Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- विविध गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेल्या गुन्हेगाराच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ती गाडी व गावठी कट्टा पोलीसाच्या ताब्यात मिळाला असुन ती गाडी पोलीस स्टेशनला आणणार्या व्यक्ती विरुध्द आर्म अँक्टचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न  ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांना मागे घ्यावा लागला. या बाबत समजलेली माहीती अशी की पोलीसांना खंडणी मारामारी दहशत पसरविणे धमकावणे अशा वेगवेगळ्या  गुन्ह्यात हवा असणारा गुन्हेगार  आकाश अशोक बेग उर्फ टिप्या बेग याच्या गाडीचा श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर असणार्या मोसंबी बागेजवळ अपघात झाला त्या वेळी दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या वेळी दोन्ही गाडी चालकांची आपापसात समेट झाली

त्यामुळे कुणीही पोलीसांकडे तक्रार दाखल केली नाही दरम्यान दोन्ही अपघातग्रस्त गाड्या दुरुस्तीसाठी आणत असतानाच एक गाडी गुन्हेगार टिप्या बेग याची असल्याची बातमी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीराट यांना समजली त्यांनी तातडीने ती गाडी ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्या वेळी बेलापुरातील नितीन शर्मा हा ती गाडी घेवुन येत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले त्यावेळी गाडीत गावठी कट्टा आढळला त्यामुळे पोलीसांनी नितीन शर्मा याचेवर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली हे भाजपाचे कार्यकर्ते सुनिल मुथा यांना समजताच त्यांनी ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली नितिम शर्मा हा केवळ अपघातग्रस्त गाडी आणत होता त्यामुळे त्याचेवर खोटा गुन्हा दाखल करु नका नाहीतर गाव बंद ठेवु रस्ता रोको करु असा ईशारा देण्यात आला भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते व सुनिल मुथा यांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधुन खोटा गुन्हा दाखल करु नये

अशी मागणी केली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याशी चर्चा केली व नितीन शर्मा याचा जबाब घेवुन सोडून देणार असल्याचे सांगितले त्यामुळे सुनिल मुथा व प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणारे आंदोलन स्थगीत करण्यात आले त्या नंतर पत्रकाराशी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यास पाठीशी घालण्याचा कुणीही प्रयत्न करु नये आकाश बेग उर्फ टिप्या बेगवर  वेगवेगळ्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गाडीला अपघात झाल्याचे समजताच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने तातडीने ती (एम एच ०२ ऐ पी ९२१६ )गाडी ताब्यात घेवुन झडती घेतली असता गाडीत तीन राऊंड व एक गावठी कट्टा आढळला असुन तो जप्त करण्यात आला आहे फरार झालेल्या गुन्हेगाराचा शोध सुरु असुन लवकरच त्याला अटक करु असा विश्वासही पोलीस निरीक्षक बहीरट यांनी व्यक्त केला. 

 


बुलडाणा - 23 ऑक्टोबर

गुंडाचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात प्रथमच भेट देताच ,गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले. मीना यांनी येथे दाखल होत प्रलंबित गुन्ह्यां विषयी आढावा बैठक घेऊन  जिल्ह्यातील 33 पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून पारदर्शीपणे कामकाज करण्याच्या सुचना दिल्या.पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना हे बुलडाणा शहरात येत असल्याने विशेष उपाययोजना करीत शहरातील 2 नंबरचे धंदे म्हणजे ठिकठिकाणी थाठलेले वरली मटक्याचे दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

    अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात दाखल होत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. विशेषतः खून, बलात्कार, महिला अत्याचार, चोरी, घरफोडी आदी घटनांसंदर्भात त्यांनी माहीती जाणून घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

     आगामी नवरात्रोत्सव,ईदए मिलाद या सण उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा, व शांतता अबाधित राहावी या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना पारदर्शीपणे काम काज करावे असे आवाहन केले. दरम्यान नवनिर्माणाधिन पोलीस कर्मचाऱ्यांच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी देखील केली. तत्पूर्वी उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले असता, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे,हेमराज राजपूत,रमेश बरकते, प्रिया ढाकणे, नलावडे, कोळी, विलास यामावर आदी डीवायएसपी, प्रभारी गृह पोलिस उपअधिक्षक बळीराम गिते, बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे, ग्रामीण ठाणेदार सारंग नवलकर यांच्यासह जिल्ह्यातील 33 पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते. 


बलडाणा - 23 ऑक्टोबर

नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून व मोठ्या वाहनातून इतर दोन लहान वाहनात दारूचे बॉक्स क्रॉसिंग करताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 16 सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले होते.या तीन्ही वाहनांना बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावुन त्याची चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे देण्यात आली होती.ही तिन्ही वाहन बुलडाणा न्यायालयच्या आदेशाने काल रात्री सोडण्यात आले आहे.

     य्या बाबत अधिक अशे की,एका आयशर वाहन देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन नागपूरहुन औरंगाबादकडे निघाला होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर-अमरावती-अकोला-खामगाव-चिखली-जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलडाणाच्या दिशेने निघाला व बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठे आयशर वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात दारुचे बॉक्स क्रॉसिंग केले जात असताना त्या ठीकाणी बुलडाणा एलसीबीच्या पथकाने धडक देऊन वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहन चालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे व अनाधिकृतपणे दारुचे बॉक्स क्रॉसिंग केले जात आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले होते.हे प्रकरण राजयउत्पादन शुल्क विभाग बुलडाणा यांना देण्यात आले मात्र बिल्टी औरंगाबादची असल्याने प्रकरण औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाला वर्ग करण्यात आले.या प्रकारणाची चौकशी आयुक्त मुंबई यांच्या कड़े सुरु असून तिन्ही वाहन व दारू आपल्या ताब्यात द्यावी अशी दाद मे निर्मल ट्रेडर्स,सांवगी, औरंगाबाद यांच्या कडून बुलडाणा न्यायालयात मागण्यात आली असता सदर दारुचे तिन्ही वाहन सुपर्दनाम्यावर सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिल्याने 22 ओक्टोबरच्या रात्री तिन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठण्यातून तब्बल 36 दिवसानंतर सोडण्यात आले आहे.


बुलडाणा - 22 ओक्टोबर

बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम भादोला येथील नारायण भाऊराव जोशी यांची शेती गावातीलच शालिकराम तोताराम उबरहंडे यांनी बटाईने केली होती.या शेतात त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगुन त्याची सोडी लावण्यात आली होते. 21 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर सोयाबीन सुडीला आग लावून दिली यात शेतकऱ्याचे 90 क्विंटल सोयाबीन किंमत अंदाजे 4 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. याप्रकरणी शालिकराम तोताराम उबरहंडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार जनार्दन इंगळे करीत आहे.

बुलडाणा - ऑक्टोबर 

शहरातील रामनगर भागातील रहिवासी 36 वर्षीय व्यक्तिने आपल्या राहत्या घरच्या वरील मजल्यावर एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घड़ली. मृतकाचे नाव आशिष सुरेश शेळके असे आहे.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर ठाण्याचे पीएसआई विनीत घाटोळ आपल्या पथका सह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण मृतदेहला जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठवला आहे.शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील पोलिस करत आहे.

बुलडाणा - 22 ऑक्टोबर

बुलडाणा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला नसल्याने मोठ्या प्रमाणात नंदुरबार तसेच मध्यप्रदेश होऊन वाळू बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयच्या पथकाने मलकापूर मार्गावरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ एका वजन काट्यावर  उभा असलेला मोठा ट्रक क्र MH 28 AB 9282 याची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेशच्या होशंगाबाद येथील नर्मदा नदीतील  वाळू दिसून आली.ट्रक चालकाकडून रॉयल्टीची तपासणी केली असता रॉयल्टीची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सदर ट्रक बुलडाणा तहसील कार्यालयात लावण्यात आलेला आहे. पुढील तपास बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार अमरसिंह पवार करीत आहे.

मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समुळ उच्चटन करण्यासाठी पथकाची नेमणुक केलेल्या पथकाने आज दिनांक २२/१०/२०२० रोजी दुपारी १६.०० वाजेचे सुमारास श्रीरामपुर गावात बेलापुर ते पुणे रोडाचे बाजुला अनारसे हॉस्पीटल चे समोर दुर्गा सोलर अॅण्ड आर.ओ हाऊस दुकानाचे शेजारी एका पत्र्याचे दुकानात अंकसंटा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला असता तेथे एकुन ०६ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळुन आले असुन त्यांचे कडुन सुमारे ११७८०/- रुपये रोख व जुगाराची साधने मिळुन आले असुन सदर छाप्याची कारवाई करुन आरोपीतांना पोलीस ठाणे येथे घेवुन जात असतांना पथकातील अधिकारी व कर्मचारी अशांनी पुन्हा श्रीरामपुर गावात शिवाजी चौकात चंद्रकांत भेळ वाल्याशेजारी असलेल्या पत्र्याचे टपरीचे आडोश्याला सार्व जागी १७.०० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखिल एकुन ०५ आरोपी हे कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आले त्यांचे कडुन ७११०/ रुपये रोख व जुगाराची साधने मिळून आले. वरील केलेल्या कारवाई बाबत श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गु.र नं २१०६/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४/५ प्रमाणे तसेच श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे भाग ६ गुर नं २१०७/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई हो मा विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. डॉ.प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सपोनि/सचिन जाधव, पोसई/संदिप पाटील, असई/राजेंद्र सोनवणे, पोना/१०५१ नितीन चंद्रकुमार सपकाळे, पोकॉ/१०६० विश्वेश हजारे, पोको १५६५ दिपक ठाकुर, पोकाँ/उमाकांत खापरे, पोकॉ/१९२१ नारायण कचरु लोहरे यांनी केली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget