Latest Post

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींना पारनेर न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.    पोलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणाहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ मनिषा डुबे यांनी आरोपींच्या दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती़ न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़.      दरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी रात्री रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेक-यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलिस पथके रवाना करण्यात आली होती.    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेक?्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अटक केलेले दोघे कोल्हार येथील असून ते कोल्हार परिसरात लपून बसले होते. तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला होता. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत. 

श्रीरामपूर गेल्या अनेक दिवसापासून श्रीरामपूर नगरपरिषदेकडून गुमट वास असलेला बेचव रंगहिन पाण्याच्या सर्रास पुरवठा होत असल्याबाबत जे . जे . फौडेशनच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना काही दिवसापूर्वी निवेदन देवून नगरपरिषदेकडून दुषित पाण्याचा पुरवठा त्वरीत थांबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे लेखी निवेदन देण्यात आले . नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने दि . ७/१२/२०२० रोजी पासून जे . जे . फौडेशनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषणासह वेगवेगळ्या स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात दिला आहे . शहरातील नागरिकांना स्वच्छ , निर्मळ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे . कुमट वास असलेले पाणी , गढूळ झालेले बेचव व रंग बदलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना ताप , घसा दुखणे , सर्दी - पडसे या सारखे आजार निर्माण झालेले आहेत . लहान बालकांना ही श्वासनाचे आजार ही होत आहे . पाण्याच्या चवीमध्ये फेर बदल झाल्याने मानवनिर्मिती आपत्तीने सर्व सामान्याचे आजार बळावत आहे . सत्ताधारी - विरोधक एकमेकांविरुद्ध आरोप - प्रत्योरोप करण्यात धन्यता मानत असून नागरिकांच्या आरोग्याकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही . नगरपरिषदेमधील सुंदोपसुंदी वाक्प्रचारामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत असून शहराची उचांवलेली प्रतिष्ठा धुळीस मिळत चालेली आहे . एकेकाळी नावारुपास आलेली नगरपरिषद आता ग्रामपंचायतीसारखी झाली आहे . अशी तक्रार ही श्री.जमादार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे . 

            बेलापूर (प्रतिनिधी  )-येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना नुकताच जागतिक संविधान व संसदीय संघाचा (WCPA) चा "वर्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2020" श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील ,तहसिलदार प्रशांत पाटील,प्रकाश कूलथे समन्वयक दत्ता इघावे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात  आला.                               संशोधन, साहित्य, शिक्षण,सामाजिक ,प्रशासकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.तसेच "वर्ड पार्लमेंट कोरोना वाँरियर्स पुरस्कार" मिळाला आहे.डॉ. कोकाटे यांची सात पुस्तके प्रसिद्ध असून त्या उत्तम कवयित्री आहेत..सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या बहिःशाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या आहेत तसेच एम.फील.व पीएच.डीच्या त्या संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करतात.त्याच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांनी संशोधन पदवी संपादन केली आहे.नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना प्रभारी प्राचार्य पदासाठी मान्यता दिली आहे..त्यांचे शैक्षणिक, संशोधन,प्रशासकीय, वारकरी संप्रदाय,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असे आहे.महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत डॉ. कोकाटे हिरीरीने सहभाग घेतात..त्या महाराष्ट्र साहित्य परिषद श्रीरामपूर शाखा तसेच शब्दगंध परिषद श्रीरामपूर शाखेच्या उपाध्यक्ष आहेत.त्यांना राज्यस्तरावर 14 पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे  अध्यक्षपद भुषविले आहे..शब्दगंध परिषद अहमदनगरच्या काव्य संमेलनाचे तसेच शिवांजली साहित्य काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.डॉ. कोकाटे यांना या कार्यक्रमात वर्ड कन्सिट्यूशन अँण्ड पार्लमेंट असोशिएशनची मेंबरशिप दिली गेली आहे.त्यांनी श्रीथिएटर्स अँण्ड हेल्पिंग हँन्डस संस्था निर्मित " कागूद " लघूपटात आईची भूमिका साकार केली आहे.अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर त्यांचे अनेकदा काव्य वाचन व्याख्यान व मुलाखतीच्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले आहे.गेल्या दिड वर्षांपासून त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून  नियमानुसार  प्रशासकीय कामे करुन आपला नावलौकिक मिळविला आहे.या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा,उपाध्यक्ष अशोक साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड,सचिव अँड.शरद सोमाणी, दिपक सिकची, बापूसाहेब पुजारी,  राजेश खटोड,भरत साळुंके,रविंद्र खटोड,राजेंद्र सिकची,सुविद्या सोमाणी, अँड.विजय साळुंके, प्रा.हंबीरराव नाईक, नंदूशेठ खटोड,शेखर डावरे श्रीवल्लभ राठी,हरिश्चंद्रपाटील महाडिक,सुरेश मुथा,प्रेमा मुथा,मधुकर दराडे,अशोक भगत,नारायणदास सिकची,शिक्षक प्रतिनिधी अनिल तायडे ,बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई ज्ञानेश्वर गवले ,नवनाथ कुताळ  व ईतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी, पालकांनी अभिनंदन केले आहे.
Aad 1

