे, दतनगर ग्रामपंचायत चे लोक नियुक्त सरपंच सुनिल भाऊ शिरसाठ, उप सरपंच, प्रेमचंद कूकंलोळ, भिमा भाऊ बागुल (आर पी आय, जिल्हा विभाग प्रमुख) माजी सरपंच पी.एस.निकम सर, तटांमुक्ती समिति अध्यक्ष रविद्र गायकवाड, दतनगर ग्रामपंचायत चे सदस्य, बाळासाहेब विघे, शहाजानभाई बागवान, प्रदीप गायकवाड, हिरामन जाधव, सुरेश जगताप, कीरण खडांगळे, राजंण खोल चे माजी  सरपंच राजुनाना गायकवाड, राजंण खोल पोलिस पाटील,अभंग, निलेश जाधव (राजंण खोल ग्राम.सदस) दतनगर माजी उप सरपंच, जगताप सर, सुनिल उबाळे सर, अशोक बोरगे, (कामगार नेते, ) सजंय बोरगे, सजंय शिरसाठ, सदीप यादव, मोसिन शेख, विकी भागवत, अविनाश जगताप, सचिन साळवे, बाबा बनसोडे, शैलेश गायकवाड,  अमित कोळगे, राजेन्द्र गायकवाड, आदी हजर होते, या कार्यक्रम चे सुत्रसचांलन, सी.एस.बनकर, यांनी केले, सोशल डिस्टन मास्क, सैनिटाईज सह कार्यक्रम करण्यात आला, शेवटी आभार व्यक्त अजय शिंदे यांनी केले,

श्रीरामपूर येथील मुस्लिम बकरसाब जमाती च्या वतीने जमातीचे नूतन अध्यक्ष इलाही बक्ष हाजी फकीर मोहम्मद कुरेशी व इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवार दिनांक 2-1- 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता बजरंग चौक वाड नंबर 2 याठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बकरकसाब समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बने साहब ताडे हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.अनिल कांबळे, शेतकरी संघटनेचे नेते अहमद भाई जागीरदार, माजी नगरसेवक नजीर भाई मुलानी, अलनुर संघटनेचे अध्यक्ष जावेद भाई शेख, गणेश वायदंडे, तिरंगा न्यूज चॅनलचे संपादक असलम बिन साद, तिरंगा न्यूजचॅनलचे उपसंपादक जावेद शेख, गणेश ताकपिरे, फकीर मोहम्मद शेख, अकबर भाई शेख,अमीर बेग मिर्झा आदीसह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )-कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरीकांचे रक्षण करणार्या   पोलीसांचा स्थापना दिनानिमित्त  पत्रकार व ग्रामस्थांच्या वतीने पोलीसांचा सत्कार करण्यात आला        पोलीस स्थापना दिनानिमित्त श्रीरामपुर वहातुक शाखेचे सहाय्यक फौजदार देविदास रजपुत हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे निखील तमनर प्रसाद ईंगळे हरिष पानसंबळ यांचा सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले चंद्रकांत पा .नाईक तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार सुहास शेलार किशोर कदम अजिज शेख श्रीरामपुर तालुका पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष दिलीप दायमा उपस्थित होते  या कार्यक्रमाचे प्रास्तविक देविदास देसाई यांनी केले तर रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.

राहुरी (  प्रतिनिधी मिनाष पटेकर) तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अशोक पाटील यांच्या घरात गॅस टाकीचा स्पोट होऊन सुमारे सव्वा सहा लाख रूपयांचे गृहपयोगी सामान जळून खाक झाले. सुदैवाने घरातील सहाजण बचावले. ही घटना २ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात काही काळ भिती निर्माण झाली होती. 

      अशोक आत्माराम पाटील हे राहुरी कृषी विद्यापीठात नोकरी करत आहेत. ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दत्त वसाहत मध्ये आपल्या कुटूंबासह राहत आहेत. दिनांक २ जानेवारी रोजी पहाटे सव्वाचार वाजे दरम्यान अशोक पाटील हे नेहमी प्रमाणे उठले. उठल्यानंतर त्यांनी पाणि गरम करण्यासाठी गॅस पेटवीला. काही वेळातच गॅस टाकीने पेट घेतला. आणि आगीने रौद्र रूप धारण केले. अशोक आत्माराम पाटील, त्यांची पत्नी, दोन मुले व दोन भाचे असे एकूण सहाजण घरात होते. घरात लागलेली आग पाहून सर्वजण बाहेर पळाले. याचवेळी गॅस टाकीचा भयानक असा स्पोट झाला. घरावरील पत्र्याचे छत तोडून गॅस टाकी सुमारे ५० फूट वर उडाली होती. नशीब बलवत्तर म्हणून घरातील सहाजण वाचले. यावेळी घरातील ३ तोळे सोने व ३५ हजार रूपये रोख रक्कमेसह लोखंडी कपाट, लाकडी फर्निचर, कपडे, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक स्कूटी असा एकूण ६ लाख २२ हजार ५०० रूपयांच्या गृहपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घरातील लोखंडी सामानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. 

       देवळाली नगरपरिषद मधील अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत सर्वकाही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपूरे, राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदुभाऊ डोळस, पत्रकार अयुबभाई पठाण, निर्मलाताई मालपाणी, निसारभाई शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पिडीत कुटूंबाची चौकशी केली. तसेच तहसीलदार फसिओद्दीन शेख, तलाठी अभिजीत शिरसागर, कोतवाल राधेश्याम मेहेरे, राजेंद्र गाडेकर यांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला.

पाटणबोरी- जनता हायस्कूल पाटणबोरी येथे भव्य मैदानात अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ पाटणबोरी यांच्या वतीने देशाच्या संरक्षण निधिकरिता स्वतःक्रिकेट खेळणारे भारतातील एकमेव मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा. कन्नमवार यांच्या स्मरणार्थ  कन्नमवार चषक - २०२० आयोजन करण्यात आले.  १९६२ ला भारत चीन युद्ध परिस्थितीत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा. सा. यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांनी सोपविली आणि ते केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले. नुकतेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळत दादासाहेबांनी युद्धमय परिस्थितीत राष्ट्रीय संरक्षणनिधी करिता भरभक्कम आघाडी उभारली. प्रत्येक मंत्री- उपमंत्र्याकडे जिल्हाची जबाबदारी विभागून दिली. केंद्राकडून तसेच आपल्या राष्ट्रीय नेत्याकडून येणारा प्रत्येक आदेश कार्यान्वित करून *कोट्यावधी रुपयांचा निधी व सोने गोळा केले. त्याकरीता त्यांनी तुफानी दौरे केले.* तसेच विविध कार्यक्रम घेतले.त्यापैकी मुख्य 1) जनसंपर्कातून प्रचंड निधी, 2) सहामाही कार्यक्रम, 3) क्रिकेट मॅच , 4) श्रमदान सप्ताह, 5) " हमारा हिमालय प्रदर्शन", 6) व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम इत्यादी होत. त्यांनी केलेल्या कार्याचा स्मरण व्हावा याकरिता अक्षय तोटावार पाटणबोरी येथे कन्नमवार चषक क्रिकेट स्पर्धा दि. 11 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत आयोजित केलेला होता. जवळपास 50 संघ सहभागी होते, महाराष्ट्रात सर्वप्रथम कन्नमवार चषक ची सुरुवात अक्षय तोटावार यांच्या संकल्पनेतून सुरू झाला. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी केलेले कार्य जनमानसात पोहचावा हा उद्देश ठेवून कन्नमवार चषक आयोजित केलेला होता, त्यांच्या या संकल्पनेला संपुर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून स्तुती करण्यात आली. 

