श्रीरामपुर (प्रतिनिधी )- श्रीरामपुर शहरात खरेदी करत असताना रोख रक्कम व दागिने असा आडीच लाखाचा हरवलेला ऐवज पोलीसांनी तातडीने शोध घेवुन त्या महीलेस काही तासातच परत मिळवुन दिल्यामुळे त्या महीलेला गहीवरुन आले या बाबत माहीती अशी की श्रीरामपुर येथील राहाणारी यास्मिन दिलावर शेख ही महीला काही सामान खरेदी करण्यासाठी मेनरोडला आली होती मेनरोडला नटराज गल्लीत खरेदी करत असताना यास्मिन शेख या महीलेची पर्स चुकुन कुठेतरी हरवली त्या पर्समध्ये सव्वा दोन लाख रुपयाचे दागिने व रोख रक्कम असा आडीच लाख रुपयाचा ऐवज होता या बाबतची तक्रार यास्मिन शेख यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला दिली श्रीरामपुर शहर पोलीसा स्टेशनचा कार्यभार पहात असलेले भापोसे आयुष नोपाणी यांनी हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे यांना तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या हवालदार अतुल लोटके व पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक शरद वांढेकर यांनी त्या सर्व परिसरातील सि सि टी व्ही कँमेरे तपासले त्यात एक वयोवृध्द व्यक्ती ती पर्स उचलताना आढळून आली पोलीसांनी त्या व्यक्तीचा शोध घेवुन पर्स बाबत विचारपुस केली असता त्याने सापडलेली पर्स काढुन दिली त्यात दागिने व रोख रक्कम तशीच होती पोलीसांनी यास्मिन शेख या महीलेस बोलावुन घेतले व भापोसे यांना महीलेचे दागिने परत देण्याबाबत सुचविले भापोसे आयुष नोपाणी यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दागिन्याचा शोध घेणारे हवालदार लोटके व भिंगारदे यांच्या हस्तेच यास्मिन शेख यांना दागिने परत दिले हरवलेली पर्स दागीने व रोख रकमेसह सही सलामत मिळाल्यामुळे त्या महीलेस गहीवरुन आले यास्मिन शेख यांनी भापोसे आयुष नोपाणी व हवालदार लोटके , भिंगारदे ,वांढेकर यांचे आभार मानले
Post a Comment