Latest Post


बुलडाणा - 6 ऑक्टोबरबु

लडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असून झपाट्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशात बुलडाणा जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेले 3 जाणांचा आज 6 ऑक्टोबर रोजी मृत्यु झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिली आहे.या मध्ये घारोड ता. खामगाव येथील 80 वर्षीय पुरुष, हिंगणा ता खामगाव येथील 78 वर्षीय पुरुष व वाडी खामगाव येथील 76 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7849 कोरोनाबाधित रूग्ण संख्या झाली आहे.तसेच आजपर्यंत 102 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर परिसरातील एकलहरे आठवाडी शिवारात पोलीसांनी एका गोदामावर पहाटेच छापा टाकुन विस लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन पोलीसांच्या या कारवाईमुळे गुटखा चालकांचे धाबे दणाणले आहे. पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे यांना गुप्त माहीती मिळाली की एकलहरे आठवाडी शिवारात आसलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा उतरविला जाणार आहे त्या प्रमाणे पोलिस उपअधिक्षक दिपाली काळे मँडम यांनी उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना कारवाईच्या सुचना दिल्या त्या नुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी पी.एस.आय.स्टाप पथका समवेत गोदामात छापा टाकला गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला पोलीसांनी सर्व माल जप्त केला असुन कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले  या छाप्प्याबाबत परिसरात वेगवेगळी चर्चा चालु असुन दोन गुटखा व्यापार्याच्या व्यवसायीक स्पर्धेतुन ही टिप देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे गुटखा  पकडण्यात आला होता परंतु काहीच कारवाई झाली नाही आपला माल आपलाच धंदेवाला पकडून देत असल्याच्या कारणातुन ही पक्की खबर देण्यात आल्याची चर्चा चालु आहे.


श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात सुरु असलेले कोरोना सेंटर बंद करुन त्या ठिकाणी ईतर रुग्णावर उपचार केंद्र सुरु करावे अशी मागणी पंचायत सामितीचे  उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी केली आहे.  प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पंचायत समितीचे उपसाभापती बाळासाहेब  तोरणे यांनी पुढे म्हटले आहे की उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केल्यामुळे इतर आजारावर उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे विशेष करुन गर्भवती महीलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव दुसर्या दवाखान्यात  जावे लागते पूर्वी ग्रामिण रुग्णालयात महीलांना प्रसुती पूर्व व प्रसुती नंतर होणारे उपचार तपासण्या तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी गर्दी होत असे लहान मुलांचे लसीकरण सर्पदंश श्वानदंश उपचार या करीता देखील मोठी गर्दी होत असे परंतु कोविड सेंटर सुरु केल्यापासुन आजारी रुग्ण दवाखान्यात फिरकत नाही या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी व अँडमिट करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही तसेच डाँक्टर व पुरेसा कर्मचारी वर्गही उपलब्ध नाही या उलट संतलुक हाँस्पीटल येथे १०० खाटांचे कोरोना रुग्णालय असुन त्या ठिकाणी बोटावर  मोजण्या ईतकेच रुग्ण उपचार घेत आहे अजित दादा पाँलिटेक्निक काँलेज येथेही १०० खाटांचे कोविड सेंटर सुरु असुन तेथेही उपचार घेणार्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे या उलट चित्र खाजगी कोविड सेंटरमधे पहावयास मिळत आहे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहे त्यामुळे उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात सुरु असलेले कोविड सेंटर बंद करुन ते रुग्ण संतलुक हाँस्पीटल व अजितदादा पाँलीटेक्निक काँलेज येथे हलवावे अशी मागणीही उपसभापती तोरणे यांनी केली आहे


बुलडाणा - 5 ऑक्टोबर

दोन गटात तुंबळ हाणामारी होउन त्यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी (लव्हाळा) येथे रविवारी रात्री घडली आहे . गावातील काही घरांची व दुचाकींची जाळपोळ करण्यात करण्यात आल्याचे समजते. पोलीसाने 10 आरोपींना अटक केले आहे.

      या बाबत मिळालेली माहिती अशी की,लोणी (लव्हाळा) येथील एका समाजात (पारधी) वाद सुरू होता म्हणून महादू शिवाजी देशमूख व राजू देशमुख यांनी एकच समाजातील दोन्हीकडील लोकांना समजावून सांगत असतांनाच राजेंद्र बाळाजी भोसले, कपूर भोसले, सखाराम भोसले व दहिमल भोसले यांनी तलवार,कुऱ्हाडी व लाकडी दांड्यांनी मारहाण करून गंभीर जख्मी केले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू देशमुख  व महादू देशमुख या दोघांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असुन विठ्ठल देशमुख , श्रीमंत देशमुख यांना बुलडाणा येथे भरती करण्यात आले आहे .याविषयी फिर्यादी महादु शिवाजी देशमुख तर्फे पीएसआय दिपक राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजेंद्र बाळाजी भोसले , कपुर बाळाजी भोसले , सखाराम बाळाजी भोसले , चुमा भोसले , जितेंद्र बाळाजी भोसलेसह पाच महिलांवर विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत .तर 

