अशोक आत्माराम पाटील हे राहुरी कृषी विद्यापीठात नोकरी करत आहेत. ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील दत्त वसाहत मध्ये आपल्या कुटूंबासह राहत आहेत. दिनांक २ जानेवारी रोजी पहाटे सव्वाचार वाजे दरम्यान अशोक पाटील हे नेहमी प्रमाणे उठले. उठल्यानंतर त्यांनी पाणि गरम करण्यासाठी गॅस पेटवीला. काही वेळातच गॅस टाकीने पेट घेतला. आणि आगीने रौद्र रूप धारण केले. अशोक आत्माराम पाटील, त्यांची पत्नी, दोन मुले व दोन भाचे असे एकूण सहाजण घरात होते. घरात लागलेली आग पाहून सर्वजण बाहेर पळाले. याचवेळी गॅस टाकीचा भयानक असा स्पोट झाला. घरावरील पत्र्याचे छत तोडून गॅस टाकी सुमारे ५० फूट वर उडाली होती. नशीब बलवत्तर म्हणून घरातील सहाजण वाचले. यावेळी घरातील ३ तोळे सोने व ३५ हजार रूपये रोख रक्कमेसह लोखंडी कपाट, लाकडी फर्निचर, कपडे, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक स्कूटी असा एकूण ६ लाख २२ हजार ५०० रूपयांच्या गृहपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घरातील लोखंडी सामानाचे अक्षरश: तुकडे झाले होते.
कृषी विद्यापीठाच्या,दत्त वसाहती मधे जळीत.
राहुरी ( प्रतिनिधी मिनाष पटेकर) तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अशोक पाटील यांच्या घरात गॅस टाकीचा स्पोट होऊन सुमारे सव्वा सहा लाख रूपयांचे गृहपयोगी सामान जळून खाक झाले. सुदैवाने घरातील सहाजण बचावले. ही घटना २ जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात काही काळ भिती निर्माण झाली होती.
देवळाली नगरपरिषद मधील अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत सर्वकाही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपूरे, राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदुभाऊ डोळस, पत्रकार अयुबभाई पठाण, निर्मलाताई मालपाणी, निसारभाई शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पिडीत कुटूंबाची चौकशी केली. तसेच तहसीलदार फसिओद्दीन शेख, तलाठी अभिजीत शिरसागर, कोतवाल राधेश्याम मेहेरे, राजेंद्र गाडेकर यांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला.
Post a Comment