श्रीरामपुर:(प्रतिनिधी रईस शेख )भारतीय लहुजी सेना श्रीरामपुरचे वतीने क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची २२७वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान यांच्या हस्ते

क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे प्रतिमेस

पृष्हार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले जयंती कार्यक्रमास बाळासाहेब बागुल ,हानिफ भाई पठान, यांच्यासह जिल्हाप्रमुख रज्जाक भाई शेख  ,संपर्क प्रमुख शेख अहमद नसीर, बाळासाहेब त्रिभोवन,रईस शेख, संजय थोरात, सिकंदर तांबोली, संदीप शेडगे, असिफ तांबोळी, शेरू कुरैशी,रमीज पोपटीया,साबीर शाहा,अब्दुल शेख, सलमान पठान, मेहमूद पठान, ज्ञानेश्वर सोनार,  अदीसह अनेक कर्यकते उपस्थित होते...


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुर शहरात खरेदी करत असताना रोख रक्कम व दागिने असा आडीच लाखाचा हरवलेला ऐवज पोलीसांनी तातडीने शोध घेवुन त्या महीलेस काही तासातच परत मिळवुन दिल्यामुळे त्या महीलेला गहीवरुन आले  या बाबत माहीती अशी की श्रीरामपुर येथील राहाणारी यास्मिन दिलावर शेख ही महीला काही सामान खरेदी करण्यासाठी मेनरोडला आली होती मेनरोडला नटराज गल्लीत खरेदी करत असताना यास्मिन शेख या महीलेची पर्स चुकुन कुठेतरी हरवली त्या पर्समध्ये सव्वा दोन लाख रुपयाचे दागिने व रोख रक्कम असा आडीच लाख रुपयाचा ऐवज होता या बाबतची तक्रार यास्मिन शेख यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला दिली श्रीरामपुर  शहर पोलीसा स्टेशनचा कार्यभार पहात असलेले भापोसे आयुष नोपाणी यांनी हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे यांना तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या हवालदार अतुल लोटके व पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक शरद वांढेकर यांनी त्या सर्व परिसरातील सि सि टी व्ही कँमेरे तपासले त्यात एक वयोवृध्द व्यक्ती ती पर्स उचलताना आढळून आली पोलीसांनी त्या व्यक्तीचा शोध घेवुन पर्स बाबत विचारपुस केली असता त्याने सापडलेली पर्स काढुन दिली त्यात दागिने व रोख रक्कम तशीच होती पोलीसांनी यास्मिन शेख या महीलेस बोलावुन घेतले व भापोसे यांना महीलेचे दागिने परत देण्याबाबत सुचविले भापोसे आयुष नोपाणी यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दागिन्याचा शोध घेणारे हवालदार लोटके व भिंगारदे यांच्या हस्तेच यास्मिन शेख यांना दागिने परत दिले  हरवलेली पर्स दागीने व रोख रकमेसह सही सलामत मिळाल्यामुळे त्या महीलेस गहीवरुन आले यास्मिन शेख यांनी भापोसे आयुष नोपाणी व हवालदार लोटके , भिंगारदे ,वांढेकर यांचे आभार मानले

शिर्डी (प्रतिनिधी) -शिर्डी जवळील डोराळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून करण्यात आला असून त्यामुळे शिर्डी डोराळे परिसरातील नागरिकांमधून खळबळ उडाली आहे ,ही घटना शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे,

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून खून करण्यात आला आहे, यासंदर्भात फिर्यादी प्रवीण माधव धारे( वय 25) राहणार जवळके यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून यामध्ये म्हटले आहे की आरोपी चांगदेव पूजा डांगे, शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे रा,डोराळे यांनी हा खून केला आहे, दिनांक 27 नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान योगेश सोपान दंवगे (वय28) राहणार पाथरे वारेगाव तालुका सिन्नर व फिर्यादी प्रवीण महादेव धारे या दोघांना शिवा रहाणे यांच्याकडून पैसे घेतले व ते घेण्यासाठी या तिघांनी या पैशाच्या देवाण घेवाण वरून प्रवीण महादेव धारे व योगेश सोपान दवंगे यांना शिवीगाळ करत धरुन हातातील धारदार शस्त्राने वार केले ,आरोपी चांगदेव पूजा डांगे ,शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे यांनी योगेश सोपान दवंगे याला पकडून यांच्यावर धारदार शस्त्राने पोटावर, छातीवर वार केल्याने गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे ,या घटनेमुळे शिर्डी डोराळे परिसरात मात्र खळबळ उडाली आहे,चांगदेव डांगे ,शंकर डांगे, अमोल डांगे राहणार डोराळे यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन 755 / 2020भादवि कलम 302/ 307/ 504// 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही घटना घडताच घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव , पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे,सपोनि मिथुन घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली, आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली आहे, यासंदर्भात शिर्डी चे पोलीस निरीक्षक प्रवीण चंद लोखंडे हे अधिक तपास करीत आहेत, शिर्डी मध्ये देशमुख परिवर काही दिवसांपूर्वीच एक खून झाला होता व आता दुसरा हा खून शिर्डीजवळ होत आहे त्यामुळे शिर्डी व परिसरात नागरिकांमधून मोठी खळबळ निर्माण झाली आहे,




श्रीरामपुर  (प्रतिनिधी )-:श्रीरामपूर तालुक्यातील निमगांव खैरी - चितळी शिवारातील दिघी चारी जवळील शेतरस्त्याच्या कडेला लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास वनविभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोडल्याचे सांगितल्यामुळे एकच बिबट्या दोन ठिकाणी सोडलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे                 निमगाव खैरी चितळी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला . या भागात बिबट्याची प्रंचड दहशत झाली होती. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह निमगाव खैरी- चितळी येथुन अनेकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

    गेल्या काही दिवसापुर्वीच निमगाव खैरी गावा लगतच एक शेळी देखील बिबट्या ने फस्त  केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी दुपारच्या वेळी मेंढ्या चारत असलेल्या  कळपातुन भर दुपारी मेंढी ओढत जवळच्या ऊसात घेऊन गेला होता.  ,त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली होती   त्यानुसार वनविभागाने पिंजरा लावल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता.

 वनपाल बी.एस. गाडे , वनरक्षक गोरख सुराशे, श्री लांडे व इतर कर्मचाऱ्या सह परिसरातील शेतकरी - ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा बिबट्या जेरबंद झाल्याने परीसरातील शेतकरी व वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र पुन्हा हाच बिबट्या अनेक नागरिकांना दिसल्याने नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त केला आहे वन विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन  संबधीत सर्वच जबाबदार कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.

*जिल्हाभर बिबट्याचे हल्ले वाढले असुन अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्यात निष्पाप लहान मुले, वृद्ध यांचे बळी गेल्याच्या घटना ताज्या असुन शासनस्तरावर योग्य निर्णय होऊन एखाद्या अभयारण्यात बिबट्यांची व्यवस्था होणे गरजेचे असुन निमगांव खैरी भागात पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अवघ्या ४ कि.मी. वर असलेल्या नाऊर भागात सोडणे ही गंभीर बाब असुन या संदर्भात राज्यमंत्री तथा वन मंत्री प्राजक्त तनपुरे यांचेशी संपर्क झाला असुन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचेशी संपर्क साधुन मुजोर अधिकाऱ्या वर कारवाई ची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र ग्रामिण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष 

बाळासाहेब नवगिरे*यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 

दरम्यान जाफराबाद चे सरपंच संदिप शेलार यांनी वनपाल श्री. गाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बिबट्या संदर्भात उडवा उडवीचे उत्तरे देऊन तुम्हाला कुणही मंत्र्याकडे वनमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सह वरिष्ठा कडे  कुठे तक्रार करायची असेल तर करा, माझी बदलीची तयारी आहे, अशी भाषा सरकारी कर्मचाऱ्याने वापरल्याने तिव्र सांताप व्यक्त होत आहे संबधित बिबट्या हा जखमी अवस्थेत होता, या बिबट्यावर प्राथमिक उपचार करणे गरजेचे असतांना तसेच त्यावर पाणी मारणे गरजेचे असुन सुद्धा या बिबट्याची कोणतीही प्राथमिक काळजी न घेता हा जखमी बिबट्या तसाच सोडून देणे, ही वनविभागाची गंभीर चुक असल्याचे यावेळी नागरिकां मधुन बोलले जात होते . तसेच हा जखमी बिबट्या कोणा वर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget