बुलडाणा - 5 ऑक्टोबर
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातील राजकारण तापले होते.अनेक सिने कलाकार ड्रग्स घेतात याची चौकशी सुरु झाली आहे.करोडो चाहत्यांना आपल्या अदाकारीने भुरळ पाडणार्या परंतु ड्रग्स प्रकरणात मलीन झालेल्या कलाकारांना आता आझाद हिंद संघटनेच्या वतीने "ड्रग्जभूषण पुरस्कार" जाहीर करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांना मिळालेले भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत परत करावे. अन्यथा अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालून चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात येईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अड.सतीशचंद्र रोठे यांनी बुलडाणा येथे दिला आहे.
Post a Comment