अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सकतमजुरी व 50 हजार दंडाची शिक्षा,तपासी अधिकारी Dysp संदिप मिटके यांच्या मेहनतीला यश.

दि. 15/09/2018 च्या 3 ते 4 दिवस अगोदर सायंकाळच्या वेळेस पिडीत मुलगी भराड गल्ली तोफखाना अहमदनगर येथे   बाकड्या जवळ सायकल खेळत असताना आरोपी क्र 1 अफसर लतीफ सय्यद हा पीडित मुलीला बंद घराच्या छतवर् घेऊन गेला व् तिचे कपडे काढले तिच्या गालावर व मांडीवर हाताने मारहाण केली व् तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी आरोपी क्र 2 मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही एक सांगू नकोस नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली व तिला तिच्या घरी पाठवून दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी  अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीस  पुन्हा सायंकाळी चे वेळेस त्यात ठिकाणावरील  बाकड्या जवळून उचलून त्यांच्या  घराच्या छतावर नेले आरोपीने पीडित   मुलीस जीवे मारण्याची भीती   दाखवून  तिला विवस्त्र केले व तिच्यावर शारीरिक अत्याचार केला तसेच कोणाला काही सांगू नको नाहीतर मी तुझा जीव घेईल  असे म्हणून घरी पाठवून दिले त्यानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखत असलेने फिर्यादी हि तिला दवाखान्यात चल असे महणाली असता पीडित मुलगी  घाबरलेली होती फिर्यादी हिस काही सांगत नव्हती हे पाहून फिर्यादीने तिच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतले व पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने तीन दिवसापूर्वी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले फिर्यादीने सदर घटनेबाबत तिच्या पतीला सांगितल्यानंतर ते पीडित मुलीस तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी घेऊन गेले सदर घटनेबाबत आरोपीविरुद्ध भा द वि क ३७६( ए)( बी) ३५४,३२३,५०६सह् ३४ तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरकषण कायदा( पॉक्सो)२०१२ चे कलम५( एम),६ व१७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संदीप मिटके DySP व पोलिस उपनिरीक्षक व्ही एल सणस यांनी केला गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध विरुद्ध मा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी वकील म्हणून सतीश पाटील , तर पैरवी अधिकारी म्हणून काशीद व बांदल यांनी सहकार्य केले.  सदर प्रकरणात मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस एल अनेकर साहेब यांनी  आरोपी क्र. 1 अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे  संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि *20 वर्षे सक्तमजुरी व ५००००रु दंड* दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्रमांक 2) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय 52 वर्ष रा.भराड गल्ली मीरा वली बाबा दर्गाजवल तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचारापहोती. संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे   17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना आधी काही (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सदर गुन्हा घडल्या नंतर सर्व धर्मीय लोकांचा मोर्चा निघाला होता त्यामुळे संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget