Latest Post

श्रीरामपूर तालुक्यातील विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे, साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या मातोश्री, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांचे दुपारी १२ : ३० वाजेच्या सुमारास, वृद्धापकाळाने निधन झालय, निधना वेळी त्यांचे वय ८५ वर्ष होते, जयंतराव ससाणे यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीत, स्वर्गीय रत्नमाला ससाणे यांचा मोलाचा वाटा होता, त्या सुनील ससाणे यांच्या मातोश्री व उपनगराध्यक्ष करण जयंत ससाणे, यांच्या आजी होत्या. आपल्या मनमिळावू स्वभाव तसेच प्रत्येकाशी त्याचे वैयक्तिक संबंध होते, श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांच्या जाण्याने, तालुक्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुयोग मंगल कार्यालय याठिकाणी आले होते, सायंकाळी श्रीरामपूर येथील अमरधाम या ठिकाणी , श्रीमती रत्नमाला मुरलीधर ससाणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा ,३ सुना, ४ नातवंड, असा मोठा परिवार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायतीचे साडे तीन लाख रुपयाचे सामान चोरीस गेले असुन या गंभीर घटनेस आठ दिवस उलटून गेले तरी तेरी भी चुप मेरी भी चुप असाच काहीसा प्रकार या घटने बाबत घडलेला आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर गावाला पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे लोखंड पडलेले होते तसेच तेथे पाणी शुध्द करण्यासाठी वापरण्यात येणारे टि सी एल पावडर तुरटी आदी सामान पडलेले होते या ठिकाणी देखरेखीसाठी  एका कर्मचार्याची  देखील नेमणूक केली जाते या शिवाय या ठिकाणी सि सि टी व्ही कँमेर्याचा देखील वाँच असतो असे असताना ग्रामपंचायतीच्या मालकीचे साडे तीन लाख रुपये किमतीचे सामान चोरी जाणे म्हणजे विश्वास न बसणारी गोष्ट आहे परंतु  हे घडले आहे अन त्या घटनेस आज आठ दिवस झालेले असुन त्या बाबत ग्रामसेवक राजेंद्र  तगरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बेलापुर पोलीसाकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले तीन साडे तिन लाख रुपयाचे भंगार व इतर साहीत्य चोरीस गेल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला   या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता हवालदार अतुल लोटके व पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी सकाळी फोन आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला या बाबत सखोल माहीती घेतली असता कुंपणच शेत खात असल्याचे बोलले जात असुन गावातील गटबाजीचा फायदा उठवुन काहींनी हा उद्योग केलेला असल्याची चर्चा आहे हे करत असताना त्या महाभागांनी आपले कारनामे कँमेर्यात बंद होवु नये म्हणून आगोदर सि सि टी व्ही  कँमेर्याच्या केबल जाळल्याची चर्चाही चालु आहे  बेलापुर ग्रामपचायतीत प्रशासक असुन गावात मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे त्यातच ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्यामुळे नेते मंडळीही माहीत असताना गप्प आहे या चोरी बाबत बेलापुर पोलीसांनी तपास करुन त्यातील खरे गुन्हेगार समोर आणावे अशी मागणीही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

राहुरी  प्रतिनिधी( मिनाष पटेकर )राष्ट्रवादी काॅग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना,संभाजी ब्रिगेड,विर लहुजी सेना, संत सावता माळी युवक,भारत मुक्ती मोर्चा, मराठा महासंघ, यशवंत सेना,अदि पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांनी राहुरीचे तहसिलदार  व पोलिस निरिक्षक यांना निवेदन देत राहुरी बंद ठेवणेचे आवाहान केले आहे.

      गेल्या अनेक दिवसापासून पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र वर्तमान भाजपा केंद्र सरकार करत आहे. देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा जाचक कायदा रद्द करावा ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य करावी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा याकरिता भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. दिनांक ८ डिसेंबर रोजी होत असलेल्या भारत बंद मध्ये राहुरी तालुका आणि परिसरातील  शेतकरी, शेतमजूर, महिला ,पुरुष तसेच युवकांनी व राजकीय-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व  संघटनांना याद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

       यावेळी डाॅ प्रकाश पवार,दत्ता कवाने,रविद्र आढाव,नंदु तनपुरे,मच्छिद्र गुंड,राहुल शेटे,राजेद्र खोजे,संजय संसारे,कांतीलाल जगधने,सचिन ठुबे ,कांता तनपुरे संदिप आढाव संतोष आघाव दिनेश वराळे ,सुनिल इंगळे,अनिल भट्टड,शंकर धोंडे,दिलीप चौधरी,सुनिल तनपुरे,पांडु उदावंत,संदीप कवाने,अभिजित नरोडे, बिलाल शेख,किशोर येवले, अदि उपस्थित होते.