अंतिम सामना पाटणबोरी व सतपल्ली वठोली या संघा दरम्यान झाला . अंतिम सामन्यात सतपल्ली वठोली संघाने एकतर्फे विजय मिळवत कन्नमवार चषक - 2020 चा मानकरी ठरला. याबक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश्वर गोंड्रावार,सभापती पं.स.झरीजामनी हे होते, प्रमुख पाहुणे ऍड.किष्टांन्ना मुत्यलवार, जिल्हाध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना, यवतमाळ, हनमंतु कायपेल्लीवार,सरपंच कोपामांडवी, हनमंतु रजनलवार, सेवानिवृत्त तहसीलदार, विनोद बोरतवार, उपाध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना, यवतमाळ, गजानन चंदावार,कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र,रोहित माडेवार,नागपूर,संदिप मुत्यलवार, वणी बेलदार समाज शहर अध्यक्ष, अनिल कर्लावार, अध्यक्ष युवा बेलदार समाज संघटना शाखा, पाटणबोरी, श्री.अशोक गंड्रतवार,सचिव यु.बे.स.स.शाखा पाटणबोरी श्री.रमेश बनपेल्लीवार सर, श्री.विनोद कनाके, श्री.सचिन पत्रकार ( MCN NEWS ) श्री.सुबोध जंगम, श्री. विकास कांबळे , श्री.गणेश बोनपेल्लीवार , रामुलू अडपावार, माधव बोलचेट्टीवार, शंकर पत्तीवार सर, मधुसूदन अडपावार, दत्तात्रय देवलवार सर, रमेश तोटावार, राजू बोलचेट्टीवार, राकेश अडपावार आदी उपस्थित होते . प्रथम पारितोषिक राजेश्वर गोड्रावार,सभापती पं.स.झरीजमणी व राजू पसलावार, सदस्य पं.स.सदस्य पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने सतपल्ली वठोली संघाला देण्यात आला.द्वितीय पारितोषिक शिनुअण्णा नालमवार,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ , पाटणबोरी संघाला देण्यात आला. परंतु हा संघ बक्षीस स्वतःजवळ न ठेवता  सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण करत आहे या विध्यार्थ्यांकरिता दिले.तृतीय पारितोषिक गजानन बेजंकिवार,  सदस्य जि.प.यवतमाळ व सभापती कृ.उ.बाजार समिती पांढरकवडा  जाणता राजा पाटणबोरी संघाला देण्यात आला. 

वैयक्तिक पारितोषिक मध्ये उत्कृष्ट खेडाळू करीता प्रदीप बोनगीरवार सर याचे कडून निखिल गिज्जेवार, व अनिल मोहिजे, उत्कृष्ट संघ रोहित माडेवार यांच्या तर्फे सतपल्ली वठोलीसंघ, मॅन ऑफ दि सिरीज अँड.किष्टना मुत्यलवार यांचे कडून गणेश कांदसवार , बेस्ट बॅट्समन,हनमंतु कायपेल्लीवार यांचे कडून प्रवीण गिज्जेवार , बेस्ट विकेट, संदिप मुत्यलवार वणी यांचे कडून राहुल डोंगुरवार, मॅन ऑफ दि मँच, अनिल कर्लावार यांचे कडून राहून मोहिजे, बेस्ट बॉलर,अशोक गंड्रतवार यांचे कडून राहुल मोहिजे , बेस्ट कॅच म्हणून दत्तात्रय देवलवार यांचे कडून प्रतीक आईटवार, बेस्ट 3/4 म्हणून संदिप केमेकार यांचे कडून निखिल लक्षट्टीवार ,बेस्ट विकेट किपर - श्री.गणेश बोनपेल्लीवार यांचे कडून आयसन शेख , मॅन ऑफ दि टुर्नामेंट प्रवीण गिज्जेवार ला देण्यात आले. अशा प्रकारे कन्नमवार चषक यशस्वितेकरिता पाटणबोरी व कोपमांडवी, वणी, नागपूर , मांडवी, इ .भागातून देणगी दात्यांनी आर्थिक मदत केली ही.

क्रीडा सामन्याच्या यशस्वीत्याकरीता अक्षय तोटावार मित्र क्रीडा मंडळ , पाटणबोरी व बेलदार समाज बांधव , पाटणबोरी वाशीयांनी तन-मन-धना ने सहकार्य केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राकेश मंदीकुटावार सर यांनी व आभार प्रदर्शन श्री.शंकर पत्तीवार सर यांनी केले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget