श्रीरामपुर (क्राईम रिपोर्टर )- बलात्कार केल्याची धमकी देवुन वारंवार पैशाची मागणी करुन पैसे देवुनही एका महीलेच्या तक्रारी वरुन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आपलेही म्हणणे ऐकुन संबधीत महीले विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी विकास वाघ यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अहमदनगर याच्याकडे केली आहे .सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमुळे सध्या प्रसार माध्यमामध्ये हनी ट्रँपची जोरदार चर्चा सुरु असुन या हनी ट्रँप मध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे काहींचे कौटुंबिक तसेच आर्थिक नुकसानही झालेले आहे अशाच हनी ट्रँपचा बळी विकास वाघ हा पोलीस अधिकारी ठरला असुन आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा वाघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली विकास वाघ यांनी आर्थिक गुन्हे शाखा तसेच कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टेशनमध्ये काम केलेले होते या दरम्यान केडगाव येथील एक महीला त्यांच्याकडे तक्रार घेवुन आली की कुणीतरी आपल्याला व्हाँट्सअप वर घाणेरडे मेसेज पाठवत आहे त्या वेळी तुम्ही आपसात तडजोड करुन द्या असे त्या महीलेने सांगितले परंतु रितसर तक्रार देण्यास नकार दिला त्या नंतर पुन्हा दुसरा व्यक्ती त्रास देत असल्याबद्दल तक्रार घेवुन तिच महीला आली त्या वेळेसही लेखी तक्रार देण्यास नकार दिला व मला वारवार त्रास दिला जातो त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर द्या अशी मागणी त्या महीलेने केली वाघ यांनी त्या महीलेस नंबर दिल्यानंतर ती महीला या ना त्या कारणाने फोन करु लागली व मी नाशिक येथे पोलीस शिपाई या पदावर काम करत असल्याचे सांगितले त्या नंतर वाघ यांच्याशी जवळीक वाढवुन बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशाची मागणी सुरु केली त्या मागणीला वाघ यांनी भिक न घातल्यामुळे संबधीत महीलेने वाघ यांच्या पत्नीला फोन करुन शिवीगाळ करुन धमकावले तसेच वाघ यांचे फेसबुकवरील फोटो स्वतः सोबत जोडत त्यांची बदनामी सुरु केली या बदनामीच्या भितीपोटी वाघ यांनी तिला हे सर्व थांबविण्याची विनंती केली असता मला २५ लाख रुपये खंडणी द्यावे लागतील अशी मागणी तिने केली वाघ यांनी कंटाळून पाच लाख रुपये दिले त्या नंतरही वाघ यांना पैशाची मागणी सुरुच राहीली पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवु लागली या बाबत वाघ यांनी २५ मे रोजी मा जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देवुन कळविले होते त्या नंतर पुन्हा त्या महीलेस वाघ यांनी चार लाख रुपये दिले तरीही खंडणी मागणे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरुच होते एका महीलेच्या खोट्या तक्रारी वरुन वाघ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या बाततचे निवेदन १ डिसेबंर रोजी मा जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले आहे त्या निवेदना सोबत पैशाची मागणी करणारी आँडीओ क्लिप देखील पाठवीली आहे वाघ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणार्या महीलेवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विकास वाघ यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे
Post a Comment