जाळपोळ प्रकरणी शारदा दहिमल भोसले हिने दिलेल्या फियार्दीत नमूद केले आहे की , माझी मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली असता अतूल देशमुख याने शिवीगाळ केली त्यावरुन वाद झाल्यानंतर आमच्या घरांची नासधूस करुन जाळपोळ करून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली . त्यात माझ्या हाताला मार लागला. यावरुन ठाणेदार संग्राम पाटील यांनी राजू दत्तात्रय देशमुख, महादू शिवाजी देशमुख , विठ्ठल शिवाजी देशमुख, अतुल देशमुख व इतर सात ते आठ लोकांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले असून घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पंखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर , ठाणेदार संग्राम पाटील , पोउपनि दीपक राणे यांनी भेट दिली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

भुकेने व्याकुळ झाले पोलीस कर्मचारी

कधी आणि कुठे धावून जावे लागेल हे पोलिसांसाठी काही निश्चित नसते, अनेक वेळी आपले कर्तव्य पार पाळत असतांना पोलिस बांधवांना उपाशी ही राहावे लागतात.काही अशीच परिस्तिथि आज दिसून आली. आमच्या प्रतिनिधीने लोणी गावात जावून घटनास्थळी भेट दिली असता तेथे काल रात्री पासून कर्तव्यवर तैनात काही पोलीस कर्मचारी दिसले व सर्वांचे चेहेरे उतरले होते ते सर्व भुकेने व्याकुळ झालेले दिसून आले.

जर पोलीस वेळेवर पहोचले नसते तर ......

लोणी येथे काल रविवारी रात्री घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील पोलीस कर्मचारी ताबडतोब घटना स्थळी पहोचले व परिस्तिथी नियंत्रणात आणली. जर पोलीस लवकर घटनास्थळी पोहोचले नसते तर मोठा अनर्थ झाला असता असे काही नागरिकांनी माहिती देताना सांगितले.


बुलडाणा - 5 ऑक्टोबर

बुलडाणा तहसीलदार संतोष शिंदे यांची बदली अकोला येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी पदी करण्यात आली असून बुलडाणा तहसीलदार पदी उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून रुपेश खंडारे यांची बदली झाली आहे. यापूर्वी रूपेश खंडारे यांनी बुलडाणा जिल्ह्यात काम केलेले आहे.एक चांगला व मनमिळावू व्यक्तिमत्व असून त्यांनी सहायक जिल्हा पूरवठा अधिकारी, मोताळा तहसिलदार व नांदूरा येथे तहसिलदार म्हणून काम पाहीले आहे.रुपेश खंडारे यांनी आज सोमवारी बुलडाणा तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.



बुलडाणा - 5 ऑक्टोबर 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातील राजकारण तापले होते.अनेक सिने कलाकार ड्रग्स घेतात याची चौकशी सुरु झाली आहे.करोडो चाहत्यांना आपल्या अदाकारीने भुरळ पाडणार्‍या परंतु ड्रग्स प्रकरणात मलीन झालेल्या कलाकारांना आता आझाद हिंद संघटनेच्या वतीने "ड्रग्जभूषण पुरस्कार" जाहीर करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांना मिळालेले भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत परत करावे. अन्यथा अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालून चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात येईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अड.सतीशचंद्र रोठे यांनी बुलडाणा येथे दिला आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोना महामारीला घाबरुन न जाता कोरोनाशी सामना करायला शिका कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय अधिकार्याचा सल्ला घेवुन उपचार सुरु करा असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.  माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत  जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत सामिती श्रीरामपुर  व बेलापुर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या पुढाकारातुन आज पासुन बेलापुरात मोफत रँपीड चाचणी सुरु करण्यात आली त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की कोरोना विषयी नागरीकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भिती आहे आपला जिव अनमोल आहे त्यामुळे भिती न बाळगता तपासणी करुन घ्यावी योग्य व वेळेवर उपचार मिळाल्यास कोरोना बरा होवु शकतो असेही नवले म्हणाले या वेळी बोलताना बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्याधिकारी डाँ देविदास चोखर म्हणाले की आता गावात असलेले रुग्ण शोधुन त्यांच्यावर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे आपल्या केंद्रात आज पासुन दररोज २५ रुग्णांची तपासणी केली जाणार आहे गरज पडल्यास ही मर्यादा ५० रुग्णापर्यत वाढविण्यात येईल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९७ तपासण्या करण्यात आल्या त्यात १० रुग्ण पाँजिटीव्ह असल्याचे उघड झाले असुन त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवतात अशा रुग्णांनी आपणहुन तपासणी करुन घ्यावी असे अवाहनही डाँ चोखर यांनी केले आहे या वेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा जेष्ठ पत्रकार विष्णूपंत डावरे प्रसाद खरात आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँ हेमंत निर्मळ प्रशांत गायकवाड संतोष निर्मळ तान्हाजी गडाख गणेश टाकसाळ राम पौळ मास्टर हुडे सुहास शेलार पुरुषोत्तम भराटे पोलीस पाटील अशोक शरद पुजारी  प्रधान किशोर कदम मोहसिन सय्यद आदि उपस्थित होते या वेळी विष्णूपंत डावरे देविदास देसाई शरदा पुजारी दिपक कदम कलेश सातभाई यां सर्वांची रँपीड तपासणी करण्यात आली असुन सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डाँ चोखर यांनी सांगितले  कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई  यांनी केले तर डाँ हेमंत निर्मळ यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget