कोरोनाला घाबरुन न जाता डाँकक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करा जि प सदस्य शरद नवले
बेलापुर (प्रतिनिधी )- कोरोना महामारीला घाबरुन न जाता कोरोनाशी सामना करायला शिका कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय अधिकार्याचा सल्ला घेवुन उपचार सुरु करा असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत सामिती श्रीरामपुर व बेलापुर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या पुढाकारातुन आज पासुन बेलापुरात मोफत रँपीड चाचणी सुरु करण्यात आली त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की कोरोना विषयी नागरीकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भिती आहे आपला जिव अनमोल आहे त्यामुळे भिती न बाळगता तपासणी करुन घ्यावी योग्य व वेळेवर उपचार मिळाल्यास कोरोना बरा होवु शकतो असेही नवले म्हणाले या वेळी बोलताना बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्याधिकारी डाँ देविदास चोखर म्हणाले की आता गावात असलेले रुग्ण शोधुन त्यांच्यावर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे आपल्या केंद्रात आज पासुन दररोज २५ रुग्णांची तपासणी केली जाणार आहे गरज पडल्यास ही मर्यादा ५० रुग्णापर्यत वाढविण्यात येईल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९७ तपासण्या करण्यात आल्या त्यात १० रुग्ण पाँजिटीव्ह असल्याचे उघड झाले असुन त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवतात अशा रुग्णांनी आपणहुन तपासणी करुन घ्यावी असे अवाहनही डाँ चोखर यांनी केले आहे या वेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा जेष्ठ पत्रकार विष्णूपंत डावरे प्रसाद खरात आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँ हेमंत निर्मळ प्रशांत गायकवाड संतोष निर्मळ तान्हाजी गडाख गणेश टाकसाळ राम पौळ मास्टर हुडे सुहास शेलार पुरुषोत्तम भराटे पोलीस पाटील अशोक शरद पुजारी प्रधान किशोर कदम मोहसिन सय्यद आदि उपस्थित होते या वेळी विष्णूपंत डावरे देविदास देसाई शरदा पुजारी दिपक कदम कलेश सातभाई यां सर्वांची रँपीड तपासणी करण्यात आली असुन सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डाँ चोखर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी केले तर डाँ हेमंत निर्मळ यांनी आभार मानले.
Post a Comment