राहुरी ,(प्रतिनिधी मिनाष पटेकर राहुरी) दि. 7 डिसेंबर, 2020 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आज नामदार श्री. दादाजी भुसे, मा. मंत्री, कृषि आणि माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी विविध प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, कुलगुरु डॉ. अशोक ढवण, राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष श्री. पोपटराव पवार, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव श्री. मोहन वाघ,शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री रावसाहेब खेवरे , नियंत्रक श्री. विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, मा. मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. रफिक नाईकवाडी, श्री. सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवाजी जगताप, विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. आनंद सोळंके यावेळी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री महोदयांनी विद्यापीठातील फॉरेज कॅक्टस प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, बांबु संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, कृषि अवजारे प्रकल्प, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान प्रकल्पास भेट दिली. या भेटी दरम्यान मंत्री म्हणाले विद्यापीठ स्थापन होऊन 52 वर्ष झाले असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान अनेक शेतकर्यांपर्यंत पोहचले आहे. बांबु प्रकल्पास भेट देतांना ते म्हणाले 1995 साली बांबु लागवडीचे मिशन हे शेतकर्यांनी सुरु केले होते. पालघरच्या आदिवाशी भगिनींचे बांबु प्रक्रियेवर चांगले काम केलेले आहे. कृषि अवजारे प्रकल्पाला भेट देतांनी ते म्हणाले विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर कृषि अवजारांची निर्मिती करणे गरजेचे आहे. शासन फळ लागवडीला प्रोत्साहन देत आहे पण उत्पादित फळांच्या मुल्यवर्धनावर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या एका संशोधनाने लाखो शेतकरी आनंदी होतात हे विद्यापीठातील डाळिंब आणि ऊस संशोधनाने अधोरेखीत केलेले आहे. 

यावेळी विविध प्रकल्पांना भेट देतांना कृषि मंत्र्यांनी प्रक्षेत्रावरील मजुरांशी देखील संवाद साधला. याप्रसंगी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्र प्रकल्पाच्या भेटीच्या वेळी श्री. पोपटराव पवार माहिती देतांना म्हणाले विद्यापीठाच्या 953 हेक्टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प आदर्शवत असून या प्रकल्पाद्वारे 123 टी.सी.एम. पाण्याची साठवणूक जमिनीत झालेली आहे. या प्रकल्पामुळे या प्रक्षेत्रावर कर्बाचे प्रमाण किती वाढले, मातीची सुपीकता, जमिनीची सुधारणा या संदर्भात अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प देशासाठी आदर्शवत प्रकल्प असून हा संपूर्ण देशात राबविणे गरजेचे आहे. या भेटीच्या वेळी डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ. सचिन नांदगुडे, प्रा. प्रसन्न सुराणा, डॉ. बाबासाहेब सिनारे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. विक्रम कड, डॉ. सुमती दिघे, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. अनिल काळे, प्रा. मंजाबापू गावडे आणि डॉ. अशोक वाळूंज यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.


श्रीरामपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजरत्न भीमसैनिक मित्र मंडळ प्रभाग क्रमांक १३ या ठिकाणी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भागातील लहान मुलांनी अभिवादन पर गीत सादर केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुनील शिंदे, आबासाहेब निकम, वंदना पवार, हर्षकांत बल्डोटा, बबलू गायकवाड, विकी सातुरे यांनी पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाचे संचालन अमोल सोनावणे यांनी केले. रमेश कासार, अरबाज सय्यद, वाल्मीक त्रिभुवन, अल्ताफ सय्यद, राहुल साळवे, सतीश लोंढे, फिरदौस पठाण, मनोज निकम, महेश शेलार आदी. या प्रसंगी भागातील लहान मुले, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर नगर परिषद पाणी पुरवठा विभागाकडून शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याच्या नगर पालिकेकडे वेळोवेळी अनेक तक्रारी करुनही कोणीच दखल घेत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोयफ जमादार यांच्या जे.जे. गृपतर्फे शेवटी उपोषणाचा मार्ग स्विकारणे भाग पडले आहे,

कोरोना महामारीच्या संकटाने भेडसावत असलेल्या परिस्थितीला पोषक वातावरण देऊन विविध साथी आजाराला जणू निमंत्रणच देऊ पाहणार्या संबधीत नगर पालिका प्रशासन नेमके काय साध्य करु पहात आहे हे न समजनण्या पलिकडचे होऊन बसले आहे.

सदरील नळांद्वारे येणारे घाण पाणी पिण्यात येत असल्याने विविध साथीचे आजार बळावण्यास जरासाही विलंब लागणार नाही,त्यात आधीच कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने नगर पालिका प्रशासन का बरे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ?, हे देखील एक न उलगडणारे कोडेच होऊन बसले आहे,

नगर पालिकेच्या अशा गलथान कारभारामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर नगर पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून नळांद्वारे होणारा दुषित पाण्याचा पुरवठा त्वरीत शोधून बंद करण्यात यावा  अशी या उपोषणाच्या माध्यमातून जे.जे.गृपतर्फे मागणी करण्यात येत आहे,

तमाम शहरवासीयांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्यानेच शहरातील इतरही अनेक सामाजिक संघटनांचा या उपोषण/आंदोलनास पाठिंबा मिळत आहे यामुळे शहरातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये अधिकाधिक आपला सहभाग नोंदवावा तथा समस्त शहरवासीयांची या त्रासापासून मुक्ती होणे कामी पुढाकार घ्यावा असे अवाहनही जे.जे.गृपतर्फे करण्यात येत आहे.

श्रीरामपुर  (क्राईम रिपोर्टर )- बलात्कार केल्याची धमकी देवुन वारंवार पैशाची मागणी करुन पैसे देवुनही एका  महीलेच्या  तक्रारी वरुन माझ्यावर खोटा  गुन्हा दाखल करण्यात आला असुन आपलेही म्हणणे ऐकुन संबधीत महीले विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी विकास वाघ यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अहमदनगर याच्याकडे केली आहे .सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमुळे सध्या प्रसार माध्यमामध्ये हनी ट्रँपची जोरदार चर्चा सुरु असुन या हनी ट्रँप मध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे काहींचे कौटुंबिक तसेच आर्थिक नुकसानही झालेले आहे अशाच हनी ट्रँपचा बळी विकास वाघ हा पोलीस अधिकारी ठरला असुन आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा वाघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त  केली विकास वाघ यांनी आर्थिक गुन्हे शाखा तसेच कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टेशनमध्ये काम केलेले होते या दरम्यान केडगाव येथील एक महीला त्यांच्याकडे तक्रार घेवुन आली की कुणीतरी आपल्याला व्हाँट्सअप वर घाणेरडे मेसेज पाठवत आहे त्या वेळी तुम्ही आपसात तडजोड करुन द्या असे त्या महीलेने सांगितले परंतु रितसर तक्रार देण्यास नकार दिला त्या नंतर पुन्हा दुसरा व्यक्ती त्रास देत असल्याबद्दल तक्रार घेवुन तिच महीला आली त्या वेळेसही लेखी तक्रार देण्यास नकार दिला व मला वारवार त्रास दिला जातो त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर द्या अशी मागणी त्या महीलेने केली वाघ यांनी त्या महीलेस नंबर दिल्यानंतर ती महीला या ना त्या कारणाने फोन करु लागली व मी नाशिक येथे पोलीस शिपाई या पदावर काम करत असल्याचे सांगितले  त्या नंतर वाघ यांच्याशी जवळीक वाढवुन बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशाची मागणी सुरु केली त्या मागणीला वाघ यांनी भिक न घातल्यामुळे संबधीत महीलेने वाघ यांच्या पत्नीला फोन करुन शिवीगाळ करुन धमकावले तसेच वाघ यांचे फेसबुकवरील फोटो स्वतः सोबत जोडत त्यांची  बदनामी सुरु केली या बदनामीच्या भितीपोटी वाघ यांनी  तिला हे सर्व थांबविण्याची विनंती केली असता मला २५ लाख रुपये खंडणी  द्यावे लागतील अशी मागणी तिने केली वाघ यांनी कंटाळून पाच लाख रुपये दिले त्या नंतरही वाघ यांना पैशाची मागणी सुरुच राहीली पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवु लागली या बाबत वाघ यांनी २५ मे रोजी मा जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देवुन कळविले होते त्या नंतर पुन्हा त्या महीलेस वाघ यांनी  चार लाख रुपये दिले तरीही खंडणी मागणे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरुच होते एका महीलेच्या खोट्या तक्रारी वरुन वाघ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या बाततचे निवेदन १ डिसेबंर रोजी मा जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले आहे  त्या निवेदना सोबत पैशाची मागणी करणारी आँडीओ क्लिप देखील  पाठवीली आहे वाघ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणार्या महीलेवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विकास वाघ यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या  निवेदनात केली आहे


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget